आराम आणि Kabul Express....

काल खूप दिवसांनी शनिवार जरा आरामात गेला...नाहितर प्रत्येक वेळी काही ना काही प्लॅन, कुठेतरी जाणं किंवा ४/५ तास चालणारं Grossary shopping... म्हणजे week day पेक्षा जास्त धावपळ... शुक्रवारी रात्री project party आणि नंतर झालेल्या पत्ते session मुळे झोपेपर्य़ंत शनिवार उजाडला होताच...त्यामूळे मी शनिवारी मी ११ ला उठूनही काय पहाटे उठून बसलास अशी comment मझ्या rommie नी ऐकवली.. ! त्याच्यानंतर प्रचंड फोनाफोनी करून दुपारी कोण कुठल्या गाडीतून कुठे जाणार ह्याचा प्लॅन बनवून झाला... मला मधे १ तास मोकळा वेळ दिसताच मी लगेच YMCA त पळालो.. बाहेर छान हावा होती.. अगदी summer मधला typical दिवस वाटत होता... आणि YMCA च्या swimming pool वर गर्दी ही नव्हती... मला अगदी स्वतंत्र लेन मिळाली... Apartment च्या pool मधे पोहायला जितकी मजा येते तितकी YMCA मधे येत नाही... कारण तिथे मधे थांबून timepass करता येत नाही आणि पाण्यात डूंबत रहाता येत नाही..compulsary laps मारा नाहीतर बाहेर पडा...पूणेरी पाट्या लावल्या आहेत अगदी तिथे.. :) घरी येऊन लगेच गौतम, निशांत साठी गाडी बघयला एका delaer कडे गेलो... मी इथे येऊन बरेच दिवस झाल्यामूळे हल्ली लोकं मला delaer कडे deal final करायला वगैरे घेऊन जातात... :।
त्या dealer कडे मी मागच्या वर्षी कधितरी एका मित्राबरोबर गेलो होतो.. कसं काय माहित पण तिथल्या तो फ़िरंगी salesman आणि त्याचा खडूस boss ह्या दोघांनाही मी अगदी चांगला लक्षात होतो... :) "तुझ्या सारख्या खडूस पूणेरी कोकणस्थाला कोण विसरणार... " असं conclusion आमच्या gang नी काढलं... !!!
दूपारी निवांतपणे घरी बसून आईनी पाठवलेला साप्ताहिक सकाळ चा दिवाळी अंक वाचला... अंक मस्त आहे एकदम.. त्याबद्दल detail मधे परत कधितरी...पण हे सगळ करण्याच्या नादात routine कामं म्हणजे घर vaccum करणं, कपडे धूणं, इस्री करणं etc राहूनच गेलं... :( wallmart जाऊन उगाच भटकायच ही राहिलच...
इतर प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन असल्याने मी, चंदना आणि LP असे तिघच much awaited काबूल एक्सप्रेस ला जायला निघालो... पिक्चर overall चांगला असला तरी जरा अपेक्षाभंग च झाला...त्याची publicity जशी केली होती त्यावरून मला तो Boarder, Refugee ह्यांच better version असेल असं वाटलं होतं... Black commedy असली तरी त्यात जे काय दाखवलय त्याचं shooting करण्यासाठी अगदी अफ़गाणिस्तानापर्यंत जायची काही गरज नव्हती...अर्शद वारसी मुन्नाभाई mode मधून बाहेरच येत नाही... अफ़गाणिस्तानात reporting साठी गेलेला पत्रकार इतके जास्त PJ मारतो.. I mean मला तरी ते फ़ारसं realistic वाटलं नाही....:(
पिक्चर ची सुरवात इतकी संथ आहे की काबूल एक्सप्रेस च्या ऐवजी काबूल पॅसेंजर वाटायला लागते...
म्हणजे बराच वेळ अर्शद वारसी चे PJ वगळता काही घडतच नाही... इम्रान खान नावाच्या तालिब ची entry झाल्यावर जरा speed यायला लागतो... त्याने ह्या हिरोंना किड्नॅप केल्यावर त्याचे आणि अर्शद वारसी चे गाडीतले संवाद मजेदार असले तरी त्या situation ला शोभत नाहीत... हातात बंदूक असलेल्या अतिरेक्याने कोणा पत्रकाराला किडनॅप केलेलं असताना तो त्याच्याशी इम्रान खान चांगला की कपिल देव चांगला असा वाद घालेल हे पटत नाही... बिचार्या जॉन अब्राहीम ला तर काही कामच नाही... तो पत्रकाराच्या ऐवजी इतर कोणीही म्हणजे engineer, doctor, social worker आहे असं सांगितलं असत तरी पटल असतं कारण तो पत्रकार आहे असं विशेष कुठे establish च होत नाही... शिवाय त्याच्या role मधे वेगळं असं काही नाहिये.. अर्शद वारसी ला निदान त्या तालिब शी वाद घालण्याचं काम तरी आहे... जॉन ला तेही नाहिये आणि कुठे त्याचे muscles दाखवायची ही संधी नाहिये... :) त्याच्याजागी कोणीही सोम्यागोम्या पण चालला असता...
पटत नसतानाही तो इम्रान खान म्हण्जे तो तालिब हे सगळं करत असतो त्यामूळे त्याच्याबद्दल सहानूभूती निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न ही somehow न पटण्यासारखा आहे... त्याला पटत नसलं तरी ultimately तो अतिरेकीच आहे so काय फ़रक पडतोय ??
बापरे जरा जास्तच शिव्या घातल्या मी.. :) बर्याच चांगल्या गोष्टी पण आहेत त्यात...:D Main म्हणजे उगाच ओढून ताणून गाणं आणलं नाहिये...किंवा कोणी अफ़गाणी मुलगी आणि तिच एका कोणत्यातरी हिरो बरोबर प्रेमप्रकरण असलं काहितरी नाहिये... तसच बंदूकधारी तालिब आणि आपले तगडे हिरो ह्याची मारामारी किंवा गाडी ला लटकण किंवा इतर typical bollywood stunts दाखवण्याचा आचरटपणा केला नाहिये... :)
अफ़गाणिस्तान बद्दलची वातावरणनिर्मिती आणि locations खूप मस्त आहेत.. वाळूची लांबच लांब बेटं आणि त्याच्या background वर हिमशिखरं..खूप मस्त दिसतं.... मला तर मधे मधे वाटत होतं ह्याचे फोटो काढायला किती मजा येइल...:D आणि तसं पिक्चर मधे तालिबान, अमेरीका, पाक ह्याचाबद्दल बोललेल आहेच.. so बघतान पण नाही पण नंतर त्याबद्दल विचार केला जातोच....
एकूण काय मला पिक्चर आवडला नाही असं नाही पण जितका आवडला तितकात अपेक्षाभंग पण झाला... :(
so माझा शनिवार आणि काबूल एक्सप्रेस दोन्ही not bad but could have been better... !!!! :)

Ice Ice Baby.....!

ह्या वर्षी हिवाळ्याची सुरुवात जरा जास्तच लवकर झाली... मागची वर्षी thanks giving च्या आधिच्या week end ला पहिल्यांदा jackets,gloves घालायची वेळ आली होती... यंदा मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यापासूनच winter accessories वापराव्या लागतायत... मागच्या वर्षी snow fall, skiing हे सगळ enjoy करून देखिल ह्या वर्षी पण snow fall ची वाट बघणं चालू होतच.. आणि हे मी आमच्या ऑफ़िस मधल्या फ़िरंग्यांना सांगितल्यावर त्यांच्या शिव्या पण खाव्या लागल्या.. :) त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सारखे "परप्रांतिय" इथे येउन snow fall व्ह्यायची वाट बघतात आणि मग snow fall झाला की त्रास त्यांना सहन करावा लागतो.. !
Thanks giving ची चाहूल लागली आणि थंडी चांगलीच वाढू लागली.. गाडीवर रोज सकाळी snow flakes दिसू लागले..त्यातच east coast वर बर्यापैकी बर्फ़ पडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या.. आमचा १९ जणांचा कोलोरॅडो ला जवळ जवळ १५ तास drive करुन जायचा मेगा प्लॅन बनत होता...लोक जास्त चालणारी डोकी ही जास्त त्यामूळे rounds of discussion होऊन ट्रिप final झाली... ह्या ट्रिप मधे overall सगळंच मेगा होतं... डोकी १९, ३ SUVs, १७/१८ तासांचा मोठा drive, रहायला घेतलेली २ मोठी cabins सगळच huge...आधी मी christmas ट्रिप च्या ठरवाठरवीत आणि नंतर परत एकदा शिकागो ला गेल्यामुळॆ, कोलोरॅडो ट्रिप च्या organization मधे मी अजिबातच involve नव्हतो...आणि "तरूण रक्ताला वाव देण्याचा उदात्त हेतू" ही त्या होत..:D अर्थात अर्पणाच्या शिव्या खाव्या लागल्याच त्यामूळे...:)
  Posted by Picasa
डेन्वर ला पोहोचता पोहोचता उजाडलं आणि रस्त्यावरून rocky mountains च्या शिखरांचं सुंदर द्रुष्य दिसलं..त्याच्यावर बर्फ़ शिंपडल्यासारख दिसत होतं.. आम्ही west ला drive करत असल्याने सूर्योदय दिसत नव्हता .. पण अचानक मागे लक्ष गेलं आणि एव्हडे सूंदर रंग दिसायला लागले...त्या रंगांचे गाडीतूनच जमतिल तेव्ह्डे फोटो काढले.. पण exit घेउन थांबे पर्यंत ते रंग गायब झाले... Denver ते brekenridge चा drive होता साधारण १५० मैल चाच पण पूर्ण डोंगरा मधून..आणि जसे जसे वर जाऊ तसा बर्फ़ वाढ्त होता...आजूबाजूला द्रुष्य खूप छान दिसत होती पण गाडी चालू असल्याने फोटो निट घेता येत नव्हते...
कोलोरॅडो ट्रिप मधली एक मुख्य activity म्हणजे snow mobilling... snow mobiling च्या track वर अर्थातच पूर्ण बर्फ़ होता आणि एव्हडच काय तिथे तर नजर जाई पर्यंत सगळी कडे बर्फ़ च बर्फ़ होता... सगळी कडे पूर्ण पांढरा रंग..मधे मधे तूरळक हिरवळ.. काही भाग सूर्यप्रकाशात चकाकणारा आणि त्यात धावणार्या आमच्या snow mobils..!!
  Posted by Picasa मधूर snow mobil चालवत असताना मी मागे बसून फोटो काढायाची हौस भागवून घेत होतो... overall ते सगळं इतकं सूंदर होतं की किती ही वेळ पहिलं आणि किती ही फोटो काढले तरी समधान च होतं नव्हतं..
त्यादिवशी रात्री vail नावाच्या गावाला drive करत असताना अचानक snow fall चालू झाला...तो पूर्ण रस्ता नदी काठून होत्ता.. नदी काठून जाणारा drive, चालवायला SUV, बाहेर होत असलेला हलकासा snow fall आणि गाडीत चालू असलेली आशा भासलेंच्या जून्या गाण्यांची CD.. ह्या पेक्षा आधिक ideal condition काय असू शकते...
ह्याच ट्रिप मधे skiing देखिल करायचं होतं.. skiing चे tracks अर्थातच डोंगर उतारावर होते...तिथे जात असताना समोर त्याचं द्रुष्य दिसत होतं.. डोंगरावर भूरभूरलेल्या बर्फ़ात मधे मधे तयार झालेली सपाटी आणि त्यावरून खाली घरंगळणारे काळे लाल ठिपके..आपल्याकडे दिवाळीच्या किल्ल्यांवर बनवण्यासाठी हा एकदम perfect scene आहे. :D
  Posted by Picasa
skiing tracks अजस्र्त होते...तिथे registration करत असताना counter वरची मुलगी अगदी काळजीने सांगत होती की गेले ८ दिवस बर्फ़ पडला नाही..आता पडायलाच हवा नाहितर ski resort ला problem होईल.. मला आपल्याकडच्या पावसाची वाट बघणार्या शेतकर्याची आठवण आली..!! skiing करतानाही मनसोक्त बर्फ़ात खेळून झालं...
हा एव्हडा बर्फ़ कमी पडू नये म्हणून का काय तर आम्ही st louis ला परत आल्यवर ४ च दिवसात Ice Rain ची alert यायला लागली...गुरुवारी त्या निमित्ताने ऑफ़िस मधून लवकर सटकताही आलं...:)
  Posted by Picasa पावसाबरोबर बर्फ़ ही पडत होता...हा ना धड snow होता ना गारा होत्या...हवा पण इतकी थंड होती की पडणारं पावसाचं पाणी गोठत होतं... इतकच काय झाडांवरून, घराच्या छ्परावरून घरंगळणारं पाणी पण गोठून जात होतं...हे असच रात्र भर चालू होतं...
  Posted by Picasa
दुसर्या दिवशी ऑफ़िस ला जाताना सुमारे तास भर गाडी खणून काढण्यातच गेला...जवळ जवळ १५ मिनिटं तर गाडीची दारच उघडत नव्हती... मला तर handle तुटून हातात येतं का काय अशी भिती वाटत होती... wipers मधेही एतका Ice जमा झाला होता की ते हलत पण नव्हते... आरसे तर संध्याकाळ पर्यंत साफ़ झालेच नाहीत... आधी तास भर गाडी स्वच्छ करणे आणि नंतर तास भर drive करून आमची gang एकदाची ऑफ़िस ला पोचली...बाहेर अजूनही Ice slit आहे..  Posted by Picasa
एकूण काय गेल्या ८/१० दिवसात मिळून आत्तापर्यंत पाहिला त्याच्यापेक्षा हजारपट बर्फ़ पाहून झाला...पहावं तिकडे "Ice Ice Baby" अशीच अवस्था आहे.. ! :)

बर्निंग ट्रेन

परवा पुतळाविटंबने वरून महाराष्ट्रात झालेल्या दंगलीत डेक्कन क्वीन पेटवल्याची सचित्र बातमी वाचली.. राणिची झालेली अशी दुर्दशा पाहून कुठेतरी वाइट वाटून गेलं...लहानपणा पासून डेक्कन क्वीन बद्दल खूप कुतूहल होतं.. पण ही कल्याण ला थांबत नसल्याने आम्हा डोंबिवली करांना तिचा तसा काहीच उपयोग नव्हता..डेक्कन क्वीन मधून पूण्याला जाण्याची हौस भागवण्यासाठी एकदातर आज्जी मला दुपारी डोंबिवली हून आईच्या office मधे, VT पर्यंत सोडायला आली होती आणि मग मी आणि आई डेक्कन क्वीन ने पूण्याला गेलो होतो..त्यावेळी ही एकच सूपर फ़ास्ट दर्जाची गाडी असल्याने त्यातून प्रवास करण म्हणजे prestige समजलं जात असे..टाय सूट घालून कामनिमित्त मुंबईला जाणार्या executive पूणेकरांबरोबरच सुट्टी साठी आपल्या दादर पार्ल्याच्या नातेवाईकांकडे जाणारे प्रभात रॊड डेक्कन वरचे शिष्ठ पूणेकर देखिल "आम्ही डेक्कन क्वीन सोडून दुसर्या गाडीने मुंबई ला जात नाही" असं अगदी अभिमानानी सांगत..
राणिचा थाट ही तसा शाहीच.. ब्रिटीशांनी रेस खेळ्ण्यासाठी सकाळी मुंबई ला येता यावे म्हणून सुरू केलेली ही गाडी पुढे रोज सोडण्यात येऊ लागली..रेस खेळ्णारे उच्चभ्रू अस्ल्याने सहाजिकच राणिला कायम पहिला मान असे... पावसामूळे delay झालेली वाहातूक असो की अन्य कोणत्याही फ़ालतू कारणाने झालेला typical centra railway खोळंबा असो, जागा मिळेल तेव्हा बाकीसग्ळ्यांना बाजूला सारून राणी मात्र ऐटीत पुढे निघून जात असे..In fact ह्याच मुळे मुंबईकरांना राणी बद्द्ल कधी विषेश प्रेम वाटलच नाही... सकाळी ९/९:३० च्या आसपास डोंबिवली स्टेशन भरून वाहत असताना आणि लोक पुढ्च्या फ़ास्ट लोकल साठी थांबलेले असताना "platform no 5 च्या किनार्यापासून दूर उभे रहा एक वेग्वान गाडी पुढे जात आहे." अशी annoucement झाली की हमखास समजावं की आता डेक्कन क्वीन सगळ्यांना चिडवत पुढे निघून जाणार..
संध्याकाळी देखिल आई आणि तिच्या मैत्रिणींना यायल्या उशिर झाला की हमखास ठरलेलं कारण म्हणजे "डेक्कन क्वीन रखडली आणि आमच्या फ़ास्ट ट्रेन लेट झाल्या"...सुमारे ७६ वर्षांच्या हिच्या प्रवासात खंडाळ्याचा एक अपघात सोडला तर destination च्या आधी ही कधिच terminate झाली नाहीये...
बाकीच्यांपासून वेगळं ठेवण्यासाठी डेक्कन क्वीन चे रंग देखिल किती बदलले..पांढरा,पिवळा,लाल एव्हढ्च काय तर मधे कधितरी काळ्पट grey पोशाख देखिल हिनी घातला..पण लोकांना तो अजिबात न आवडल्याने आठच दिवसात तो बदलण्यात आला..डेक्कन क्वीन चा पांढरा रंग खूप वर्ष होता...नंतर मग सध्या असलेल्या निळा रंग आला..."मिले सुर मेरा तुम्हारा" मधे दाखवलेल्या डेक्कन क्वीन च्या वळण घेणार्या द्रुष्यामूळे तर ती जवळजवळ देशभरात कुतूहलाचा विषय बनली होती...
डेक्कन क्वीन निघताना पूणे आणि मुंबई स्टेशन वर सनई देखिल वाजलली जात असे..
डेक्कन क्वीन च्या प्रवाशांच तिच्यावर भयंकर प्रेम.. गणपती,दांडीया, सत्यनारायण, भजनं ह्यापासून पत्त्यांच्या अड्ड्यापर्यंत अनेक गोष्टी गाडीत साजर्या केल्या जातात...डेक्कन क्वीन चा ६० वा, ७५ वा वाढदिवस देखिल अगदी दण्क्यात साजरे झाले अगदी आरास, रांगोळ्या, मिठाई सकट...
मुंबई पुणे प्रवासी संख्या वाढल्यावर इंद्रायणी, प्रगती, शताब्दी अशा अनेक गाड्या चालू झाल्या पण डेक्कन क्वीन चा थाट मात्र कायम होता..इतर कुठल्या गाडी च्या वाढदिवशी पेपर मधे अग्रलेख लिहिले गेल्याच मला तरी आठवत नाही.. आणि इतर ही अनेक लेखांमधे,गोष्टींमधे डेक्कन क्वीन इतका दुसर्या गाडी चा उल्लेख दिसत नाही.. तिचा वक्तशिरपणा, तिचा वेग, तिचा रंग, तिची pantry car, तिचं मोजून ३ स्टेशन वर थांबणं, अगदी त्यात मिळणारं 20/25 रुपये किमतिचं omlet आणि cheese toast ह्या सगळ्याचा तिच्या प्रवाशांना अगदी पूणेरी style चा "जाज्वल्य" अभिमान असतो.. :)
Express highway चालू झाल्यावर आणि volvo पर्व आल्यावर राणीची शान थोड्याफ़ार प्रमाणात का होइना घसरलीच...आणि परवा तर ती अगदीच बिचारी वाटली...
जळण्यार्या डेक्कन क्वीन चे फोटो बघताना जाणवलं की ब्रिटीशांनी चालू केलेल्या ह्या राणी ची अवस्था पण त्यांच्या खर्या राणी सारखीच आहे..राणी राणी फ़क्त म्हणायला प्रत्यक्शात मात्र नुसती नावापुरती, रया गेलेली...!

किस्से

stl मधे आमच्या colony मधेच ऑफ़िस मधली भरपूर जनता रहाते...त्यामूळे अखंड एकत्र timpass करणं चालू असतं.. "पंजाब सिंध गुजरात मराठा" असे सगळ्या प्रांतातले लोक असल्याने मराठी public देखिल आपापसात हिंदी बोलायचा केविलवाणा प्रयत्न करीत असते...:) अनेकदा एकत्र दंगा करत असताना घडलेले हे किस्से.. :)

एकदा कुठल्यातरी trip ची ठरवाठरवी करत असताना भूकेची जाणिव झाली.. मग झटपट भुर्जी पाव बनवणं चालू झालं..त्यावेळेला घडलेला संवाद..
kitche मधे असलेला मुलगा : अजून दोघं जणं पण येतायत हे एव्हडं पुरणार आहे की वाडवू??
बाहेर hall मधे बसलेली मुलागी : नको नको कही नको करूस त्यात..मी अत्ताच त्या पातेल्यात २ अंडी घातलीतेय..!!!
दारतून आत येणारे दोघं : "..........!!!!!!!?????????"

रात्रीच्या वेळी एकदा पत्ते खेळायला सगळॆ जमलेले असताना एक मुलगा एकदम तयार होऊन आला आणि बाकी सगळे एकदम अवतारा होते.एका मराठी madam नी लगेच शंका विचारली..
ती : अरे.. तुम तो बाहर के कपडे पेहेनके आये..?? (अर्थ = बाहेर जायचे..!!)
त्याची instant reaction : हां..तो अब अंदर के कपडे पेहेनके पब्लिक मे कैसे आऊ???
ती : भयंकर पडलेला चेहेरा.. !!!!!!!! आणि "काय हे आचरट उत्तर" असे भाव
बाकीचे : हसून हसून जमिनीवर कोसळलेले...!!!

ऑफ़िस मधून घरी आल्यावर माझा आणि rommie चा संवाद.
मी : माझ्या team mate चा कूत्रा आजारी आहे त्यामूळे तो ऑफ़िस ला आला नाही..माझी अर्धी काम राहिली त्यांमूळे..
तो : hmmmm
दुसर्या दिवशी
मी : माझ्या team mate चा कूत्रा बरा झाला त्यामूळे तो आज ऑफ़िस ला आला..
तॊ : कोण?? कुत्रा???????? की team mate..
मी : :। :। :। :। :।

पत्ते खेळत असताना चा संवाद.
सतत वाईट पान येऊन frust झालेली मुलगी तिच्या नवर्याला : आता तू तरी चांगली पानं वाट रे..हा अमेय मघापासून वाईट पानं देतोय.
अमेय: एक तो इतना टाइम पत्ते वाटो और उपरसे तुम्हारी गालिया खाओ.. तुम्हारा नवरा पत्ते वाट रहा है तो क्या तुम्हे अच्छे आयेंगे क्या..वो तो तुम्हारे opposite team वाला है.. तुम्हारे बुरे पे ही टपा होगा.. !
बाकीचे अमराठी लोकं : confused नजरेने दोघांकडे बघतायत..

US ला नविन आलेल्या मुलाने पहिल्याच दिवशी विचारलेला doubt. "AT&T bell आणि Taco Bell एकाच owner चे आहेत का ?" :D :D :D :D

एक मुलगी घाईघाई ने घरी जाताना "मी office मधून आल्यापासून घरीच नाही गेले..चला मी जाउन येते.."
बाकीचे "आता घरी कशाला जातेस.. इथूनच बाहेर जाऊ ना"
ती "नको एकदा शिवून येते घराला"
बाकीचे chorus मधे.. "का?? तुझं घर फ़ाटलयं???? " :D

मुलगी : माझा लहान भाऊ exactly तुझ्याच वयाचा आहे..त्यामुळे मला तुझ्याशी बोलताना अगदी त्याची आठवण होते..
मुलगा : oh.. हो का? पण मला तुझ्याशी बोलताना माझ्या मोठ्या बहिणीची आठवण नाही होतं..\]
मुलगी : का? (with question mark on face)
मुलगा : कारण मला मोठी बहिण नाहिचे..!!!!!
मुलगी चेहेर्यावर "आवरा ह्याला कोणितरी" असे भाव :D

अजून असे बरेच किस्से आहेत.. फ़िलहाल मुझे वेळ नहि है.. so बाकी का नंतर...!!!

नेमेची येतो...

ते उदास वातावरण... ५ वाजता होणारा सूर्यास्त.. त्यामूळे रोजच ऑफ़िस मधून बाहेर पडताना असणारा अंधार,आपण किती उशिरा घरी चाललो आहोत असं feeling देऊन जाणारा... ती निष्पर्ण, चेहेरे पाडून बसलेली झाडं...निस्तेज पांढरट छटा असलेली लॉन ची लांबच लांब बेटं...दाराची फ़ट जरी उघडली तरी झोंबणारी थंड्गार हवा... बाहेर पडलं की येणारं बोचरं वारं..श्वास घेतला तरी नाकात टोचणारी थंडी.. सकाळी गाडी काढ्नाता ती साफ़ करण्यासाठी घ्यावे लाग्णारे कष्ट... त्यात वेळीअवेळी पडणारा पाऊस...shoes, प्रसंगी socks देखिल ओले करून आणखिनच थंडी वाजवणारा... मूळात आपल्याला माहितच नसलेला भर थंडीत पडणारा तो पाउस...कुंद वातावारणात मिणमिण जळणारे ते typical पिवळे दिवे...रस्त्यावरून मंद पणे पूढे सरकणारा traffic...defroster महत्त्वाचा की मागे बासलेल्यांपर्यंत पोहोचणारा गरम हवेचा झोत ह्या कसरतित केलेले ते संथ driving...छान उबदार गाडीतून उतरूच नये असं वाटत असताना गाडी चा दरावाजा उघडल्यावर भसकन येउन अंगावर आदळणारी ती थंड गार हवा...प्रत्येकवेळी घराबाहेर पडताना घालावे लागणारे ते अवजड थंडी चे कपडे... leather jacket चा तो typical वास... कुठे बाहेर गेलंच तर ग्लोव्हज घातलेल्या हातांनी camera stable धरून फोटो काढायची केलेली खटपट... आणि एव्ह्ड करून घरी येउन पाहिल्यावर ते हललेले फोटो...रिकामे ओकेबोके दिसणारे ते jogging tracks, tenis courts... थंडी वाजू नये म्हणून जणू पांघरूणच घेऊन पडून राहिलेले swimming pool... ऑफ़िस मधेही weather बद्दलचे उसासे सोडून झाल्यावरच चालू होणार्या meetings.. week end ला ११:३०-१२ ला उठला की ३/४ तासात संपून जाणारा दिवस...एकंदरितच hybernate झालेलं वातावारण...
ह्या सगळ्याबरोबरच हलकेच चालू होणारा snow fall.. !!!! सकाळी खिडकीतून बाहेर बघितल्यावर पडताना दिसणारे जणू कापसाचे पुंजके...पार्कीगमधून ऑफ़िस पर्यंत जाताना jacket वर जमलेलं बर्फ़... ऑफ़िस मधे शिरता शिरता दारा पाशीच असलेल्या कॉफ़ी शॉप मुळे दरवळणारा कॉफ़ी चा वास...झोंबणार्या वार्यातून breve किंवा starbucks मधे शिरून घेतलेल्या हॉट चॉकलेट किंवा mocha च्या कपाचा उबदार स्पर्श आणि जिभेवर रेंगाळ्णारी चव...ऑफ़िसच्या १९ व्या मजल्यावरुन खिडकी ला नाक लावून बघितलेलं हिमाच्छादित शहराचं द्रुष्य...घराभोवती जमलेल्या बर्फ़ावर केलेली मस्ती...गारठणार्या हातांनी बनवलेला snow man...दुसर्यादिवशी च्या उन्हात घट्ट झालेल्या बर्फ़ाचे चकाकणारे स्फ़टिक...थंडीतून घरी आल्यावर fire place पाशी शेकलेले हात... कधितरी बर्फ़ात केलेलं sking.. ते करताना झालेली धडपड...कधितरी भर थंडीत हौसेने बाहेर पडलेली gang... हॉटेल मधे जागा मिळेपर्यंत बाहेर केलेला दंगा... पाय गारठून जाउ नये म्हणून मारलेल्या उड्या... हौसेला मोल नाही म्हणत -१० deg मधे disc पर्यंत जाउन केलेलं New Year celebration...कधितरी अचानक पड्णारं ऊन आणि blinds मधून आत येणारी चूकार सूर्य़किरणं... हळूहळू शून्याच्या वर जाणारं तापमान..घरासमोरच्या झाडावर दिसणारी दोन इवलिशी पानं..वसंताची चाहूल देणारी.. hybernate झालेल्या निसर्गाला जागं करणारी... !!!

Winter is back....lets face it to enjoy the beautiful spring which will follow shorlty....(:-o) !!!!!!!!!

तो

बर्याचदा तो माझ्या खूप डोक्यात जातो... त्याचं ते सतत फ़ंडे देणं, ते मला न पटणं, मग मी खूप तावातावाने त्याच्याशी वाद घालणं, शेवटी discussion कुठल्याही conclusion शिवाय थांबणं आणि ह्या सगळ्यामूळे माझा उरलेला दिवास खराब जाणं किंवा मग डोकं दुखणं हा बर्याचदा घडलेला घटनाक्रम आहे... पण तरिही हे अनेकदा repeat होतच राहिलं.. त्याच्या फ़ारच कमी गोष्टी मला पटायच्या... त्याची Indian culture बद्दलची जहाल मतं, स्वतः ऐवजी समाज आणि लोक ह्याचा विचार जास्त करणं, नातेवाईक (मग ते जवळचे असो अथवा दूर चे) ह्या community बद्दल जरा जास्तच जागरूक असणं, एव्हडच काय तर त्याच्या बायकोचं भारतात असताना घरात साडी नेसणं आणि अमेरीकेत एकदम modern कपड्यांमधे वावरणं हे सगळं माझ्या आकलना पलिकडच होतं..
तो मला पहिल्यांदा भेटला आमच्याच US मधल्या घरात.. माझ्या roomie चा मित्र अस्ल्याने त्याची family US ला येईपर्यंत तो आमच्या घरी रहाणार होता... त्याच्याबद्दल आधी ऐकलेल्या गोष्टींमूळे तो आमच्या घरी येणार असल्याचं कळल्यावर माझ्या कपाळावर आठ्याच पडल्या होत्या.. आणि हो सांगायच्या मला आधी विचारलं का नाही म्हणून मी माझ्या roomie बरोबर heated discussion पण केलं होतं...उगाच जास्त "टांगअडावगिरी" केली तर ह्याला सरळ घालवून द्यायचं अस मी अगदी पक्क करून टाकलं होतं... (माझ्या आईच्या मते) मी मूळातच खडूस असल्याने, मी पण कधी फ़ार बोलायच्या फ़ंदात पडत नसे.. म्हणजे कामापूरत बोलणं कधिकधि आम्हाला काही माहिती हवी असेल तर तेव्हडं विचारण एव्हडीच काय ती interaction..त्यालापण विशेष वेळ नसे.. सतत laptop आणि mobile घेऊन बसलेला असे... आम्ही जे काय जेवण बनवू ते पण फ़ार issues न काढता जेवत असे.. एकदा शनिवारी आम्ही बाहेर गेलेलो असताना त्यानी पूर्ण जेवण बनवून ठेवलं होतं.. ते खरच surprize होतं.. हळूहळू घरात पण बोलण वाढत होतं आणि थोडीफ़ार इतर गोष्टींबद्दल चर्चा पण होतं असे.. थोडेदिवसांनी मला जाणवायला लागलं होतं की हा ऐकलं होतं तेव्हडा "हा" नाहिये.. नंतर नंतर आमचं तिघांच बर्यापैकी चांगलं जमायला लागल होतं.. पण तरिही तो आमच्या घरी येणार हे मला आधी न विचारल्याचा मी अगदी गनिमीकाव्यानी निषेध करत असे..
तो US ला आधी बर्याचदा येउन गेला असल्याने लवकर गाडी घेता येण त्याला सहज शक्य झालं.. त्याची गाडी आल्याने आमचा grossary shopping चा प्रश्ण तरी मिटला होता.. पण एकदा मला parcel pick up करायला जायचं असताना त्यानी Tenis खेळायला निघून जाउन माझ्या रागात आणखिनच भर टाकली होती.. पण माझी गाडी शोधताना त्यानी मला खूपच मदत केली होती.. नंतर माझे आई बाबा इथे आलेले असताना पण आम्ही एकत्र चांगला timepass केला...
माझे आई बाबा आणि माझा roomie परत गेल्यावर मला काही दिवस खूप bore व्ह्यायचं त्यावेळेला मग तो च माझा सग्ळ्यात जवळचा मित्र होता... तसा वयानी आणि अनूभवानी मोठा असल्याने एक secure feeling यायचं.. त्याची family इथे आल्यानंतर तो दूसरी कडे shift झाला.. तेव्हा पण मी अगदी मनोमन म्हणत असे की हा ह्याच colony मधे रहावा... त्याच घर म्हणजे मला अगदी हक्काच घर होतं.. कधिही जेवण बनवायचा कंटाळा आला की मी त्याचाघरी जेवायला जात असे... एकदातर new year day च्या रात्री ३:३० ला मी बाहेरून घरी येत असताना त्याच्या घरचा light दिसला म्हणून मी सहज फोन केला तर मला त्यावेळेला ice cream आणि milkshake प्यायला यायचं invitation मिळालं.. :)
ऑफ़िस मधे काही झालं, कोणाशी भांडण झालं की मी त्याच्या घरी जाऊन बोलून येत असे.. इतर वेळी नको वाटत असलेले त्याचे फ़ंडे त्यावेळी मात्र चालत असत.. पूण्याला असताना मी कुठे बाहेर गेलो की पोचल्याचा फोन घरी करायची सवय होती.. इथे मी त्यालाच ट्रिप ला जाताना, आल्यावर त्यालाच फ़ोन करत असे..
कालच तो भारतात परत गेला.. मी air port वर आणायला खूप लोकांना गेलोय पण कोणाला सोडायला कधिच गेलो नव्हतो.... काल त्याला सोडायला गेलो आणि घरी आल्यावर काय कराव काही सूचतच नव्हतं.. त्याच घर आमच्या colony मधे शिरल्याशिरल्या समोरच होतं.. त्यामूळे कुठूनही आलं की तिकडे नजर जायचिच... कालपण दोन्ही वेळा बाहेरून येताना तिकडे बघितलं गेलच... माणसांच देखिल व्यसन लागून जातं बहूतेक.. दूसरं काय..?

सूप्त इच्छा

प्रत्येकाच्या मनात काहितरी सूप्त इच्छा असतातच.. म्हणजे काहितरी अत्रंगी प्रकार करावे असं प्रत्येकाला कधितरी वाटतचं.. परवा Mask movie बघताना सहज विचार आला की खरच आपल्याला हवं ते काहिssssssही करायची एक दिवस permission मिळाली तर कित्ती धमाल येईल.. मी काय काय करेन "त्या" दिवशी??
आमच्या घरासमोर रहाणार्या एका फ़िरंगी बाई कडे एक मांजर आहे.. इथल्या लोकांप्रमाणेच त्या मांजरीच्या तोंडावर भयंकर देखिल मंद भाव असतात.. खावून खावून ती फ़ार जाड पण झालिये..(थोड्क्यात माजलिये..!) का कोण जाणे ती मला फ़ार irritating वाटते.. मला एकदा chance मिळेल तेव्हा तिच्या पेकटात लाथ घालायचिये... एक जोरदार लाथ बसल्यावर तरी तिच्या तोंडावरचे मंद भाव बदलतात का ते पहायचयं..
मिसळणाचा डबा ही स्वैपाकघरातील एक important गोष्ट आहे हे मला इथे आल्यावर कळलं... एकदा त्यातला हळदिचा लहान डबा थोडा हलला आणि हळद इतर डब्यांमधे गेली.. तेव्हापासून मला पूर्ण भरलेला मिसळणाचा डबा घट्ट बंद करुन गदागदा हलवून आत तयार होणार्या मिश्रणाचा रंग कोणता होईल ते पहायचं आहे.. :) पण हे मी mostly पूण्याला गेल्यावरच करेन कारण नंतर तो राडा निस्तरत कोण बसणार ?
मुंबाईला असताना रात्री पाणी येत असे..त्यामूळे पिण्याचं पाणी तेव्हा भरून ठेवावं लागे.. आम्ही एका कळशी मधून पिंपात पाणी ओतत असू.. मला ती पूर्ण भरलेली कळशी हातातून धपकन पाडून "जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे" करायची खूप इच्छा होत असे.. पण मी हे चुकून आई जवळ बोललो आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीमूळे कधि करता आलं नाही.. :( नंतर कळशी भर नाही पण लोटी भर पाणी मी माझ्या पूतण्यांना सांडायला देउन ही इच्छा थोडीफ़ार तरी पूर्ण केली.. :)
ऑफ़िस मधे आमच्या मजल्यावर एक गुबगुबीत काका बसतात...फ़िरंगीच आहेत..त्यांचे गाल मस्त गुबगुबीत आहेत आणि जरा थंडी पडली लाल होतात.. ते समोर दिअले की मला त्यांचे गाल ओढायची तीव्र इच्छा होते.. अर्थात ही कधिच पूर्ण न होणारी इच्छा आहे.. मी असं काही करायचा प्रयत्न जरी केला तरी मला ऑफ़िस मधून हाकलून देतिल...
अमेरीकेच्या वाह्तूक व्यवस्थेत पादचारी हा भयंकर लाडावलेला घटक आहे.. फ़ार जास्त डोक्यावर चढवून ठेवलेला.. मला इथे एखाद्या पाद्चार्याला जोरदार कट मारून घाबरवायचं आहे.. :)
Mixer वर milkshakes किंवा juices बनवण एकदम सोप्प असतं.. म्हणजे फळं, दूध आणि साखर घालून mixer चालू करायचा..पण मला एकदा mixer चं झाकण बंद न करता तो चालू करुन काय होतं ते बघायचयं..!!! हे पण मला पूण्यालाच करून बघाव लागणारे आणि ते पण घराला नविन रंग देण्याच्या आधी... :)
काही काही लोकं खूप डोक्यात जातात... म्हणजे कोणीही अगदी मित्र मैत्रिणी, ऑफ़िस मधले किंवा नातेवाईक.. कधिकधि ते इतकी जास्त डोक्यात जातात की ते दिसले की मला त्यांच्या एक कानाखाली माराविशी वाटते...माझी अशी एक यादीच आहे की ज्यांना मला एकदातरी श्रिमूखात द्यायचीच आहे.. !!!
आता माझच मला असं जाणवायला लागलय की माझे विचार फ़ारच distructive होत चाल्लेत.. :) त्यामूळे उगाच स्व्प्न न बघत बसता उठून काहितरी constructive कामाला लागावं.. :)

P.S. "आता प्रवास वर्णनं पूरे.. कहितरी वेगळं लिहा" असा "feedback" मिळाल्यामूळे जरा वेगळं लिहीलयं.. feedback देणार्यांनो वाचताय ना... ;)

ग्रॅंड कॅनियन...एक अनुभव...!

ऑगस्ट महिना सुरू झाल्या झाल्याच लोकांचं सप्टेंबर मधल्या long week end चे प्लॅन करण चालू झालं... आमच्या इथली एक गॅंग न्यूयॉर्क ला US Open बघायला जाणार होती... तर दुसरी कॅलिफ़ोर्निया ला जाणार होती.. मला दोन्ही कडे जायचं होतं..;) पण कामामुळे कुठे जाता येइल की नाही ते ठरत नव्हतं..आणि मग मी कुठेच न जाता stl मधेच बसतो का काय असं वाटायला लागलं.. शेवटी १५ दिवस आधी मला जाता येणारे हे नक्की झालं.. पण तोपर्यंत न्यूयॉर्क आणि कॅलिफ़ोर्निया दोन्हीची tickets इतकी महाग झाली होती की मला गणपती साठी भारतात जाउन येणं स्वस्त पडलं असतं.. :)
मधेच एकदिवस सुक्रुत चा फोन आला..नेहमी प्रमाणे त्याच्या शिव्या ऐकून झाल्यावर तो मला म्हणाला long week end ला तू, मी आणि निलेश (म्हणजे आमचा कॉलेज मधला rather कोथरूड ग्रुप मधला अजून एक मित्र) ट्रिप ला जायचं का? मी काय तयारच होतो.. आणि आम्ही तिघं जणं जवळजवळ १.५ वर्षांनी एकत्र भेटणार होतो. आमचा कोथरूड ग्रुप मधला चवथा member अनिकेत पण खरं US मधेच आहे... पण त्यानी as usual कहितरी माज करून ट्रिप ला यायला जमणार नाही असं सांगितलं..(पण बहूतेक ह्यावेळी कहितरी genuin reason होतं म्हणे..:) निलेश फ़िनीक्स ला असल्याने ग्रॅंड कॅनियन नक्की होतं.. आधी चाललं होतं की लास वेगास ला जाऊ पण तिघांनीही ते पाहिलं असल्याने सॅन डिएगो ला जायचं ठरलं. मुख्य म्हणजे तिघांनी एकत्र मजा करणं महत्त्वाचं होतं... आणि as per my picnic related fundas कंपनी चांगली असली की ठिकाणं immaterial असतं.. (माझ्या roomie चं सध्या ह्या विषयावर वैचारीक चिंतन चालू आहे.. त्या बद्दल detail मधे पुन्हा कधितरी.. :) सुक्रुत ची त्यावेळेला सुट्टी चालू असल्याने ट्रिप च्या planning ची सगळी जबाबदारी proactively त्यानीच घेतली. अगदी माझं flight चं deal पण त्यानीच शोधलं.
१ सप्टेंबर ला संध्याकाळी flight नी निघून साधारण ६.३० ला मी फिनीक्स मधे पोचलो.. security मधे वाटला तेव्हडा त्रास झाला नाही... air port ला पोचल्यावर नेहमी प्रमाणे सुक्रुत आणि निलेश ला झालेला उशिर, मग आल्यावर मी वेगळी कडे उभा ते वेग्ळ्याच गेट ला गेलेले मग फोनाफोनी हे सगळं नित्यनियमाने पार पडल्यावर आमची एक्दाची भेट झाली.. सुक्रुत अमेरिकेला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच एकत्र भेटत होतो.. खूप जबरी वाटलं.. कॉलेज च्या दिवसांची आठ्वण झाली... Enterprise car rental मधून माझी आवडती Pontiac grand prix घेतली.. गाडी एकदम नविन कोरी होती.. फ़क्त ८०० मैल चाललेली.. साधारण ८.३० चा सुमारास ग्रॅंड कॅनियन कडे प्रयाण केले.. बाहेर पडता पडता फ़िनिक्स शहराचं दर्शन झालं.. अमेरीकेच्या एकदम south ला असलेल्या ऍरिझोना राज्यातलं हे मोठ शहर.. south ला असल्याने खूप उन्हाळा आणि सगळी कडे वाळवंट.. शहरात मधे मधे रस्त्यांवर देखिल निवडूंगाची झाडं आहेत.. ऍरिझोना राज्याचं चिन्ह सुद्धा निवडूंगाचं झाडंच आहे..शहर छान आटोपशिर आहे...मी पोचलो तेवहा तिथे जवळ जवळ ४० deg. temp होतं...ग्रॅंड कॅनियन फ़िनिक्स च्या उत्तरेला तसच उंचावर आहे.. रस्ता वळणावळणाचा आणि बर्याच डोंगरांमधून जाणारा होता..निलेश गाडीत बसल्याबसल्या लगेचच झोपला.. माझी आणि सुक्रुत ची अखंड बडबड चालू होती...मी माझ्या CDs न्यायला विसरल्याने गाडीत पूर्ण वेळ रॅप नावाचा प्रकार चालू होता..लोक ते एव्ह्ड्या आवडीने का ऐकतात काय माहित.. एकाच सुरात अखंड पणे काहितरी म्हणSSSSत बसतात.. ना सूर ना ताल..हे मी सुक्रुत आणि निलेश ला सांगितल्यावर त्यांनी माला "गाढवाला गुळाची चव काय" types look दिले.. :)
साधारण शेवटचा अर्धा तास हायवे संपून लहान रस्त्यावारुन drive होता.. त्या रस्त्यावर इतका अंधार होता कि आम्हाला वाटलं आम्ही चूकलो.. म्हणून सुमारे १० मैल परत्त उलट दिशेला आलो..पण रस्ता तोच असल्याच कळलं.. तिथून Grand Canyon National Park ची हद्द चालू होत होती त्यामूळे speed limit पण बरच कमी होतं.. मधेच १०-१२ हरीणांचा एक कळप रस्ता ओलांडून गेला...आणि रस्त्याच्या कडेला एक सांबर पण सामाधी लावल्यासारखं स्तब्ध उभं होतं.. आम्ही त्यारात्री camping करणार होतो.. Camp site शोधल्यावर बरोबर नेलेला तंबू उभारला..

तंबू उभारत असताना लक्षात आलं की बाहेर चांगलीच थंडी आहे.. फ़िनिक्स मधलं ४० deg आणि इथलं १०/१२ deg.. हवेत खूपच फ़रक होता.. आमच्या कडे २ च sleeping bags असल्याने रात्री खूपच जास्त थंडी वाजायला लागली... शेवटी मी गाडीत जाउन full blow वर heater लावून झोपलो..
सकाळी उठल्यावर आजुबाजूचा परीसर दिसला.. खूपच छान होता.. जंगल, थंड हवा, पक्षांची किलबिल, झाडीत मधेमधे उभारलेले तंबू आणि नुकताच होत असलेला सूर्योदय सगळ खूप छान होतं... इथे camp sites पण एकदम सोईस्कर असतात.. म्हणजे आसपास एखादं दुकान, shower rooms, rest rooms वगैरे सगळं असतं पण त्यामुळे camping खोटं खोटं वाटतं.. आपल्याकडे गडावर जाऊन राहिल्यावर जसा अनूभव येतो तसं नाही वाटतं..
सकाळी photo session करून झाल्यावर आणि आवरून झाल्यावर (स्वतःला पण आणि तंबू पण)आम्ही बाहेर पडलो..Grand Canyon National Park मधे स्वत:चे २/३ bus routs आहेत.. ह्या सर्व बसेस natural gas वर चालतात आणि मुख्य म्हणजे free आहेत.. :) ह्यामधला red route आहे तो canyon च्या rim जवळून जातो आणि प्रत्येक point ला stop आहे... ही बस पहिल्या stop वर आल्यावर Grand Canyon चं पहिलं दर्शन झालं..आहाहा.. !!! खोल खोल दरी आणि डोंगरांचे errorion मुळे झालेले आकार, प्रत्येक डोंगरावर मातिची वेगळ्य़ा रंगाची shade आणि नजर पोहोचते तिथ पर्यंत हेच द्रुष्य.. निसर्ग किती करामती आहे ह्याचा हा उत्तम नमूना आहे...

कोलोरॅडो नदीच्या प्रवाहा मूळे आणि जमिनीतील इतर हालचालींमूळे हा अजस्त्र canyon तयार झाला आहे...दरीमधे एकदम खोल कोलोरॅडो नदी दिसते आणि जर तिथपर्य़ंत खाली उतरून गेलं तर white water rafting पण करता येतं... Canyon जवळ जवळ २७७ मैल लांब आहे आणि पूर्ण पणे Arizona राज्यात आहे.. इथे राज्याराज्यांमधली स्पर्धा पण खूप जास्त आहे त्यामूळे जिथे तिथे Arizona Arizona लिहिलेलं असतं.. :)

तिथल्या होपी आणि मोहोव पॉईंट वरून खूप सुंदर द्रुष्य दिसतात.. फोटो काढायला लागलं की थांबतवतच नाही.. Hermits Rest हा तिथला शेवटचा पॉईंट आहे जिथे बस जाउ शकते.. आणि मधे मधे बरेच trails आहेत जे खाली नदी पर्यंत जातात... आम्ही एका trail वरुन चालत खाली गेलो पण पूर्ण खाली जाण्याएव्हडा वेळ नव्हता...
 
साधारण चार पर्यंत परत येउन आणि lunch करुन आम्ही फ़िनिक्स च्या परतिच्या प्रवासाला सुरुवात केली.. परत एकदा grand canyon चं दर्शन झालं... जितक्यावेळा पहाल तितकं ते वेगळं आणि सुंदर दिसतं की तिथून निघवतच नाही.. आणि आकारानी देखिल ते इतकं प्रचंड आहे की निसर्गापुढे आपण किती शुल्लक आहोत ह्याची जाणिव होते..
 
जाताना चा drive रात्री होता त्यामुळे आजूबाजूच काही दिसलं नव्हतं पण परतिचा प्रवास दिवसा असल्याने ते ही बघता आलं.. आपल्या कडाच्या घाटांची खूप आठवण झाली.. पावसाळ्यात असतं तस typical वातावरण होतं ! फ़िनिक्स पर्यंत पोचेपर्यंत पाऊस चालू झाला आणि नंतर तो इतका वाढला की गाडी चालवणं अवघड होत होतं... रात्री घरी गेल्यावर इतकी गाढ झोप लागली की मला वाटलं नव्हतं की मी सकाळी लवकर उठू शकेन.. पण आम्ही तिघेही अगदी ७ ला तयार होऊन सॅन डिएगो ला जायला निघालो पण.. !
आधिचे दोन दिवस सुक्रुत नी बराच वेळ गाडी चालवल्याने हा drive मला कारायचा होता...फ़िनिक्स मधून बाहेर पडल्यावरब संपूर्ण वाळवंट होतं... मधे मधे cactus ची झाडं होती.. हा drive मेक्सिको boarder वरून जातो.. युमा नवाच गाव arizona, California आणि Mexico तिन्हीच्या सिमांवर आहे. युमा गावापासून पुढे कॅलिफ़ोर्निया सुरु होतं.. मला वाटलं होतं कॅलिफ़ोर्निया आल्यावर तरी वाळवंट संपेल.. उलट आणखिन वाळूच्या टेकड्या ही दिसायला लागल्या.. मला तर dubai च्या आसपास कुठे drive करतोय का असं वाटत होतं... ऎकलेलं कॅलिफ़ोर्निया आणि बघत होतो ते कॅलिफ़ोर्निया ह्यात फ़ारच जास्त फ़रक होता.. थोड्यावेळाने डोंगर चालू झाले तेही पूर्ण खडकाळं.. एकावर एक दगड रचून ठेव्ल्यासारखे कधिही कोसळतिल की काय असं वाटणारे... दूरदूर पर्यंत एकही झाड दिसत नव्हतं.. एक अतिशय वेगळा अनूभव होता...
 
Speed Limit जास्त असल्याने drive करायला ही खूप मजा येत होती... सॅन डिएगो १० मैंल वर आलं तरी डोंगर संपतच नव्हते... सुक्रुत ला दाट शंका होती की either आम्ही रस्ता चूकलोय किंवा रस्त्यावरच्या पाट्या चूकीच्या आहेत... :) पण नंतर अचानक शहर चालू झालं समूद्र दिसायला लागला... सॅन डिएगो पण छान शहर आहे.. टेकड्यांवर वसलेलं.. Hotel मधे chek-in करून आम्ही लगेच sea world ला गेलो..
इथलं sea world US मधलं सगळ्यात मोठं आहे म्हणे... तिथे प्रचंड गर्दी होती... पण देसी आणि Mexicon लोकच जास्त होते... शामू ह्या Dolphin मश्याचा खेळ बघितला.. Sealc चा Dance पण खूप छान होता... :)इथल्या सगळ्या parks मधे अपंग आणि senior citizan ह्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी खूपच चांगली सोय असते.. त्यामूळे ते ही इतरांएव्ह्डच enjoy करू शकतात... आणि मुख्या म्हणजे बाकीचे लोकं ही co-operate करतात !
 
संध्याकाळी cable car मधून शहराचं सुंदर द्रुष्य दिसत होतं.. हवा देखिल चांगली असल्याने त्यान खूप मजा आली.. sea world मधे जवळ जवळ १० तास घालवून साधारण १२ च्या सुमारास परत आलो... sea wordl हा ही एक चांगला अनूभव होता...सकाळी उठून समुद्र किनार्यवर चककर मारली...
 
सॅन डिएगो हे एक महत्त्वाचे बंदर आहे.. त्यामूळे तिथे बर्याच लहान मोठ्या बोटी नांगरून पडल्या होत्या.. star of India नावाची बोट देखिल होती..
मला संध्याकाळी फ़िनिक्स हून flight पकडायच असल्याने परतिचा प्रवास लवकरच चालू केला... परत एकदा त्या वाळवंटाच सौंदर्य़ अनूभवलं.. :) (ते सुंदर असलं तरी आपल्या कोकणाचं असं कॅलिफ़ोर्निया नको करायला... :)
सुक्रुत आणि निलेश ला घरी सोडून मी air port वर वेळेवर पोचलो आणि flight चालू होताच मनात प्लॅन चालू झाले ते thanks giving च्या long week end चे.. :)

शिकागो..पुन्हा एकदा...


मागच्या आठवड्यात मी माझ्या भावा बरोबर पुन्हा एकदा शिकागो वारी केली... गेल्या वर्षभरातील ही माझी ६ वी शिकागो ट्रिप.. st louis (stl) आणि शिकागो म्हणजे अगदी मुंबई पुण्यासारखं.. म्हणजे मुंबई किंवा पुण्याशी दोन्ही शहरांचं काही साम्य नाही पण येण्याजाण्याच्या द्रुष्टीने अगदी सारखच.. म्हणजे माझा जो मित्र भारतात असताना दर week end ला मुंबई पुणे ये जा करायचा तोच आता stl शिकागो ये जा करतो..
तर हे शिकागो साधारण २५० वर्ष जुनं.. शिकागो नदी च्या परीसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्या वासावरुन नदी ला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण)असं नाव दिलं.. पुढे त्या नदी काठी वसलेल्या शहराचं नाव देखिल तेचं पडलं... पुढे त्याचा अपभ्रंश होत आज प्रचलित असलेलं शिकागो असं नाव झालं.. भौगोलिक द्रुष्टिने अतिशय सोयिच्या ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या पूर्व पश्चिम व्यापार आणि द्ळणवळण शिकागो मार्गे मोठ्या प्रमाणावर चालत असे.. जवळच असलेल्या मिशिगन लेक मुळे पाण्याचा मुबलक साठा होता...त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कारखाने आणि उद्योग वाढले... ह्या सगळ्या कारखान्यामधून येणारं प्रदुषित पाणि पुन्हा लेक मधेच सोडल्याने लेक चं आणि शिकागो नदीच्या पाण्याचं बेसुमार प्रदुषण झालं... ह्यावर पुढे आनेक प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवले जात असे.. शिकागो नदी चे पाणी अजुनही direct पिण्यासाठी वापरत नाहीत.. एव्हडच काय तर ते पोहण्यायोग्य पण नाहिये...दरम्यान शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा जो downtown area आहे तो वसण्यास सुरवात झाली.. उंचच उंच इमारती आणि offices ह्यानी हा परिसर गजबजू लागला... मात्र १८७१ मधे लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला... "The great chicago fire" नावाने ओळखल्या जाणार्या ह्या आगीची व्याप्ती एव्हडी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबी आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला.. त्यावेळेला असलेल्या सोईंच्या अभावमुळे आगीची माहिती fire brigade ला सुमारे ४० मिनीटांनंतर समजली... नदीच्या पाण्यावर प्रदुषणामुळॆ तयार झालेल्या ग्रीस सारख्या जाड थरामुळे ही आग नदी मार्गे ही पसरली... त्यावेळेला कोणी कल्पनाही केली नसेल की एव्ह्ड्या भिषण आगी नंतर हे शहर पुन्हा उभं राहीलं.. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणण होतं की झालं ते चांगलच झालं शहर बांधताना आधी ज्या चूका झाल्या त्या सुधारायची संधी मिळाली..हवामानाच्या द्रुष्टीने शिकागो वाईटच.. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही एकदम भिषण... आपल्याला उन्हाळ्याची तशी सवय असते प्ण थंडीत नको होते..एकतर कधिही पडणारं बर्फ़ आणि बोचरं वारं.. एकदा बर्फ़ पडला की तो थंडी संपेपर्यंत वितळतच नाही..Ice skating, sking सारखे खेळ खेळायला मिळतात पण ते एखाद दिवस बरं वाटत.. लेक मिशीगन पण थंडीत गोठतो...
शिकागोच्या उपनगरांमधे राहाण्याच्या खूप जागा आहेत... अठरा पगड जातिंचे लोक शिकागोत रहातात.. आफ़्रिकन अमेरीकन पण खूप आहेत.. New York आणि washington ला पोलिस बंदोबस्त खूप कडक झाल्यापासून शिकागो आणि LA ही देखिल मह्त्त्वाची गुन्हेगारी केंद्र बनली आहेत...तशिही प्रत्येक बाबतित new york आणि शिकागॊ ची एकमेकांशी स्पर्धा चालू असते..आणि एकमेकांवर jokes करण सुद्धा.. आपल्याकडे जसं मुंबई पूणे चालू असत तसं.. :) (पण काहिही म्हंटलं तरी मुंबई ती मुंबईच तसच new york ते new york च त्याला कासलिही तोड नाही.. !!) New york ला गेल्यावर खूप homely वाटतं.. कारण मुंबई ची खूप आठवण येते.. शिकागो ला तसं होतं नाही त्यामूळे नविन काहितरी बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद मिळतो.. शिकागो down town म्हणजे एकदम happening जागा... इतर शहरांप्रमाणेच इथेही cruise tour मधून sky line चं दर्शन घेता येतं.. संध्याकाळी सूर्यास्त होता होता जर ही cruise tour घेतली तर खरोखरच डोळ्यांचं पारण फ़िटतं..
शिवाय शिकागो नदी मधून जाणारी architechtural tour पण खूप सूंदर आहे... पूर्वी लेक मिशिगन वर US Nevy चं प्रशिक्षण केंद्र (Nevy Pier) होतं... पण पुढे ते बंद करुन त्याचा tourist spot केला गेला... लेक मिशिगन आकाराने प्रचंड असून फ़क्त पाणी गोड असल्याने त्याला लेक म्हण्तात.. नाहितर समुद्र म्हणायचाच लायकीचा...Nevy Pier वर खूप दूकानं आणि खाण्याच्या जागा आहेत.. आणि फोटो काढ्ण्यासाठी खूप spots पण आहेत...चविने खाणार्यांना शिकागो downtown मधे खूप गोष्टी मिळतात...
एका हातात Ben and Jeery किंवा Hagen Dajz चं Ice cream आणि दुसर्या हातात camera सावरत संध्याकाळी cruise ride घेणं किंवा Nevy Pier वर भटकणं... म्हणजे आहाहा.. !! (ही माझ्या सूख म्हणजे नक्की काय असतं.. ह्या blog मधिल एक entry होऊ शकेल.. :)
Sears Tower आणि John honcock ह्या downtown मधल्या २ उंच इमारती.. पैकी sears tower ही सध्याची अमेरीकेतली सग्ळ्यात उंच इमारत आहे... John Hancock च्या ९६ व्या मजल्यावर एक restaurant आहे जे cocktails साठी प्रसिदध आहे.. पण आमच्या पैकी कोणीच पिणारं नसल्याने आम्ही तिथे जाउन फ़क्त फोटो काढून परत आलो होतो.. :)
शिकागो downtown चं रुप मला प्रत्येक ऋतू मधे वेगळं वाटलं.. summeer मधे ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं, fall मधे खेळून दमलेल्या पण तरीही अजून ही खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं असतं पण थंडीची चाहूल लागलेलं असते, भर winter मधे गेलात तर ते थंडीनी पिचून गेलेलं असतं त्यामूळे जरा थकल्यासारखं वाटतं chritsmas चा उत्साह जरी असला तरी तो typical US downtown मधला वाटत नाही, शिष्ठ ब्रिटन ची आठवण होते :), तर spring मधे परत एकदा उन्हाळ्याच्या तयारी ला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी सणासुदीच्या आधिचा काळ वाटतो... chistmas ला अतिशय सुंदर decorations असतात पण तेव्हा थंडी इतकी जास्त होती की फोटो काढताना हात थरथरून मी काढलेले सगळे फोटो हलले.. :(
शिकागो चं O'hare Internation airport म्हणजे US मधलं एक अतिश्य महत्त्वाचं आणि busy airpport.. पण हे "अतिसामान्य" ह्या दर्जात मोडणारं..शिकागो मधे काही बदल करायचा plan असेल तर त्यांनी तो airport सुधारला पाहिजे..
शिकागो मधे अजून एक "बघण्यासारखी" गोष्ट म्हणजे devon street..अगदी लक्ष्मी रोड ची आठवण होते. कसाही traffic, लेन न पाळणं, रस्त्यात कुठेही थांबून राहाणं.. एकदम मस्त वाटतं.. आणि तिथे सगळी Indian दुकानं आहेत खाण्यापासून दागिन्यांपर्यंत सगळं मिळतं.. पटेल लोकांची अगदी रेलचेल आहे.. :)
आपणा भारतियांना अभिमान वाटावा अशी शिकागो मधली एक गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदाचं ऐतिहासिक भाषण झालं ते सभाग्रूह..६ वेळा जाऊन अजूनही मी ते पाहिलेलं नाही.. :(
चला..निदान ते पहाण्याच्या निमित्ताने परत एकदा जायलाच लागणार.. :)
पूर्ण झालेला blog वाचून पाहिल्यावर तो जरा विस्कळित झालाय असं वाटतयं..जाऊ दे आत्ता तो repair करत बसायचा patience नाही.. पुढच्या वेळी जरा बरा लिहायचा प्रयत्न करेन.. !!

Once upon a time in India

26 July 4006,
The results of the on going research in the sea near west coast of India are out and it is concluded that there was a major city in this area around 2000 years ago. The city was capital of a region called Maharashtra. The city had high population density. It was financial capital of the country with lots of industrial areas around.
The records also showed that people from northern India were migrated to the city for jobs resulting in a excessive load on the infrastructure. Lack of maintenance and enhancements in the infrastructure, resulted into flood situations in each monsoon. Global warming enforced gradual increase in sea level leading to decrease in shore areas. Some areas were permanently evacuated because of water not draining out from the houses even after monsoon.
Around 1000 years ago, it was the worst monsoon in city resulting in a unimaginable flood and increase in sea water level because of which northern part of the Iceland completely drawn in the sea. Situation continued in the coming year resulting into whole city vanishing into the water. Researchers have found that there were many sky scrapers and some historic monuments in the city. There was a huge railway network around the city with around 5 Lakh people traveling by railway everyday. It was also found that there was excessive usage of plastic in the city resulting into blockage of the sewage water lines.
Some historical records show that this city was frequently attacked by the terrorists with government failing to control the situations. But the explosion of population was worse the explosions of the bombs as it had long term effects. Because of political interests, the north Indian vote banks were given more importance than maintenance of the city. Scientists have claimed that the city was destroyed because of lack of planning by governments rather than natural disasters.
Research is still going on to find more details about this financial capital. In local language, the city was called as Mumbai.

शेजारी

आज अचानक बर्याच दिवसांनी आमच्या शेजार्याचं दर्शन झालं. तो कधितरी बाहेर बसून चित्र काढत असतो तेव्हा hi hello होतं. पण बाकी काही नाही. एकूण तो जरा अत्रंगीच वाटतो. एकटाच असतो. कधिकधि मूली येतात रात्री (दरवेळी वेगळ्या).
आम्ही वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेजारी रहात असूनही आम्हाला एकमेकांची नावं पण माहीत नाहीत. हाच तर फ़रक आहे भारतात आणि अमेरीकेत.
मला अचानक डोंबिवली ला रहाणार्या आमच्या शेजार्यांची आठवण झाली. तिथे एका मजल्यावर आम्ही ३ कुटूंब अनेक वर्ष एकत्र राहीलो. बाकी २ घरात बरेच लोक बदलले. आमची building होण्याआधी सगळे त्याच गल्लीत वेगवेगळ्या वाड्यांमधे रहात होते. त्यामुळे परिचय आता जवळजवळ २५/३० वर्षांचा आहे. आमच्या अगदी दाराला लागून दार असलेल्या घरात दातार काका आणि माधूरी काकू रहात. ते पूर्ण जगाचे काका काकू. मला आठवतं तेव्हा पासून आमचे शेजारी तेच. माझ्या मोठ्या भावा पासून ते त्याच्या मुलापर्यंतची आसपासची मधली सगळी मुलं काकूच्या मांडीवर खेळली. आणि प्रत्येकाने काकूची साडी एकदातरी खराब केलीच आहे. काकू म्हणायची पण की मोठं झाल्यावर प्रत्येकाकडून एक साडी घेणार आहे. :) त्यांच्या घरात झोपाळा होता त्यामूळे सगळ्या मुलांना त्याचं पण आकर्षण असायचं. लहान मुलं काकू कडे रमत असतं. खाऊ च्या बाबतित लाड पण होतं कारण घरात लाडू, वड्या, चिवडा ह्यापैकी काहितरी नेहमीच केलेलं असे. लाडं होतं असले तरी फ़ाजिल लाड मात्र कधिही होत नसतं. उलट उत्तर देणं, हावरट पणा करणं, आचरटपणा आणि मस्ती करणं ह्यापैकी काही केलं की मात्र चांगला ओरडा मिळतं असे आणि त्या मुलाची घरी रवानगी केली जात असे. अश्या ओरडयाच्या वेळी मग कोणाची आई पण काही बोलत नसे आणि मधे पडत नसे.
कधिकधि काकू क्लास मधे शिकवायला जायची किंवा मग घरीच शिकवणी घ्यायची. बाकी चा वेळ घरीच असे. माझी आजी देखिल घरीच असल्याने त्या दोघिंचं चांगलं जमत असे. त्यांच्या पाकक्रूती च्या शिकवण्या चालतं. मघ कधिकधि कुठल्यातरी वड्यांचा प्रयोग बिघडला की हमखास दुपारी "बघा हो आजी जरा..ह्या वड्यांचा भसका होतोयं." असं म्हणून आमच्या आजीला बोलावणं येई. त्या दोघिंचं rework करुन झालं की अर्थातच वाटी आमच्याकडे ही येई. मी आणि माझा भाऊ दोघेही दिवसभर आजी जवळ असायचो त्यामुळे आजी काय करत्ये हे ओट्यापाशी उभं राहून बघताना स्वैपाकातले फ़ंडे आम्हीही ऐकत असू आणि मग काकू नी काही नविन पदार्थ केला आणि तो बिघडला की आम्हीही बिनधास्तपणे "तुझ्या चिरोट्यांमधे मोहन कमी झालयं " वगैरे काहितरी hi-fi dialouge मारत असू. :)(मग त्या चिरोट्यांमधे मोहन असो अथवा नसो. आणि मुळात मोहन म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही.)
कधि काकूचा भाऊ आला की आसपासच्या झाडांवरच्या कैर्या, जांभळं काढण्याचा कार्यक्रम होत असे आणि त्यालाही काकू चा सक्रीय पाठिंबा असे. क्रिकेट्ची match ही माझी आजी आणि काकू मिळून बघत.. म्हणजे दोघी आपपल्या घरी पण काही घडलं की दार उघडून एकमेकींना सांगणारं की हा आउट झाला, त्याची century झाली etc. सास बहू serials त्यावेळी नसल्याने दोघिंनाही cricket मधे interset होता.
माझ्या आजी ला आणि काकूला दुखणिही अगदी सारखिच होतं. दोघिंनाही थंडीचा त्रास होतं असे आणि दोघिंनाही आयुर्वेदिक औषधं घ्यायची भारी हौस त्यामुळे स्वैपाकाच्या प्रयोगांबरोबर दोघिंचेही वेगवेगळे वैद्य try करणंही चालू असे. आणि कसले कसले लेप, काढे, मात्रा वगैरेंवर चर्चा चालू असत. काका दोघिंनाही खूप चिडवायचे की आजी ७० वर्षांच्या आणि ही ४५ वर्षांची तरीही औषधं मात्र दोघिंची सारखिच. :)
काकूच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या की त्या आणि माझी आजी दुपारी पत्ते खेळतं असतं. कधि आजी गेली नाही की काकू तिला मुद्दामचं बोलावून घेत असे आणि म्हणे "तुम्ही रोज येत जा पत्ते खेळायला.. त्या तेव्हड्याच जरा busy रहतातं." ;)
आमचा मजला सोडला तर आमच्या तिनही कुटूंबांचं इतर कोणाकडे विषेश येणंजाणं होत नसे. तसच काकू स्वतःचा आवडी निवडीं बद्दल ही अगदी ठाम त्यामुळे कोणी काही बोललं की "आम्हाला असच आवडतं" असं म्हणून त्यांची बोळवण होत असे. आणि त्यामुळे दातार family शिष्ठ म्हणून famous. :) जेव्हा काकांनी नविन गाडी घेतली तेव्हा कौतूक बाजूलाच पण वर "दातारीण आधिच शिष्ठ त्यात गाडी घेतली आतातर काय बघायलाच नको. " :D अश्या comments पण ऐकायला मिळाल्या. आणि ह्या comments काकूनेच कुठूनतरी ऐकल्या आणि आम्हाला सांगितल्या.
काका काकू गप्पा मारायला एकदम jolly. आणि किस्से रंगवून सांगण्यात expert. आणि मुख्य म्हणजे कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं ह्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे माझ्या आजी पासून ते माझ्या ४ वर्षांच्या पुतण्या पर्यंत कोणाशीही समोरच्याला bore नं करता बोलू शकतातं. आम्ही पुण्याला रहायला गेल्यावर पण बरेचदा आम्हाला आठवण यायची की आत्ता शेजारी काकू असती तर पट्कन ५/१० मि. timepass करून आलो असतो. अधिक सहावासामुळे अर्थातच माझ्यापेक्षा माझ्या भावावर काका काकूंचा अधिक जिव आहे आणि मग बोलतानाही पट्कन "अमितचे बाबा ,अमितची आजी" असे उल्लेख येतं आणि मग लहानपणी मी पण लगेच "अमितचे बाबा नाही माझे बाबा" असं correction करत असे. :)
मधे आजीची तब्येत खराब झाल्याचं ऐकून काका काकू लगेच पुण्याला येऊन गेले. त्यांचाशी गप्पा झाल्यावर आजीलाही जरा बरं वाटलं. कधिकधि नात्यांपेक्षा सहवासाचे ऋणानुबंध अधिक घट्टं असतात हेच खरं. मी पण आता भारतात जाइन तेव्हा डोंबिवली ला काका काकूं च्या घरी जाइन आणि काकू ला तिची special साबुदाण्याची खिचडी करायला सांगेन आणि हो मुख्य म्हणजे त्यांचाशी भरपूर गप्पा मारेन. :)

विरोध..

काही काही लोक जणू विरोध करण्यासाठीच जन्मलेले असतात...म्हणजे पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे पूणेकर असण्यासाठी प्रत्येक बाबतीत आपलं मत हाणता आलं पाहिजे आणि निषेध नोंदवता आला पाहिजे..पण कायम विरोध करण्यासाठी तुम्ही पूणेकर असायलाच हवं असं नाही..इतरही "करांना" हे व्यसन असू शकतं.. :)
आमच्या lunch table वरही असेच काही विरोधी पक्ष नेते हजर असतात...विषय कोणताही असो म्हण्जे अगदी भारत अमेरीका अणू करार, share market मधल्या उलाढाली किंवा wallmart मधे मिळणार्या toilet धुवायच्या साबणाची quality.. त्यांचा अव्याह्त विरोध चालूच..
कोणी म्हंटल St. Louis पेक्षा chicago शहर किती चांगलं की हे St. Louis पेक्षा chicago चं हवामान विशेष करून थंडी किती वाइट ह्यावर भाषण देणार.. पण कोणी चुकून St.Louis चं कौतूक केलं तर (हे फ़ार कमी वेळा घडतं..:) Chicago downtown वर स्तूतीसुमनं उधळली जाणार.... लांब रहाणार्यांना office ला गाडीने येण्यापेक्षा बसने येणं कधीकधी आरामदायक वाटतं. पण त्यावर उगाच वेळ किती वाया जातो आणि तेव्हडया वेळात आयुष्यात किती काय काय करता येऊ शकतं ह्यावर भाषण मिळ्णार.. पण कोणी गाडीने यायचे फ़ायदे सांगू लागला की त्याला पेट्रोल आणि issurance च्या किमती आणि त्यात वाया जाणारे पैसे ह्याचा हिशोब एकावा लागणार...
अमेरीकेत नविन आलेल्याला "स्वदेस है मेरा.." ची cassette ऐकवली जाणार (स्वतः अमेरीकेत बसून :०) आणि भारतात परत जाऊ इच्छिणार्याला "देस मे क्या रखा है यार..." इथून सुरवात होउन भारतातील भ्रष्टाचार, महागाई, अस्वच्छता, reservations ह्यावर जोरदार भाषण मिळणार.. शेवटी त्या परत जाणार्याची "ticket cancle करतो पण भाषण थांबवा." अशी अवस्था होते.. :)
कोणी garrage sell ला जाणार असेल तर "क्या garrage sell मे सामान खरीदते हो...?" असं म्हणून आपल्याला मिळणारा पगार आणि घरातिल shopping ह्याची सांगड कशी घालावी ह्यावर मोफ़त सल्ले मिळणार पण स्वत:च्या घरातलं सामान मात्र creig list वरूनच खरेदी करणारं... east coast विरुद्ध california, फ़्लोरीडा विरुद्ध bay area, मराठी विरुद्ध भारतातले इतर प्रांत, स्वत: ब्राह्मण किंवा मराठा दोन्ही नसून ही किंबहूना मराठीच नसूनही महारष्ट्रातील ब्राह्मण आणि मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे स्वभाव ह्यावर समोरचा ज्याबाजूने बोलत असेल त्या विरोधी फ़ंडे मारणं हे हि काही आवडीचे विषय.. :)
पण एकदा काय झालं बाकीचे लोकंही भयंकर पेटले आणि ह्या विरोधी पक्ष नेत्यांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो तडाखा इतका जबरदस्त होता की आजकाल हि नेते मंडळी lunch table वर येतच नाहीत.. :) समोरच्याचा स्वभाव बदलणं आपल्या हातात नसतं आणि उगाच ह्या विरोधाला आणखी विरोध करून स्वत: ची शक्ती कशाला वाया घालवा आणि डोक्याला त्रास करा असा सूजाण विचार करून मी हल्ली संभाषणाचा साधारण रोख बघून सलाम नमस्ते style मधे "exactly.... " मला पण असच वाटतं असं म्हणून टाकतो.. :)

अन्नासाठी दाही दिशा...!!!!

कालची संध्याकाळ एकदम happening झाली... office मधून घरी आल्यावर बघितलं तर weather.com वर पाऊस आणि thundestroms च्या alerts येत होत्या.. त्यामूळे मी काही न करता घरी बसायचं ठरवलं.. पण कधी नव्हे ते माझ्या roomies ना Tenis खेळायची हौस आली होती.. माझा भयंकर झोपाळू roomie सुध्दा संध्याकाळी बाहेर पडलेला पाहून अजिबात घरात बसवेना... मी अजून एका मित्राला फोन करून अगदी भोलानाथ style मधे "सांग सांग मलय पाऊस पडेल का?" असं विचारलं..तो बिचारा दमून आलेला, काही कळायच्या आत "नाही" म्हणून बसला.. मग मी लगेच फ़र्मान सोडलं "ठिके.. तयार हो.. आणि खाली ये..आपण swimming ला जाऊ."
swimming ला सूरवात करत नाही तो खरच पाऊस आला... आणि pool वरच्या बाईनी आम्हाला हाकलून दिलं.. :(
घरी येऊन जरा स्थिरस्थावर होत नाही तो बाहेर सोसाट्याचा वारा चालू झालेला.. आणि झाडं पडायला लागली.. आणि तेव्हड्यात एक अतिशय आनंददायक घटना घडली.. Light गेले.. आणि ते पण US मधे.. इथल्या फ़िरंग्यांना लगेच वाटलं असणार की ह्यामागे नक्कीच एखादी अतिरेकी संघटना आहे.. :D.. (आपल्याक्डे bombblast झाले तरी कोणाला असं वाटत नाही...तेही हाल्ली routine झालयं.. load shading सारखं..) पण आम्ही मात्र अगदी जल्लोष केला..US मधल्या इतर ठिकाणी असलेल्या मित्रांना लगेच फोन करून ही बातमी पण सांगितली... पूण्याची खूsssप आठवण झाली.. आधि डोंबिवली ला असतानाही दिवे गेल्यावर खूप धमाल यायची..
इथे दिवे जातिल ह्या शक्यतेचा कधी विचारच न केल्याने मेणबत्त्या, tourch अश्या गोष्टी सहाजिकच तयार नव्ह्यत्या.. मग digital camera मधल्या batteries काढून tourch मधे घाला..(ज्या नेहमी प्रमाणे discharged होत्या..!) कुणाच्या तरी वाढदिवसाला आणलेल्या इंचभर उंचीच्या मेणबत्त्या शोधा आणि त्या पेटवायचा प्रयत्न करा.. असले प्रकार करून झाले.. शेवटी मोबाइल फोन आणि laptop ह्यांच्या उजेडात वावरणं चालू झालं... मेणबत्ती नाही हे कबूल न करता आम्ही किती technologically advanced आहोत ह्यावरच धन्यता मानली...भूक लागायला लागल्यावर मात्र सगळॆच जरा वैतागायला लागले.. कारण cooking range पण electricity वरच चालतो.. मग जोरदार फोनाफोनी चालू झाली... ऐन स्वैपाकाच्यावेळी दिवे गेल्यामूळे सगळ्यांकडे अर्धवट शिजलेलं अन्न होतं.. म्हणजे १ च शिट्टी झालेला भात, juuuuuust फ़ोडणीला टाकलेली भाजी किंवा एकच बाजू भाजून झालेली पोळी वगैरे.. (आमच्या घरी कच्ची maggy होती.. :) म्हणजे एकंदरीत "जेवणेबल" काहीच नव्हतं.. मग काय?? अर्थातच बाहेर जायचा बेत ठरला...3 गाड्याभरून लोकं एकदाची बाहेर पडली..
जवळपासच waffle house मधे जाऊ म्हणून शिरलो तर तिथे waiting list... :o त्या waffle house मधे एरवी काळं कूत्रदेखिल नसतं... आधिच भरलेलं hotel आणि त्यात आम्ही १०-१२ जणं तिथे धडकल्यावर तिथल्या बाईला हर्षवायूच झाला होता.. "फ़क्त २० मि. थांबा देतेच तुम्हाला जागा" असं ती आम्हाला सारखं सांगत होती... पण उगाच तिला अत्त्यानंदानी heart attack वगैरे यायचा म्हणून आम्हीच तिथून सटकलो.. तिथून पूढे Denies मधे जायच तर तिथेही दिवे नव्हते आणि तिथले waiters स्वतःच बाहेर उभे होते.. दरम्यान ३ गाड्यांमधे जोरदार communication चालू होतं... १२ proactive engineers आपआपली डोकी चालवत होते.. शंतनूचं बंगाली मिश्रीत मराठी, माझं आणि अर्पणाचं मराठी मिश्रीत हिंदी आणि एकताचं हिंदी मिश्रीत english अश्या अगम्य भषांमधला "संवाद" आणि त्याच्या जोडीला कौशिकचं भन्नाट stunt driving, अश्विन चे महाभयंकर PJ आणि अमेय आणि मलय ची अखंड बडबड.. एकूण प्रचंड mess चालू होता.. मधे आणखी २ restaurants गेली जी बंद झाली होती किंवा दिवे नव्हते.. मग शहराच्या दूसर्या बाजूला रहाणार्या आमच्या एका senior कडे जाउन "आम्हाला जेवू घाला हो..." अशी request करू अशीही एक कल्पना पूढे आली...
शेवटी taco bell की Pizzahut असे दोनंच option उरले...आणि pizza hut ठरलं.. तिथे आधिच बरच काही काही संपलेलं होतं आणि फ़क्तं "To go" च मिळेल असं तिथल्या माणसाने yahoo messnger वरच्या immotion सारखा सरळ चेहेरा करून सांगितलं... तो नक्की मागच्या जन्मी पुण्यातला दुकानदार असणार... :)
तिथेही महार्चचेनंतर एकदाची order ठरली आणि १५ मिनीटांनी समोर आलेला pizza पोटात ढकलला... खाणं आल्यावर सगळ्यांचे आवाज एकदम बंद आणि ५ ते ७ मि. मधे सगळं फ़स्तं.. अर्थात ते to go असल्याने बाहेर उभं राहून खावं लागलं...
जेवणासाठी घराच्या दाहीबाजूनां वणवण फ़िरून झाल्यानंतर शेवटी एकदाचं आम्हाला जेवण मिळालं आणि आमची पलटण southmoor मधे परतली.. तरीही घरी दिवे आलेलेच नव्हते.. laptop पण discharge होउन बंद झालेले.. मग आम्ही बाहेरच शतपावली करत बसलो... रात्री उशिरा कधितरी दिवे आले आणि घरात दिवाळी झाली.. काल st.Louis मधे दिवे जाण्याचा record break झाला.. एकूण सगळं अगदी homely वाटंलं.. :)

लग्न...??? !!!

परवा बोलता बोलता office मधली एक मैत्रिण अचानक म्हणाली "पराग, तू आता लग्न कर..." मी म्हंटलं "हे काय एकदम...?? आणि कोणाशी करू लग्न??" तर ती म्हणते "मला सांग कशी हवीये बायको..मी शोधते मुलगी... "
मी कधी असा काही विचारच केला नव्हता कशी बायको हवीये वगैरे...थोडा विचार केल्यावर जाणवलं की बर्याच अटी आहेत की आपल्या... पहिली अट म्हणजे open category.. म्हणजे एखादीला reservation चे फ़ायदे मिळत असतील तर लग्न झाल्यावर कशाला उगाच नुकसान? दुसरं म्हणजे खूsssप झोपाळू हवी नाहितर शनिवारी रविवारी पहाटे ११ च्या आधी उठून मलाही उठवून ठेवेल... आमच्या kitchen मधल्या सगळ्या processes पूर्ण पणे follow केल्या पहिजेत आणि रात्री झोपायच्या आधि sink मधली सगळी भांडी घासून जागेवर ठेवली पाहिजेत..(माझा turn असेल तेव्हा मी पण घासेन..no probs..:) सकाळी सकाळी आदल्या दिवशीची भांडी sink मधे दिसली की फ़ार घाण वाटतं..) हो आणि carpet वर shoes घालून फ़िरायचं नाही आणि केस गळत असतिल तर अंघोळ झाल्यावर bath tub साफ़ करायचा...
House wife नको...दिवस भर busy असलेलं बरं असतं.. नाहितर संध्याकाळी चिडचिड, कटकट.. (आमच्या colony मधल्या housewives दिवसभर खूप पकतात... आणि संध्याकाळी नवर्यांना त्रास देतात.. ;)
माझ्याशी प्रत्येक बाबतित वाद घालायची तयारी हवी... (वाद म्हणजे भांडण नव्हे..मतभेद, चर्चा, debate) लगेचच पांढरे निशाण नको... आणि सगळ्यात मुख्य अट म्हणजे कुठल्याही भाषेत बोलताना आणि कुठल्याही भाषिक व्यक्तिशी बोलताना "मुंबई" आणि "पूणे" असच म्हंटलं पाहिजे, "Bombay" किंवा "poona" नाही...बाकी ग्रुह्क्रुत्यदक्ष, नाकीडोळी निटस वगैरे usual अटी apply...
हे सगळं ऐकून माझी ती मैत्रिण म्हणते "जरा अवघड आहे पण try करते..पण माझा तूला सल्ला आहे...अजून एक requirement add कर.." मी म्ह्टलं "काय?" तर ती म्हणते... "जरा sensible हवी... मठ्ठं आणि बिनडोक नको... India ते US प्रवास एकटीने करायची तयारी हवी...." मी म्हंटलं.."ok.. go ahead.. तूच घे test आणि ठरव की sensible आहे की नाही ते.... :)"
पण शेवटी असं ठरलं की मी पून्हा एकदा विचार करून अटी ठरवाव्या म्हणजे तिचं काम सोप्प होईल आणि तो पर्यंत bachelor's life enjoy करावं.. :)

मागे वळून पहाताना..

मागे वळून पहाताना...... (मागे वळून पहाताना आज जरा मान दुखत्ये... मी उत्साहाच्या भरात जरा जास्तच swimming केलं..) :।
बापरे ह्या नवीन blog ची सुरुवात ह्या महा P. J. नी झाली...:D..
हं तर मागे वळून पहाताना.. मला St.Louis ला येउन परवा १ वर्ष झालं.. सहजच मनात वर्षभरात घडून गेलेल्या अनेक घटना आल्या...
घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. तसच कामानिमीत्त परदेशी देखिल पहिल्यांदाच येत होतो...त्यामुळे एकूणच उत्सूकता खूप होती... St.Louis(stl) ला office मधलेच बरेच ओळखिचे आधीपासून होते त्यामुळे जास्त त्रास होणार नाही असा अंदाज होता...
सुरवातीला इथे खूप उन्हाळा होता...तसच stl खूप मोठ शहर नसल्याने आपण अमेरीकेत आहोत असं वाटायचच नाही... घराच्या आसपासचा परीसर खूप छान वाटला... टेनिस कोर्टपण असल्याने खूप मजा यायची.. पहिला अठवडा ज्यांच्याकडे रहात होतो तिथे अगदी पुणेरी पाहूणचार झाला... :) पहिल्याच दिवशी "काही हवं आहे का असं विचारलं जाणार नाही... पाहीजे असेल तर हाताने घ्यावं." अशी खास पूणेरी भाषेत सुचना मिळाली (फ़क्त पाटिच लवायची बाकी राहीली होती.. :P)... नंतर स्वतःच्या घरी रहायल्या गेल्यावर नव्याची नवलाई खूप enjoy केली.. स्वतःचं असं घर पहिल्यांदाच असल्याने ते लावताना, सजवताना खूप छान वाटायचं... घर आणि परीसर छान असला तरी office आणि shopping च्या द्रुष्टीने अतिशय गैरसोयीचा होता... Public Transport नसल्याने आणि आमच्याजवळ गाडी पण नसल्याने सारखं कोणावर तरी अवलंबून रहावं लागायचं... दिपकनी गाडी लवकर घेतल्याने बरीच सोय झाली.. आणि तो मद्त पण खूप करायचा... मी अमेरीकेत पहिल्यांदाच आलो असल्याने creidt history नावाचा प्रकार नव्हता..त्यामूळे bank account, credit card, mobile हे सगळं करताना खूप त्रास झाला...कधिकधि माझी खूप चिडचिड व्ह्यायची.. आणि मग "बास झालं US..दिपक ला मी सांगून टाकणारे की मला परत पाठव.." असं मी जाहीर करून टाकायचो.. :) एकदातर मी चिडून रात्री १०:३० ला gym मधे गेलो होतो..!!! हया सगळ्या प्रकारात माणस ओळखणं मात्र बरच कळायला लागलं.. खर मदत करणारं कोण आणि नुसतच बोलबच्चन कोण हे ओळखता यायला लागलं..
बरोबरीने अमेरीका अनूभवणं चालूच होतं.. shopping malls, cars, parties, bowling, movies हे सगळं चालू होतं.. तसच स्वयपाक करणं हाही एक रोजचा अनूभव होता.. कधिकधि प्रयोग पण चालायचे आणि मग थालिपीठ जळलं की "जळलं नाही खमंग लागण्यासाठी मुद्दामच जास्त भाजलय" वगैरे खूलासे चालायचे.. :) माझे rommies ही एकदम चांगले असल्याने निदान घरात तरी issues नव्ह्ते...
इथे आल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी आमची गाडी आली..त्यावेळी पण खूप आनंद झाला होता... गाडीच डिल चांगलं होतं आणि मझ्या car partner कडे license नसल्याने सुरवातीच्या दिवसात गाडी चालवायची हौस भागवून घेता आली.. :) आम्ही गाडीच्या फोटोंचा एक portfolio च बनवला होता.. :)
तोपर्यंत routine पण बर्यापैकी बसलं होतं...
दरम्यान गणपती, नवरात्री आणि दांडीया, बंगाली दुर्गापूजा असे सण इथे साजरे करणं चालू होतं... भारताबाहेर आल्यावर तुम्ही फ़क्त "भारतीय" असता.. मराठी, बंगाली, गुजराथी अश्या इतर काही ओळखी नसतात...त्यामूळे सगळेच जण सगळ्या सणांमधे हौशीनी सहभागी होतात... प्रत्येक long week end पण उत्साहात चालला होता... दरम्यान आई बाबांची इथे चक्कर झाली... त्यांना सगळ दाखवताना, फ़िरवताना खूप मजा आली... आणि त्याचा मुक्काम दिवाळी च्या वेळी असल्याने खूपच मजा आली... मुख्यम्हणजे दिवाळी आहे असं वाटत होतं...
पहिल्या ५ महिन्यात माझ्या नायगारा, शिकागो, फ़्लोरीडा, लास वेगास, LA अश्या ५ मोठ्या ट्रिप झाल्या... त्यापैकी LA, LV ला आई बाबा बरोबर होते... ते परत गेल्यानंतर मात्र महिनाभर खूप bore झालं...त्यात माझा १ rommie अश्विन भारतात परत गेला...तो माझा US मधला अगदी best friend होता... आणि दूसरा roomie त्याची family आल्यामूळे दूसरीकडे राहायला गेला...त्यामूळे आणखिनच bore :(...
अमेरीकेतल्या उन्हाळ्याची किंमत इथे एक हिवाळा काढल्यावर कळते...भयंकर गारठा, वेळी अवेळी पडणारा पाउस, वारा आणि बर्फ़ ह्यानी काही करता येत नाही.. :( तरी पण आम्ही उत्साही लोकांनी gym, shopping, parties हे सगळं नित्यनियमाने चालू ठेवलं होतं...हिवाळ्यात वाईट हवामान, खूप काम आणि सूट्टी नाही ह्यामूळे एकंदर आयूष्य बरच रटाळ चाललं होतं... मग त्यावर उपाय म्हणून New York चि ट्रिप झाली... New York खूप सुंदर शहर आहे आणि अगदी मुंबई ची आठवण होते....
वर्षभरात अनूभव चिक्कार आले.. चांगलेही आणि वाईट ही...माणसही खूप प्रकारची भेटली...हिशोबावरून भयंकर कट्कट करणारे, कामापूरता मामा प्रव्रुत्तिचे, लायकी नसताना माज करणारे, तोंडावर गोड आणि मदत करायची वेळ आली की हात वर करणारे लोक भेटले तसेच माझ्यापेक्षा बराच senior आणि अबोल पण तरीही मी कधी गप्प बसलो तर मला "बरं वाटत नाहीये का? चहा करून देऊ का?" असं विचारणारा माझा rommie नरेश, घरी गोड पदार्थ केले की आवर्जून बोलावणारी अर्पणा, होळीच्या दिवशी मला दूकानात पूरण पोळ्या मिंळाल्या नाहीत म्हणून स्वतः घरी बनवून देणारी हिमाली... मला air port वर घ्यायला येणारे आणि सुरवातिच्या काळात मदत करणारे अशिष आणि प्रिया, माझ्या सारख्या dance अजिबात न येणार्या माणसाला salsa dance चे funde न थकता देणारी मंजिरी, कुठच्याही बाबतित वाद न घालणारा आणि कधिही न चिडणारा (जे मला अजिबात जमत नाही) माझा car partner कौशिक आणि माझा नविन roomie अमेय, stl मधे नसलेले तरिही लागेल तेव्हा फोन वर funde देणारे श्रिष माणि श्रवंती आणि ज्याच्या बरोबर मी खूप timepass, मस्ती, मारामारी अगदी भांडण सुध्दा केलं असा अश्विन (तो कालच इथे परत आलाय.. :) हे देखिल भेटले... आणि ह्या सगळ्यांमुळेच घरापासून लांब राहून ही इथल वास्तव्य बरच सुसह्य झालं... इथली मैत्री अर्थातच शाळा, college मधल्या इतकी खोल नाही आणि बर्याचदा प्रासंगिक असते पण हाही एक अनूभव च होता...
अजून किती दिवस इथे रहायचय माहित नाही पण पुढील दिवशी चांगले जातिल आणि मुख्य म्हणजे माझ खूप फ़िरून आणि बघून होइल आशी अपेक्षा आहे.. :)

सुख म्हणजे नक्की काय असतं...??

शुक्रवारी संध्याकाळी कुठेही पार्टीला न जाता घरीच बसावं.... साधाच पण ताजा आणि गरम वरण भात खाऊन लवकर झोपून जावं...शनीवारी सुट्टी असूनही पहाटे (?) ९ वाजता स्वत:हून जाग यावी... fresh mood मधे उठून kitchen मधे यावं...पहावं तर rommie नी आदल्यादिवशी ची सगळी भांडी घासून ठेवलेली असावी... स्वच्छ kitchen मधे छान चहा बनवून patio मधे बसून तो प्यावा... एकीकडे सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधल्या ताज्या बातम्या वाचाव्या..(अर्थात laptop वर...) बाहेर छान ऊन पडलेल असावं.. (हो..!!! US मधे उन्हाला छान म्हणतात...!) बाहेर पडून gym मधे जावं.. तास भर छान व्यायाम करावा.. gym मधेच एकीकडे टिव्ही वर एखादी serial किंवा टेनिस पहावं...
नंतर swimming pool मधे मस्त डुंबावं... pool वर मोजकीच पण "छान" लोकं असावी... ज्यामुळे swimming नीट करता येइल...(गर्दी नसली की swimming नीट करता येतं ना..! ) पाण्यात खेळून झालं की घरी येऊन मस्त गरम cofee प्यावी...tub मधे मनसोक्त अंघोळ करावी...आवरून याहू वर online जावं.. भारतातल्या मित्र मैत्रिणींशी chat करावं.. किंवा इथल्यांशी फोन वर खूप गप्पा माराव्या... office मधले असतील तर थोडफार gossiping पण करावं..(आजूबाजू ला काय चाल्लय हे महिती हवं ना..!!) जेवणाचं काय करावं ह्याचा विचार करत असताना एखाद्या couple कडून lunch invitation यावं...अत्यानंदानी त्यांच्या कडे जावं.. पोटभर सुग्रास जेवण जेवावं.. घरी येवून काहितरी वाचता वाचता झोपून जावं... तासभर झोप काढल्यावर परत आपोआप जाग यावी... बाहेर छान पाऊस पडत असावा... मस्त आल्याचा चहा पिताना कोणाचा तरी देवळात जायचं का म्हणून फोन यावा.. पावसाळी हवेत silent and romantic गाणी (आमच्या गाडीतल्या एका CD चं नाव silent and romantic songs असं आहे.) ऐकत देवळापर्यंत drive करावा..देवाचं दर्शन घेउन प्रसन्न वातावरणात तिथे १०-१५ mins. बसून रहावं...येतायेता उगाच wallmart किंवा Dierbergs मधे शिरावं.. थोडफार वायफ़ळ shopping करावं...मित्रांचा बाहेर जायचा (dinner) plan अधिच ठरलेला असावा आणि "इतके वाजता ह्या hotel मधे जायचय" असा फोन यावा... कुठल्यातरी फ़िरंगी hotel मधे मस्त sea food किंवा chicken हाणावं.. (त्यातही प्रत्येकाने वेगवेगळी डिश घ्यावी म्हणजे भरपूर पदार्थ खायला मिळतात..) वर ice-cream किंवा desert खावं..(specially Belly's chocolate bar मधे जाऊन...)परत आल्यावर कुणाच्यातरी घरी बसून timepass करावा..किंवा खा खा खाल्लेलं पचवण्यासाठी colony मधे शतपावली करावी... घरी येउन orkut वर timepass करावा..किंवा परत chatting करावं... झोपता झोपता अचानक आठवावं की अरे आज तर शनिवार होता..weekend चा अजून पूर्ण १ दिवस बाकी आहे... :)
सुख म्हणजे आणखिन काय असतं..????

स्मोकी माऊंट्न... (भाग २)

white water rafting चा अनुभव खूपच अफ़लातून होता. सगळ्यांनी खूप enjoy केलं. नंतर बराच वेळ त्याबद्दल बोलणं चालू होतं. तिथे cofee, hot chocolate, chips etc वर ताव मारताना एकीकडे नदी काठचं photo session चालू होतं. परत येताना रस्त्यातही बरेच फोटो कढून झाले. संध्याकाळी Gatlinberg मधे चक्कर मारायचं ठरलं. Gatlinberg एकदम म्स्त शहर आहे. typical hill station सारखं. एक मोठा रस्ता आणि दोन्ही बाजूला दुकानं, hotels, तिथल्या वेगवेगळ्या जागांची माहिती देणारी आणि booking करणारी offices etc. तिथे acquarium, rope way, bus tour etc गोष्टी होत्या. अमेरीकेतल्या इतर acquiarium प्रमाणेच ह्यांनी ही "larget acuarium in USA" अशी जाहिरात केलीच होती. :) आम्ही ह्याच्यापॆकी कश्यातही न जाता नुसताच timepass केला. थोडीफार बारीकसारीक खरेदी, खाणंपिणं हेही चालूच होतं. हे सगंळं होईपर्यंत ८ वाजत आले होते त्यामूळे cabin वर परतून timpass करायचा असं ठरलं. येताना खायच्या पदार्थांची खरेदी झाली आणि पून्हा तो प्रचंड चढ चढून आमची वरात cabin मधे पोचली.
घरी गेल्यावर दिपक आणि पल्लवी नी chiken ची आणि हेमाली आणि हिरल नी veg ची जबाबदारी घेऊन एकदम धडाक्यात कामाला सुरवात केली. बाकीचे आपले (including me :) उगाच काहितरी करतोय असं दाखवून इकडे तिकडे timepass करत होते :). chiken चा वास एकदम मस्त सुटला होता. त्यामुळे cooker चं झाकणं पडेपर्यंही कोणाला धिर नव्हता. दरम्यान veg वाल्यांनी आम्हाला चिडवून खायला सूरवात पण केली. हरप्रकारे प्रयत्न करून एकदाचं ते झाकण उघडलं आणि सगळ्यांनी जेवणावर जोरदार ताव मारला. जेवण झाल्यावर गप्पांचा अड्डा जमला. सगळे होते त्याच जागी हातही नं धूता २-३ तास तसेच बसले होते. आलोकचा वाढदिवस असल्याने cake कापणे, तो त्याच्या तोंडाला लावणे हे सगळंही रात्री १२ ला प्रथेप्रमाणे पार पडलं. :)
आदल्या दिवशी दिपक ने सगळ्यांना लवकर उठवल्याने आज त्याला दोरीने बांधून झोपवा अशी idea अर्पणा ने दिली. शेवटई सग्ळ्यांनीच धमक्या दिल्याने दुसर्या दिवशी त्याने कोणाला उठवायची हिंम्मत केली नाही. :) सगळए नीवांत पणे १०- १०:३० ला उठले. नंतर टिव्ही बघत बसले. मला एकदम रविवारी सकाळी उठून घरी टिव्ही बघत बसायचो त्याची आठवण झाली. chicago च्या मंडळींनी यायला फ़ारच उशिर केला. शेवटी एकदाचे आम्ही १ वाजता बाहेर पडलो. Gatlinberg tourist centre मधे माहिती घेउन पुढे निघालो. smokey mountains मधल्या सर्वात उंच ठिकाणी जायचे होते. गाडी park करून सधारण mile भर चालत जावे लागते. पण तिथे डांबरी रस्ता असल्याने trecking chi मजा येत नाही. फोटो काढायला खूप scope आहे. या ठिकाणी झाडांवर किड लागली आहे. त्यामुळे झाडांची पानं जाऊन खराटे झाले आहेत. पण त्यामुळे फोटो काढायला बरं पडतं. :)

तिथून खाली येउन दुसर्या डोंगराच्या पायथ्याशी गेलो. मधे st. louis हून तिथे आलेली अजून एक gang भेटली. त्या डोंगरावर rainbow waterfall आहे. सुमारे ३ mile चालून जावं लागतं. खूप दाट झाडीतून पायवाट जाते. एकाबाजूला झरा आहे. आम्ही वर जायला सुरूवात केल्यावर लगेचच ग्रुप विभागला गेला. पल्लवी, मी आणि देनीश सगळ्यात पुढे होतो. मधे मधे परत येणारी लोकं भेटत होती. बरेच जणं म्हणत होते की तुमच्याकडे tourch नसेल तर वर जाऊ नका कारण परत येई पर्यंत अंधार पडेल. पण तरीही आम्ही चालतच राहीलो. मधे मधे झरा ओलांडण्यासाठी लाकडी पूल होते. तो rainbow धबधबा फ़ार काही भारी नव्हता. पण तिथे जायला यायला खूप मजा आली. येताना खाली येई पर्यंत अंधार पडलाच होता. आणि भराभर खाली यायच्या नादात सगळे घसरून पडायला लागले. :) पण एकूणच सगळं म्हणजे झाडी, जंगलातला ओला वास, मधेच लांबून कुठूनतरी येणारे पक्ष्यांचे आवाज सगळं छान होतं. निर्सगाच्या सानिध्यात नेहमीच छान वाटत.

घरी परतल्यावर chieken barbecue चा बेत होता. पल्लवी नी एकदम tasty chicken बनवलं होतं. परत आदल्यादिवशी प्रमाणे ३-४ तास गप्पा झाल्या. देनीश mimicry expert असल्याने तो ही कार्य़क्रम झाला. नंतर भांडी dish washer मधे लावायचं काम मला आणि देनीश ला दिलं होतं. overall सग्ळ्या महिलांनी मिळून kitchen मधे खूप पसारा घातला होता. :( (आमचं bachelors चं kitchen पण त्याच्यापेक्षा स्वछ असतं. :P) दुसर्या दिवशी निघायचं होतं. त्याचे plan झाले. ८ पासून सुरूवात होऊन शेवटी १०:३० ही वेळ ठरली आणि प्रत्यक्षात आम्ही ११ ला निघालो. :) त्या cabin मधे एकदम पूणेरी style नी पाट्या लावलेल्या होत्या. e.g कचरा बाहेर ठेवला नाही तर १०$ दंड. किल्ली इथेच ठेवावी, towels तिथेच ठेवावे इत्यादी. :) त्यामूळे ते सगळं तपासण्यात अर्धा तास गेला. येताना Gatlinberg मधे go karting दिसल्यावर तिथे ही जाणं झालं.

येतानाचा प्रवास दिवसा होता त्यामूळे जाताना जे काही बघता आलं नव्हतं ते पण बघता आलं. drive अतिशय प्रेक्षणिय होता. येतानाच्या रस्त्यात Indiana राज्यं पण लागलं. येताना मी पण गाडी चालवली. :) एव्हडी मोठी गाडी मी पहिल्यांदाच चालवत असल्याने अर्पणा ला जरा भिती वाटत होती. पण मझ्यावर लक्ष ठेवायला दिपक ची खास नेमणूक झाली होती.( तरीपण अर्पणा मागे बसून माझ्या बाबांच्या style मधे "पराग, तो truck वाला इकडे येतोय,..तिकडे पोलिस आहे.... ही गाडी गेली की मग lane change कर.." अश्या सूचना देत होती. ..मला खूप हसू येत होतं..:)
देनीश ने गण्यांच्या एव्ह्ड्या CDs आणल्या होत्या की ३ दिवस ऐकूनही त्या संपल्या नव्हत्या. एकूण ट्रिप फारच छान झाली होती. अगदी ऐनवेळी ठरूनही कुठलेही गोंधळ, issues न होता व्यवस्थित पार पडली होती. मुख्य म्हणजे सगळ्यांनी पूरेपूर enjoy केली होती. (म्हणजे निदान वाटत तरी होतं तसं. :) ग्रुप चांगला असेल तर तुम्ही कुठेही गेलात तरी खूप मजा येते आणि ह्या ट्रिप मधे नेमक तेच झालं.
साधारण १० ला आम्ही परत पोचलो. आणि अचानक "oh no... उद्या office" अशी आठवण काढून सगळे वास्तवात परत आले. :)

स्मोकी माऊंट्न... (भाग १)


मागच्या महिन्यात सुट्टी घेउन पुण्याला जाउन आलो. इथे परत येउन बघतो तर सगळे जोरदार memorial day long week end च्या ट्रिप च्या तयारी ला लागले होते. खूप जणांच्य़ा ट्रिप ठरलेल्या होत्या किंवा मी जाउन आलेल्या ठिकाणी जाणार होते. त्यामुळे long week end १५ दिवसांवर येउन ठेपला तरी काही ठरतच नव्हते. मला भिती वाटायला लागली की सुट्टी वाया जाते का काय? अचानक एक दिवस माझा PM म्हणाला तुझं काही ठरलं नसेल तर आपण smokey moutains जाऊ. आजून दोघ जण पण सापडले ज्यांचं काही ठरलेलं नव्ह्तं. पण problem हा होता की ५ जणांपैकी ४ जण married आणि मी एकटाच bachelor (कबाब मे हड्डी). शेवटी असं ठरलं की मला company म्हणून अजून एक bachelor शोधायचा. शोधाशोध केल्यावर कळलं की आमच्याच colony मधे राहाणार्या अणि आमच्या चांग्ल्या ओळखीच्या अजून तिघांचा काही plan झालेला नाही. त्यामुळे ते लगेचचं यायला तयार झाले. अखेर २ couples आणि ४ bachelors असा ८ जणांचा ग्रुप ठरला. त्यातल्या एका couple नी (शंतनू & अर्पणा पाल) smokey आधि पाहिलेलं होतं त्यामुळे ग्रुप ठरल्यावर location वरून "चर्चा" चालू झाली. पण आमच्या PM नी (दिपक) "PM गिरी" करून त्यांना smokey ला चलायला तयार केलं. शंतनू आणि अर्पणा चं २ संध्याकाळी मिळून सुमारे ६ तास डोकं खाऊन आणि माझा स्वत:चा पूर्ण शनिवार घालवून अखेर pigonforge गावात एक cabin ( जंगलातलं अत्याधुनीक सोइंनी सुसज्ज लाकडी घर) आणि ८ जण बसू शकतिल अशी गाडी book केली. आम्ही चौघ (मी, देनीश, शिखा आणि हिरल) तिथे काय काय करता येइल ह्याची शोधाशोध करायला लागलो आणि अर्पणा आणि आमच्या PM च्या "ह्या" (हेमाली), बरोबर घेउन जायच्या गोष्टींची यादी करायला लागल्या. cabin मधे well equiped kitchen असल्याने barbecue चा बेत ठरला होता. शंतनू नी ती यादी इतक्या सुंदर अक्षरात लिहीली की मी ती वाचून इमेल मधे type करताना ice च्या जागी rice आणि बेसन च्या जागी मॆदा लिहीलं आणि त्याच्या अक्षरात नाही माझ्या वाचण्यातच problem आहे असं conclusion निघून अर्पणा आणि हेमाली च्या शिव्या खाव्या लागल्या. निघायच्या दिवशी सकाळी white water rafting चं booking करून आणि driving directions, booking receipts etc च्या printouts घेऊन साधारण २:३० लाच office मधून सटकलो. त्या दिवशी office मधे वातावरण पण मस्तं होतं. जवळ जवळ ६ महिन्यानी long week end असल्याने सगळेच म्हणजे देसी पण आणि फ़िरंगी पण ट्रिप ला जायच्या तयारीत होते.
आमच्या गाडीत सामान ठेवायला जागा खूपच कमी होती त्यामुळे ८ जणांच सगळं सामान गाडीत बसवताना खूप त्रास झाला. पाण्याच्या आणि cold drink च्या बाट्ल्या आणि chips ची पाकीटं तर जागा मिळेल तिथे कोंबली होती. (एकदा पाण्याची बाटली सापडत नसताना हेमाली नी शंतनू ला सांगितलं होतं "जरा जोरात break दाबा. कुठ्ल्यातरी seat खालून पाण्याच्या बाटल्या बाहेर येतिल." :) तर एकंदर सर्व तयारीनीशी आमचा लवाजमा southmoor मधून बाहेर पडला. साधारण १० तासांचा प्रवास होता. आम्ही illinios, kentucky आणि Tenessee राज्यांमधून जाणार होतो.
Illiniose ची हद्द संपून Kentucky सुरू झाल्यावर एकदम हिरवळ आणि झाडी वाढली. (बहुतेक Illiniose आणि Missouri, US मधली भकास राज्ज असावित. st louis- chicago drive फार उदास आहे.) बाहेरील देखावे खूपच सुंदर होते. दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि मधून जाणारा हायवे. फोटो काढायचा मोह आवरत नव्हता. देनिश साहेबांच्या क्रुपे ने गाडीत "समग्र Bobby Deol" गाणी चालू होती. देनिश Bobby Deol चा खूप मोठा fan आहे. कधिही न ऐकलेली गाणीही ऐकून झाली. Bobby Deol ला कळलं की आपल्याला एव्हडा जबरदस्त fan आहे तर त्यालाही आश्चर्यच वाटेल. :) मधे मधे आमचेही अंतक्षरी आणि तत्त्सम प्रकार चालू होते. हिरल आणि शिखा कडे ह्या बाबतित खूप चं नविन idea होत्या. शिखा आणि देनिश चा हिंदी movies अणि गाणी ह्या बद्द्ल चा database ही अफाट आहे. craker barrel मधे मस्त dinner झाल्यावर सगळेच पेंगुळले. दिपक आणि शंतनू एकमेकांना जागं ठेवायचं काम करत होते. एकूण प्रवास चांगला झाला.
Gatlinberge, TN शहरात पोचल्यावर directions बघुन cabin शोधण्याचं काम चालू झालं. त्यावेळेला कल्पनाही आली नाही की आमच्या adventure trip मधलं ते पहिलं "साहस" ठरेल. cabin booking मी केलेलं असल्याने आणि सकाळी मी त्या माण्साशी फोन वर बोललेलो असल्याने एकदम "पराग ला उठवा" असा गलका चालू झाला. आधि एका गल्लीत सुमारे ३ miles जाउनही पुढचा रस्ता येइचना...मग u-turn असा कार्य़क्रम प्रथे प्रमाणे २-३ वेळा पार पडला. अखेर त्या directions मधली शेवटून दुसरी step असलेला रस्ता आला. तो रस्ता म्हणजे जंगलातली, जेमतेम एक गाडी जाऊ शकेल अशी, गल्ली. दोन्ही बाजूंना घनदाट झाडी आणि मिट्ट काळोख. त्या रस्त्यावार u-turn मारायलाही जागा नव्हती. त्यामुळे dead-end पर्यंत जायचं आणि कशिबशी गाडी वळवून परत यायचं असा प्रकार चालू होता. मधे मधे एखादं पडकं घर किंवा तुटकी गाडी दिसत होती. ते सगळं एखाद्या horror movie मधे शोभेल असं होतं. त्या रस्त्यावरच्या सगळ्या गल्या शोधुन संपल्या तरी आमचं cabin कुठे दिसेना. आता मात्र सग्ळ्यांची झोप उडली होती. तेव्ह्ड्यात तिथे एक जरा बरं घर दिसलं. त्याच्यासमोर अधिच गाड्या उभ्या होत्या पण कदाचित दुसरी बाजू आम्हाला दिली असेल असा निष्कर्श काढून आम्ही त्याचं दुसरं दार शोधायचा प्रयत्न करु लागलो. एका दारा समोर आल्यावर तिथला दिवा अपोआप चालू झाला. तेव्हातर सगळे एकदम टरकले होते. शेवटी त्या गल्ली मधून बाहेर निघून main road ला लागायचं ठरलं. ते करत असताना आणखी एक गल्ली दिसली आणि एव्हडं शोधलच आहे तर एथेही पाहू असा विचार करून तिथे शिरलो. तिथे प्रचंड चढ होता आणि आता गडी उलटी मागे जाते की काय अशी भिती वाटायला लागली. अखेर तो गड चढल्यावर अचानक आमचं cabin समोर दिसलं. computer, mobile, map ह्यांचा वापर न करता सगळ्या engineers नी मिळून आखेर cabin शोधून काढलच होतं. :) cabin एकदम छान होतं. ३ बेडरूम, २ toilets, बाहेर मस्त patio, सगळी electronic euipmets आणि सुसज्ज kitchen. तिथे पोचल्यानंतर सगळे भूतांच्या आठवणी काढून हसत होते.

दुसर्या दिवशी सकाळी white water rafting ला जायचा कार्य़क्र्अम होता. दिपक ८ वाजल्यापासूनच सगळ्यांना उठवत होता आणि अगदी office मधल्यासारखं दर १० मिनीटांनी follow-up पण घेत होता. तो पर्यंत महिलामंडळानी kitchen चा ताबा घेउन पोहे आणि चहा बनवला.(चहा पोहे नाही. :) सग्ळ्यांचं आवरे पर्यंत chicago हून येणारा ग्रुप (पल्लवी, आलोक, नील) पण आला. ६ मराठी (त्यातही २ मुंबई २ पूणे आणि २ उत्तर महाराष्ट्र) , २ गुजराथी, २ बंगाली आणि १ उत्तर भारतिय असा अगदी विविधतेत एकता असलेला आमचा ग्रुप होता. :)
white water rafting Tenesse आणि north carolina राज्यांच्या सीमेवर होतं. cabin पासून साधारण १ तासाच्या अंतरावर होतं. तिथे जाता जाता आदल्यादिवअशी रात्री कुठल्या रस्त्यांवरून फ़िरत होतो हेही बघायला मिळालं. :) Gatlinberg आणि pigonforge परीसर खूप सुंदर आहे. अगदी हिमालयातल्या hill stations ची आठवण करून देणारा. खूप घनदाट जंगल, वळ्णावळणाचे रस्ते फोटो कढायला तर खूपच छान. मधे मधे फोटो काढण्यासाठी खास जागा ही तयार केल्या आहेत. आमची ही २-३ photo sessions करून झाली. रस्ते अरूंद असूनही वाहातूक आणि parking अतिशय शिस्तबद्ध होती. (weekend ला आपल्याकडे सिंह्गड वर होणारा mess आठवा.)
whitewater rafting site वर गेल्यावर आधि सगळ्या formalities पूर्ण केल्या. नंतर आम्हा ११ जणांना ५ आणि ६ अश्या २ ग्रुप मधे विभागलं. नंतर आमच्या instructor नी आम्हाला life jacket आणि helmet etc दिलं आणि rafting बद्दलचे फ़ंडे सांगितले. आमचा instructor एकदम उत्साही आणि खूप बडबड्या होता. नंतर आम्हाला एका बस मधून rafting च्या starting point ला नेलं. तिथे पून्हा थोड्या सूचना दिल्यावर rafting चालू झालं. instrctor सांगेल त्याप्रमाणे वल्हं मारत आणि स्वत:चा तोल संभाळत rafting चालू होतं. रबरी बोटीत बसून नदीच्या जोरदार प्रवाहा बरोबर हेलखावे खाणं खरच वर्णन करण्याच्या पलिकडचं आहे.

एकदातरी प्रत्येकाने हा अनूभव घ्यायलाचं हवा. नदी काठाचा परिसर ही अतिशय रम्य होता. आणि instuctor बरीच माहिती देत होता. शिवाय आम्हा सग्ळ्यांना खूप उत्साह असल्याने, raft पाण्यात गोल फिरवणे, प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने raft नेणे अश्या गोष्टी ही तो आमच्याकडून करून घेत होता. rafting साधारण ३ mile होतं आणि सुमारे २ तास लागले. शेवटच्या टप्प्यात नदी संथ आणि खोल असल्याने swimming ही करणं झालं. पण नदीचा प्रवाह खूप संथही नव्हता आणि त्यामूळे दिपक, हेमाली आणि हिरल ला दोरी टाकून पाण्याबाहेर ओढावं लागलं. :)

घर

काल smokey mountains च्या ट्रिप हुन परत आलो. त्याचे प्रवास वर्णन लिहायचा प्रयत्न करेनच नंतर.. पण तिकडून येताना मनात आलेले हे विचार... St Louis जवळ आल्यावर हायवे २७० लागला. तेव्हा एकदम "घर" जवळ आल्यासारख वाटलं.. खरं म्हणजे तिथे जेमतेम वर्षभराचं वास्तव्य... घरी अल्यावर तिथे कुणिच नसणार होतं... roomie सुध्दा ट्रिप ला बाहेर गेला होता.... पण राहाती जागा लळा लावुन जाते हेच खरं.... मागच्या वर्षी अमेरीकेत आलो ते पहिल्यांदाच घराबाहेर पडलेलो.... तेव्हापर्य़ंतचं सगळं शिक्षण, नोकरी घरी राहुनच झालेलं... त्यामुळे हे घर अगदी स्वतंत्र आणि स्वत:चं होतं.... घर मिळालं तेव्हा ४ रिकम्या खोल्या आणि त्यात माझ्या आणि मित्राच्या ३२ किलो वजनाच्या ४ bags असं स्वरूप होतं... हळूहळू सामान बाहेर आलं आणि जागेवर जाऊ लागलं... पण तरीही hall पूर्ण मोकळाच होता.... कुठलिही नवीन गोष्ट आणली की मला खूप आनंद व्हायचा... आणि मी लगेच त्याचे फोटो काढून घरी पाठवायचो...सुरवतीला तर चप्पल ठेवायचा stand, wash basin, bath tub ह्याचे सुद्धा फोटो काढले होते... :) नंतर एकदा टेबल, tv हे ही आलं आणि मग अमचं घर एकदम भरलं... आम्ही ते बरच आवरलेलं ठेवातो... माझ्या आई चा ह्यावर बरेच दिवस विश्वास नव्हता.. :) पण अमच्या colony मधल्या housewives कधी घरी आल्या की "bachelors असुनही तुमचं kitchen किती स्वच्छ आहे" असं certificate देउन जायच्या...
आता सगळ्या वस्तुंच्या जागांची इतकी सवय झाली आहे की जरा जागा बदलली की वस्तू सापडत नाहीत आणि चिडचिड होते... घरी पसारा घातल्यावर आई चा ओरडा का मिळायचा ते आता कळतं... :)
ह्या घरात अजुन किती दिवस राहायचय ते माहित नाही... पण ह्या घराच्या आठवणी मात्र कायम राहातील.,..घरात केलेला timepass, भांडण, मारामारी (?), potluck parties, बघितलेले pictures तसच रात्री जागून केलेलं office चं काम, मित्रांशी तास तास मारलेल्या फोन वरच्या गप्पा ह्या सगाळ्यां बारोबर घराची आठवण कायम येइलच..
आणि हो... आशा आहे की आम्ही असे पर्यंत ते आहे असचं स्वच्छ राहील... :)

Five point some one

पहिला ब्लॉग कशावर लिहावा हे सुचेपर्यंत weekend संपायची वेळ आली. पण ह्या weekend ला १ तरी ब्लॉग लिहायचाच असं ठरवलं होतं.
कालचं चेतन भगत ह्यांचं Five point Someone नावाचं पुस्तक वाचण्यात आलं. IIT सारख्या देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुभवांवर अधारीत हे पुस्तक आहे. खरोखरच कॉलेज मधे होणारी मैत्री किती निखळ असते. मलाही कॉलेजचे दिवस आठवले आणि नकळत तेव्हाचे मित्रं आणि आत्ताचे professional life मधले "मित्र" ह्यांची तुलना झाली. ऑफ़ीस मधेही खूप जवळचे असे मित्र मैत्रिणी आहेत पण overall अनुभव फ़ारच वाइट होता. आणि विशेष करून कामानिमित्त परदेशी अल्यावर.
इथे तुम्ही trip ला एकत्र जाता just to share expenses. तिथे गेल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला हवं ते करणार. ग्रुप मधे एकत्र जाऊन मजा करणे ह्या फ़ार दूरचा गोष्टी. कारण जेव्हा तुम्ही परदेशात मदत किंवा enjoyment करता तेव्हा ती डॉलर मधे करता. किम्मत अर्थातच जास्तं.
कॉलेज canteen मधे ४-५ जणात मिळून खाल्लेला fried rice किंवा noodles, १० जणांना पार्टी द्यायचिये म्हणून १० Rs. च्या ऐवजी सग्ळ्यांनी स्वताहून घेतलेलं स्वस्तातलं ice-cream, नाटकाला prize मिळाल्यावर cultural group मधल्या passout लोकांनी दिलेली पार्टी... हे सगळं आठवलं की आत्ताची हिशोबी मैत्री फ़ारच खुजी वाटते.
ह्या पुस्तकातल्या प्रमाणे आपल्या scotter वरून मित्रांना tripple seat घेउन फ़िरणारा Ryan, केवळ मित्र करताहेत म्हणून त्यांना साथ देणारा आलोक आणि प्रत्येक बाबतित आपल्या मित्रांचा सल्ला घेणारा हरी असा ग्रुप सग्ळ्यांना एकादातरी मिळाला पाहिजे.
काळ मागे जाऊन कॉलेज चे दिवस परत यावे असं आज सारखं वाट्टतयं...... :(

मराठी मधून पहीले लिखाण

अखेर मी baraha download करून मराठी मधून लिहायला सुरुवात केली... जरा अवघड जातय पण हळूहळू सवय होइल.... खूप अवघड पण नाहिये.. पण अगदी सहज पण नहीये.... computer वापरायला सुरुवात केली ते दिवस आठवले... :) Key board वापराची सवय नसताना जशी मजा यायची तसच अत्ता वाट्टय... blogs नवीन सुरु केल्याने अत्ता खूप उत्साह अहे... अणि hopefully तो तसाच राहील.... :)
Namaskar,

Aaj achanak marathi bolgs vachnyat ale... "Marathi Sahitya" , "Masa ani Masoli" ani ankhi kahi lek vachale...Kharokharach khup sunder likhan ahe... Internet cha madhyamatun marathi sahityachi evhdi japanuk karata yeu shakate he pahun kaharach khup bara vatala...
He evhada sagal vachun malahi kahi lihaychi sphurti ali... :) Mhantala needan introduction blog tari lihava... Nantar baghu jamtay ka kahi...

Marathi font var udya pasun prayata karnare... Baghu kitpat kay jamtay...