एक तास शाळेतला...

मी आणि शाळेत..?? हो, म्हण्जे त्याचा जरा किस्साच झाला.. परवा सकाळी सकाळी पेपर मधे बालकुमार चित्रकला स्पर्धेबद्द्ल वाचल आणि (ऑफिस मधला proactiveness घरी दाखवत) निरजला (भावाच्या मुलाला) विचारलं की तू घेणार का भाग ह्या स्पर्धेत.. एरवी फारसा उत्साह न दाखवणारा निरज अचानक हो म्हणाला..आणि माझी अवस्था अगदी "आ बैल.. " का काय म्हणतात ना तशी झाली... कारण मग त्या स्पर्धेची माहिती काढणे, निरज ला तिथे घेऊन जाणे हे सगळं ओघाने आलच.. स्पर्धेची सगळी माहिती काढून झाली आणि जवळात जवळ सेंटर वगैरे शोधून पण झालं... फक्त प्रोब्लेम हाच होता की वेळ रविवार पहाटे ९ ची होती.. !
तो आणि मी दोघेही कसेबसे उठून एकदाचे त्या शाळेत पोचलो.. जाऊन बघतो तर तिथे हीSSSSS एव्हडी गर्दी.. ! आणि एकूणच सगळे पालक आणि त्यांची पोरंटोरं अश्या थाटात थंडी चे कपडे घालून आहे होते की कोणाला काल अगदी पूण्यात snow fall होऊन गेलाय की काय असं वाटावं.. पूण्यात थंडी पडते मान्य पण म्हणून एव्हडं..?? असो..
तर थोड्यावेळाने तिथे मुलांना वर्गान सोडायला सुरुवात झाली.. मुलांपेक्षा त्यांच्या आयांनाच जास्त उत्साहं होता.. शेवटी एक कडक चेहेर्याच्या बाई तिथे आल्या आणि त्यांनी सगळया उत्साही आयांना बाहेर काढलं.. त्या बाईंचा चेहेरा इतका कडक होता की त्यांच्या वर्गात मुलं कशी काय बसतात काय माहीत.. त्या पण बिचर्या एकूण फारच वैतागलेल्या होत्या... त्यांनी कोणत्या मुलाला "which standard you are in?" असं विचारलं की ते कार्ट हमखास "पहिलीत आहे.. कोणत्या वर्गात जाऊ ??" असं मराठीत उत्तर द्यायचं आणि त्यांनी मराठीत विचारलं की "first standard" असं उत्तर त्यमूळे त्यांना नक्की कोणत्या भाषेत बोलावं ते कळत नव्हतं आणि त्या अत्यंत (पूणेरी) त्रासिक आवाजात दोन्ही भाषांत प्रश्ण विचारत होत्या..
स्पर्धा चालू झाल्यावर मी बाकी काही काम नसल्याने उगाच एकडे तिकडे हिंडत होतो... आता रविवारी सकाळी मी कोणाला फोन केले असते तरी मलाच शिव्या बसल्या असत्या..त्यामूळे "इकडे तिकडे चोहीकडे" बघत आणि ऐकत मी फिरत होतो..
एकेठिकाणी मगाचच्याच त्या उत्साही आया आपल्या मुलांच्या भवितव्या बद्दल तावातावानी चर्चा करत होत्या..
एका मुलीला यायला थोडा उशिर झाल्याने तिला शेवटचा कागग मिळाला होता आणि त्यावर कोपर्यात डाग होता आणि तो नेमका तिच्या आई ने पाहिला त्यामूळे ती आपल्या मुलीवर फार मोठा अन्याय झाला आहे कारण त्या डागामुळे त्तिचं बक्षिस गेलं तर तिच्या मनावर विपरीत परीणाम होऊन हे जग एका मोठया चित्रकाराला मुकेल अश्या आशयाचे dialogue तावातावाने इतरांना ऐकवत होती.. !
नंतर त्यांची चर्चा अचानक मुलांचं करियर प्लॅनिंग ह्या विषयावर घसरली.. अजून एका मातेची तिच्या मुलाने IT त career करावं अशी ठाम इच्छा होती आणि त्या द्रुष्टीने त्याच्या analytical abilities सुधाराव्या म्हणून ती त्याला कोणत्या तरी क्लास ला घालणार होती.. मला अगदी जाऊन सांगावसं वाटत होतं की "अहो काकू (!), IT त काम करणार्य़ांना देखिल आपण एखाद्या analysis मधे आपण नक्की काय आणि का करतोय हे कळत नाही.. आणि तुम्ही उगाच त्या लहान मुलाचा कुठल्या तरी क्लास ला घालून छळ का करता??" आता एश्या odd वयाच्या व्यक्तिंना नक्की काय संबोधाव हे मला एक कळतं नाही.. म्हणजे त्यांना टिपिलक मराठी प्रथे प्रमाणॆ काका काकू पण म्हणता येत नाही.. आणि नावाने पण हाक मारता येत नाही.. ! असो..
दुसर्या एका ग्रुप मधे ह्या शाळेत extra curricular activities फारच कमी आहेत त्यामूळे मुलांची personality development होत नाही ह्यावर नापसंती व्यक्त केली जात होती.. तर त्याउलट कुठे बास झाल्या ह्यांच्या activites जरा अभ्यास घा आता.. enaglish, maths नीट आल्या शिवाय आयुष्यत काही राम नाही अशीही मतं व्यक्त होतं होती..
तिथे आलेले बाबा पालक मात्र शांत होते... एकतर बरेच जण रविवार सकाळ ची झोप मोडल्याने वैतागलेले होते.. आणि ते कंपू करून गप्पा मारत नव्हते.. कुठे कोपर्यात उभं राहून मोबाईल वर बोलत किंवा पेपर वाचत होते..
इतक्यात स्पर्धा संपल्याची घंटा वाजली आणि परत त्या कडक चेहेर्याच्या बाई बाहेर आल्या.. "आम्ही सगळ्य़ा मुलांना ओळखत नाही त्यामूळे एकेक मुलगा पुढे आला की पालकांनी पुढे येऊन त्याला घेऊन जा.." असं खरमरीत आवाजात aanounce केलं आणि तिथे ओळख परेड चा कार्येक्रम सुरू झाला.... निरज दिसल्यावर मी पुढे जाऊन सांगितल्यावर त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून "बघून तर वाटत नाही मुलगा बिलगा असेल ह्याला.." अश्या टाईप expression दिले... तितक्यात निरज नी मला "काकाSSS" म्हणून जोरात हाक मारल्यावर त्या बाईंना जरा हायसं वाटलं.. आणि त्यांनी निरज ला सोडलं..
बाहेर आल्या आल्या निरज मला म्हणतो.. "फिश मार्केट मधे काय असतं?? मला फिश मार्केट बघायला जायचय.." आम्ही जरी nonveg अगदी आवडीने खात असलो तरी ते बाहेर त्यामूळे एकारांत कुलोत्पन्नाने अचानक फिश मार्केट मधे जायची इच्छा व्यक्त केल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं.. मी त्याला विचारलं अचानक हे कुठून आठवलं तुला तर तो म्हणतो.. "आतल्या टिचर म्हणत होत्या केव्हडी गर्दी झाली स्पर्धेला शाळेचं अगदी फिश मार्केट करून टाकलय ह्या मुलांनी.. म्हणून मला फिश मार्केट पहायचय.. "
हे ऐकून माझी हसून वाट लागली.. एकूण काय शाळेतला एक तास मात्र एकदम मस्त.. !!!!!

Happy Diwali.....!!

आज Diwali चा पहिला दिवस.. :) एकदम मस्त festive आणि उत्साही वातावरण आहे.. त्याच आनंदात आणि उत्साहात इथे येऊन उगाच काहिबाही खरडावासं वाटलं.. तसं ही गेल्या महिन्यात इथे यायची तारीख ठरल्यापासून इतक्या happening गोष्टी घडल्या पण काही लिहायला जमलच नाही.. एकतर मला जे काही लिहावासं वाटायचं ते मी लिहायला बसेपर्यंत विसरून जायचो नाहितर मग wind up ची कामं असायची..
तर आधी STL मधल्या शेवटच्या दिवसांबद्द्ल..
आमच्या ग्रुप मधल्या तिघांचं परत यायची साधारण आसपासची तारीख ठरली आणि अचानक आमचे जोरदार लाड चालू झाले.. माझे roomies अगदी "जाऊ दे आता काय जाणारच आहे.." ह्या सबबी खाली माझी दादागिरी अगदी पूर्ण सहन करू लागले.. :) रितीप्रमाणे आमची जोरदार farewell party, gifts देणे , आमची भाषणे , मग घरी येऊन ice cream आणि दारू पार्टी हे सगळं देखिल पार पडलं.. आधी मी परत चाललोय हे कोणाच्या पचनीच पडत नव्हतं आणि "हा काय येईल आत्ता परत" किंवा मग "gift द्यायच्या आधी, पुढचे ६ महिने तरी परत येणार नाही अश्या करारावर सही घ्या" वगैरे सर्व comment मारून झाल्या.. ही farewell party झाल्यावरही अनेक जणांकडे individually lunch किंवा dinner ची पण invitations आली होती..थोड्क्यात अगदी केळवणं झाली तिथे.. :D शिवाय आमच्या relacements नी मिळून, जे की नीट settle पण झाले नव्हते त्यांनी पण एका संध्याकाळी स्नॅक्स ला बोलावलं होतं.. :) माझा replacement आल्यानंतर तर मी ऑफिस मधे पण विषेश काम करत नसे.. transition च्या नावाखाली तोच बिचारा सगळं करत असे.. Meanwhile मी तो वेळ आमच्या travel desk शी झगडून singapore airline चं मला हवं ते, हवं तेव्हा पोचणारं अश्या अनेक "अखूड शिंगी बहू दुधी..." वगैरे requirements असलेलं flight booking मिळवण्यात सत्कारणी लावला.. ! शेवटी तर इतकं झालं होतं की माझ्या त्या replacement ला वाटायला लागलं की मी singapore airlines च्या website tesing project वर वगैरे काम करतोय का काय.. :D But SQ simply rocks.. !! अशक्य सही arlines आहे.. आणि शिवाय ३२ किलो bag allowance.. !
आधी आधी मला स्वत:लाच वाटत नव्हत की मी परत चाल्लोय.. पण मग जशी जायची तारीख जवळ आली तस मात्र feel यायला लागलं.. तेव्हा खूप वाटून गेलं की हे सगळं खूSSSSSप miss करणार आहे.. बदल प्रत्येकाला हवा असतो पण existing set up मात्र बदलायचा नसतो.. त्यात माझ्या rommies नी मी जायच्या आदल्या दिवशी surprize pizza party आणि advanced b'day celebration घरी केलं होतं.. आयुष्यातला सगळ्यात दण्क्यात साजरा झालेला वाढदिवस हाच असावा... STL मधे २ केक्स, इथल्या ऑफिस मधे २ आणि शिवाय घरी २.. आणि balloons, cards ओव्हरऑल खूप धमाल.. काहीही विशेष कर्तुत्त्व न करता एव्हडं कौतूक आणि importance मिळणं मी मात्र खूप enjoy केलं.. :)
भारतात येऊन पण घरी, ऑफिस मधे लाड चालूच आहेत.. घरी एकदम साग्रसंगीत फराळ, शिवाय रोज b'fast, घरचा डबा, ऑफिस मधून आल्यावर स्वत:च्या जेवणाची सोय स्वत: करा असे काही प्रकार नसतात.. ! ऑफिस मधे पण टिम माझ्या पेक्षा junior त्यामूळे ते उगाच माझ्याशी फार अदबिने वगैरे बोलतात.. :D seniors ना पण मी आल्याआल्या काम करीन असं फार expect नाहिये.. ;) त्यामुळे त्तिथे ही तसे लाडच म्हणायचे..
दिवाळी चा माहोल तर एकदम मस्त आहे.. घरी फराळाचे डबे भरलेले आहेत, कालच दिवाळी अंक आलेत, फटाक्यांचा आवाज आणि धुराचा वास, कंदिल, पणत्यांचा उजेड, निरज निशांत साठी बनवलेला किल्ला, बाहेर काढलेली रांगोळी, सगळी कडे एकदम चकचकाट..
नाहिये ती फक्त थंडी.. दरवेळी दिवाळी ला पुण्यात असणारी "गुलाबी" थंडी ह्यावेळी आलेल्या अवेळी पावसाने गायब केली बहूतेक..
तर एकूण I am enjoying the celebrations and festivals.. !!!

Wish you all a vey happy Diwali..
May the warmth and splendor, that are a part of this auspicious occasion, fill your life with happiness and bright cheer, and bring to you joy, prosperity and peace, for the whole year…

इस्ट या वेस्ट...

To be or nor to be चा प्रश्ण थोड्य दिवसांपूरता मिटवून किंवा may be तात्पुरता पुढे ढकलून अखेर भारतात आगमन झाले.. !
बाकी अनेSSSक गोष्टी बदलल्या असल्या तरी मुंबई एअरपोर्ट वरचा पसारा, custom ची खाबू गिरी हे मात्र सगळं तसच आहे.. !
पोचल्या पोचल्या घरी बासुंदी पूरी चं मस्त जेवण झालं.. जेटलॅग आणि बासुंदी मधलं जायफळ हे combination १६ तासांच्या "छोट्या" झोपेसाठी एकदम perfect झालं...
कोथरूड चा हुलिया एक्दम बदललाय... कुठे कुठे नविन नविन रस्ते झालेत.. ते पण इतके मोठे की आधिचे रस्ते एकदम लहान लहान गल्ल्या झाल्यात.. प्रचंड बांधकामामूळे "जिकडे तिकडे मातीच माती" अवस्था झालीये... ट्रॅफिक अजून पण तसाच आहे.. in fact खूप जास्त वाढलाय.. ! मी आपलं उगिच yeild करायच्या नादात एका टर्न वर ५/१० मिनिट थांबून राहिलो.. :)
बाहेरचं कशाला आमच्या घरात पण geographical changes झालेत.. आधिच्या खिडक्या गायब, कुठे कुठे नविन खिडक्या, नविन नविन कपाटं, कंपाऊंड वॉलची वाढलेली उंची, जून्या जाऊन नविन आलेल्या २ wheeler आणि असच काही बाही.. निरज निशांत उंच झालेत.. निरज तर एकदम big boy झालाय.. निशू अजून बाळच आहे.. :)
काही काही नातेवाईक, आजी ह्यांच्या दिसण्यात वाढलेल्या वयामूळे नक्कीच नको वाटणार बदल झालाय.. म्हणजे इथून जायच्या अधिची किंवा एकूणच मनात जी इमेज असते त्यापेक्षा समोर वेगळं दिसलं की ते आवडत नाही.. तसं काहिसं झालय..
ऑफिस तर फारच जास्त बदललय.. एकही ओळखिचा चेहेरा नाही.. सगळी कडे कॉलेज सारख वातावरण.. अवाढव्य बिल्डींगज.. अजूनही मला ऑफिस ची Geography झेपत नाही.. कॅंटीन मधे लोकं ४० रुपयांची बाटली घेऊन Gatorade पितात..! आणि चहा कॉफी सारख्या गोष्टी पण ८ रुपयांना मिळतात.. तिथले queues, courtesy वगैरे इथे अजिबातच दिसत नाही... त्यामूळे आपण ते पाळत बसलो तर लिफ्ट २ वेळा येऊन गेली तरी मला त्यात शिरता येत नाही..
ऑफिसच्या area त झालेल्या २ नविन सिग्नल मुळे तिथे ट्रॅफिक आणखिनच वाढलाय.. तिथे जवळच २ नविन फूड जॉंईंट्स झालियेत ती एकदम मस्त आहेत...
एकूण २ विकएंड मिळून बराच खादाड्पणा करून झाला.. आता घरी हळूहळू फराळाच बनवणं चालू झालय..
कालच कर्वे रोड वर गाडी आणि बाईक दोन्ही चालवून झालं... त्यात बाईक भर नळ स्टॉप च्या सिग्नलला बंद पडली.. त्यानंतर मागून हॉर्न चा जो काय भडिमार झालाय त्याने गेल्या २ वर्षांची कसर भरून निघालिये.. :D
आणि गाडी.. गियर बदलायची सवयच गेलीये.. त्यामूळे वळणवर थांबताना तिसर्याच गियर वर असल्याने ३ वेळा गचके खाऊन ती बंद झाली... त्यात परत क्लच ब्रेक चा गोंधळ आणि एकूण सगळा राडा... :D
एकूण दिवाळी ची तयारी जोरदार चालू झालिये.. कंदिल, माळांची मोठी मोठी दुकानं, कपडे, इलेकट्रॉकोक्स च्या दुकानांमधे सेल आणि ऑफर्स.. एकदम चकचकाट.. :)
फटाक्यांचे स्टॉल दिसले नाही विशेष.. लोकं पर्यावरणाबद्दल फारच जागरूक झालेली दिसतायत.. !
घरातलं वायफाय एकदाच सेट झालं.. इंटरनेट क्षेत्रात पण एकदम क्रांती झाल्यासारख जाणवलं.. मी घरी जे काय करतो इंटरनेट वर त्यासाठी हे ब्रॉड्बॅण्ड एकदम सही आहे... बॅंकांनमधल्या बायका (जरी आधिच्या जाऊन नविन young generation) आल्या असल्या तरी तशाच खडून पणे बोलतात.. त्यांना काय बॅंकेतला जॉब चालू करण्याआधी खडूसपणे बोलण्याचं ट्रेनिंग देतात की काय?? आणि हा अनुभव अगदी ICICI सारख्या बँकेतई तोच... मोबाईल मात्र एकादिवसात चालू झाला.. एकदम प्रॉम्प्ट सर्व्हिस.. :)
एकूण काय सध्या एकदम India shining.. ! East ya west India is the best.. वगैरे मी नाही म्हणणार but ofcourse.. it is getting better.. :)

जे जे उत्तम..

"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "

नंदन नी चालू केलेल्या ह्या साखळीत ट्युलिप ने मला गोवलं आणि वर ऑर्कुट, मेसेंजर इत्यादी वर धमक्या पण दिल्या.. त्यामूळे बाकी सगळी काम ठेवून लगेच हा उतारा लिहायला घेतोय.. :)

मध्यंतरी गदिमां च्या "मंतरलेले दिवस" ह्या अनुभव आणि व्यक्तिचित्र संग्रहामधला "बामणाचा पत्रा" हा लेख वाचण्यात आला.. त्यातला हा एक भावलेला उतारा..
-------------------------------------------------------------
" गांवांतील सर्व घरे धाब्याची आहेत. आमच्या ह्या झोपडीच्या माथ्यावरच फक्त पत्रा आहे. वैशिष्ट्याने वस्तूची ओळख जलद पटते.माळावरचा द्न्यानोबा, ढांगुळा सिताराम, तसाच हा बामणाचा पत्रा..
माझ्या येण्याची वार्ता लागताच आमच्या मळ्यावरील माहारीण 'बामाणाच्या पत्र्याखालील जमीन मेंडराच्या हिरव्यागार लिशाने सारावून घेते.मोटर स्टॅंडवरून आणलेले माझे आणि मित्राचे सामान रामिशाची पोरे व्यवस्थितपणे लावून ठेवतात.आईच्या भेटीनंतर मी ताबड्तोब ह्या झोपडीच्या भेटीला येतो. भर उन्हात देखिल या झोपडीच्या दर्शनाने माझे डॊळे थंड होतात.केवळ तीनच बाजूला भिंती असल्याने झोपडीचे स्वरूप धर्मशाळेसारखे दिसते. पाठभिंतीला असलेल्या खुंट्यांवर नाडा, सौंदर, सापत्या इ. शेतीच्या वस्तू लटकत असतात.कोनाड्यांतूण बी बियाणांची गाडगी मृगाची वाट पहात असतात. मी गेलो की तिथल्या ह्या वस्तू अदृश्या होतात. त्या जागी कडक इस्रीचे सदरे, कोट, जाकीटे लटकू लागतात. कोनाड्यामधल्या बियांणांच्या जागा संदर्भग्रंथ घेतात. गोठा म्हणून बांधलेल्या ह्या जागेवर गादी तक्यांची शुभ्र बैठक जमते. तसू तसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून मी लेखन सुरु करतो.
झोपडीला दारच नसल्याने आपण मुक्त आहोत याची सुखद जाण मनात सदैव रहाते. अडथळा नसल्याने पहाटेचा गार वारा सरळ अंगावर येतो आणि झोप जागवतो. अंथरूणावर उठून बसले की पूर्वाकाशांत प्रकाशत असलेला शुक्र पहिले दर्शन देतो. गावात चाललेल्या जात्यांवरील ओव्या झोपलेल्या कावित्त्वशक्तीला जागं करतात. पहाटे वार्यावर येणारा वाढत्या पिकाचा वास हिरव्या चाफ्यासारखा उत्तेजक वाटतो. सारे वातावरणच असे असते की पुन्हा झोप नको वाटते. अश्यावेळी मी एकटाच उठून उभ्या पिकातून हिंडून येतो. दवात भिजलेली जोंधळ्याची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो. तर करडईची काटेरी पाने पायावर पांढर्या बोचर्या रेघोट्या मारतात.
झोपडी मागील विहीरीचे पाणी पहाटे पहाटे अगदी गरम असते. झुंजुरकाच्या प्रकाशात त्यातून निघत असलेल्या वाफादेखिल नजरेस पडतात. बजरंगाचे नाव घेऊन त्या पाण्यात सुळकांडी मारण्यात जो आनंद असतो तो भोगल्यावाचून कळणार नाही. सुस्नात अवस्थेत परत झोपडीवर येईपर्यंत सूर्य उगवून येतो. रानारानातून शेतकर्यांच्या हालचाली चालू होतात. मी बैठकीवर येतो आणि लिहिण्यास प्रारंभ करतो. एकांताच्या परीणामामूळे असो की बीज अंकुरीत करण्याच्या भूमी च्या सामर्थ्याने असो, डोक्यातल्या कल्पना साकार होण्यासाठी धडपडू लागतात. लिहिण्याचे काम एकदा सुरू झाले की मग ते अड्खळत नाही. विचारांची चाती फिरत रहाते, मेंदू कापसासारखा हलका आणि फुगिर होतो; कथानकाचा पिळ्दार धागा अतूट्पणे निघत रहातो. मधेच घराकडून न्याहारी येते. त्यात बाजरीची खरपूस भकरी, लसणीची खमंग चटणी, सायीचे दही अश्या खास ग्रामीण वस्तू असतात. त्यांच्या सेवनाने पोट आहरत नाही की कंटाळा आसपास फिरकत नाही. न्याहारीच्या वेळी सोडलेले बैल पुन्ह्या शिवळ खांद्यावर घेतात तसा मेंदू पुन्हा विचाराखाली मन देतो आणि लिखाणाचे काम निष्ठेने सुरू होते.
झोपडी पूर्वाभिमुख असल्याने सूर्याचा उष्ण उजेड विचारांना आणखीच चैतन्य देतो. अंगाला चटके बसू लागेतोपर्यंत कामाचा वेग उतरत नाही.
दुपार मात्र पोळू लागले. पुन्ह्या स्नानाची गरज भासते. सकाळी गरम असलेले विहीरिचे पाणी दुपारी केळीच्या कालासारखे थंडगार होते. डोळे तांबडेलाला होईपर्यंत मी त्यात डुंबत रहातो. तोवर घरून जेवणाचे बोलावणे येते. आपल्या स्वत:च्या रानात पिकलेल्या शाळूची पांढरी शुभ्र भाकरी, उसातल्या पालेभाज्या, घरच्या गाई म्ह्शींचे दूध दूभते, माणदेशात पिकणार्या गुलाबी तांदळाचा चवदार भात आणि वाढनारी प्रत्यक्ष आई ! जगातल्या कुठल्याही पक्वांन्नाने होणार नाही एव्हडी तृप्ती ह्या जेवणाने होते. मेंदूतले विचार हातपाय पसरतात. त्यांना धावपळ नको वाटते. घरांत उकाडा होत असतो. रानातला पत्रा देखिल त्यावेळी तव्या सारखा तापतो. पाटाच्या कडावर उभ्या असलेल्या गुल्मोहोराच्या गार सावलीचे आकर्षण मला त्यावेळी झोपडी पर्यंत जआऊ देत नाही. उजव्या हाताची उशी करून मी मातितच आडवा होतो. त्या भूमीतली ढेकळे मला रुतत नाहीत, खडे टोचत नाहीत. अगदी गाढ झोप लागले.
चार साडेचार ला उन्हे खाली येतात. कुठून तरी कुणाला तरी कुणीतरी मारत असलेल्या हका ऐकू येत असतात. मग आपोआप जाग येते. गावातील माणसे लोंबत्या चंच्या हातात धरून बोलत बोलत झोपडी कडे येतात. गावात घडून गेलेल्या घटनांवर बातचीत करत ती माणसे झापडं पडेपर्यंत बसून रहातात, पाच साडेपाच वाजता सूर्य मावळतिला जातो. झांजड पड्ते. रानातली गुरे परतू लागतात. कुंभाराच्या लिंबावर कावळ्यांचे संमेलन भरते. पांढर्या बगळ्य़ांचा थवा आकाश उल्लंघून जाताना दिसतो, मग मी फिरायला म्हणून उठतो. बोलत बसलेली मंडळीही येतात. त्यांच्या सुखदु:खाच्या कहाण्यांतून अनेक कथाबिजे निर्माण होतात. पुढल्या मृगासाठी म्हणून ती बियाणे मी डोक्यात साठवून ठेवतो.
किर्रर्र रात्र होते. घराघरांतून दिवे लुकलुकूं लागतात. तो अंधार भयाण वाटत नाही. शांत, अल्ह्याददायक वाटतो.
गावातून जेवणखाण आटोपून आठ-साडेआठ वाजता मी पुन्हा झोपडीत येतो. मध्ये पूर्णपणे विसरलेला लिखाणाचा धागा ठरल्यासारखा विनासायास सापडतो. पुन्हा काम सुरू होते..... "
-----------------------------------------------------------------

मला हे सगळं वर्णन विलक्षण वाटलं. दिवसातल्या प्रत्येक प्रहराचं अतिशय जिवंत वर्णन केलं आहे. शेत, ती झोपडी सगळं कसं डोळ्यासमोर उभं रहातं..

तर आता खो द्यायाचा माझा नंबर... मी ह्यांना टॅग करतो..

पूनम
श्रिष
अभिजीत
संवेद
योगेश

Finally..

Finally my dream came true this year.. Last to last year I was novice in planning trips etc and last year I was not sure about my stay so couldn't plan it (Thanks to my employer!) but this year I knew for sure that I am going to be here during labor day week end. (Against Thanks to my employer).
We started with the planning long back in June when I first saw ad somewhere "US Open 2007 tickets now available online..!". On immediate next day me and my friend Gautam ended up in booking the tickets. Pallavi who was very enthu in visiting open last 2 years ditched me giving some (not so convincing) reasons..! Any ways.. later on Chandana, Shrish and Gautam's mom and sis were also added into our gang.
After hectic week, long and tiring Tennis sessions and gym routines finally Friday arrived. As this was the last long week end in summer, entire southmoor was away on vacation.

We left for New York on early Saturday morning with no agenda other than visiting the Open and decided to come up with the other plans at run time. In both the flights I woke up directly when the air craft touched the ground, but Shrish and Chandana managed to see flushing Meadows from the flight. Both of them were excited on the air port itself.
Gautam and Kaku had just arrived and we found one desi restaurant on Broadway Avenue. First surprise was waiting for us in the restaurant itself. An actress from sex and the city, Miranda, was present there for lunch. Gautam and Chandana were very happy to see her there. (I didn't even know who she was..!!) But it seems the day started with the positive note. After searching the maps and purchasing the metro pass we headed to the Flushing meadows. All of us were very excited about it and upon the getting out from the train we actually ran towards the stadium because we didn't want to miss a single moment. After basic photography and catching up with my college friend Sukrut, we were finally checking into the Billie Jean King National Tennis Center. Atmosphere was great !!!! full of enthusiasm, colorful clothes, cheers and claps coming from surrounding courts, clicks of cameras, people running here and there to attend various matched and what not...

I and Shrish were litereally jumping and cracking PJs like anything in that excitement with Sukrut and Chandana being silent as usual. The big screen out side Arthur Ashe stadium was showing Federer's in progress match which was the last game on Ashe stadium in morning session. Apart from availability of escalator Shrish started climbing the stairs in that excitement and we also followed him. And there we were..!! on Center court with Federer playing against Isner in front of our eyes.. it was simply great.. Crowd was cheering both the players and it was very lively atmosphere. During the break, some dhikchak music was going on and dacing people were captured on the screens. :) Federer won the 4 setter and Mary Jo Fernandez arrived on court to take his interview. I think she looks more cute these days.. ;)


After starting our visit to the open with the bang, it was time to see another great player, Martina Hingis playing on Louis Armstrong. Luckily we got the seats in front rows and could capture some good pics of her but the game was pathetic. It was hard to believe she is the same one who was ruling women tennis few years ago. She lost against unseeded Azarenka. On Grandstand, another seeded player Patty Schnyder lost in exciting 3 setter. It was time for evening session and we returned to Arthur Ashe. While checking the schedule earlier I was very disappointed to see the match between not so well known players, Nikole Vaidisova and Shahar Peer, lined up on Arthur Ashe. But in very few games I realized that I was wrong. Game turned out to be to very exciting and it was feast for the spectators. It was simply impossible to decide who is playing better as both of them were playing deep ground stokes, strong back hands, beautiful volleys and what not. Peer won the tie breaker in the final set and the match as well. We captured many pics of both the players but I realized I should get camera with better zoom for visiting any such events. Next player lined up on the court was James Blake who is native to New York. People were eagerly waiting for that game. But we wanted to end our first day at open at the highest note of the satisfaction and excitement that we got in Peer and Vaidisva game so we decided to leave after clicking some pics of the players.

Second day started bit late at around 11:30 as every one was very tired. That day Gautam, Kaku and Gargi were also coming to the open. They headed for New York attractions earlier than us. Me, Chandana and Shrish went to Central Park after having b'fast around 12. It seems builder lobby in NY is not so strong. It is unimaginable to have such a huge and dense park with public attractions in the heart of the metro city. Downtown and Central park are so close that one can't even realize when the surroundings changed into the tall buildings from the tall rain tress. I think its impossible to have such place in the heart of the city in Indian metros and the big cities with builders keeping eye on temples as well ! We roamed around aimlessly in central park capturing various frames in our digi cams.
Second day at Open started with one more champion Venus Williams who was playing against 5th seeded Ana Inavovic. This year Wimbledon champion simply ruled the Ashe stadium crashing Ivanovic in straight sets. It was great to watch powerful game by Venus. As usual, her sister Serena was sitting in the crowd along with their mother. We could capture her picture with maximum zoom of camera. Not on the court, but at least in stadium we could see Serena. Entire stadium was supporting Venus and she also met their expectations in game and later with her "patriotic" comments in on-court interview. :)

There were not many exciting games going on at that time and we spent time in visiting collection stores and having some food. As a part of typical American strategy everything in the store was very expensive and people including us ended up in spending lot of money on even trivial things. Evening session on Arthur Ashe started with the game for which I was eagerly waiting. It was game between top seeded Justini Henin and Dinara Safina. Again it was just great feeling to watch my favorite player Henin playing on few yards away from me. Game turned out to be completely one sided with Henin ruling with her strong cross court and back hand strokes. We waited in Arthur Ashe hoping that next lined up game between third seeded Djokovik and Porto will be tough one. But Chandana, Gargi and Kaku called us from Grandstand to see Carlos Moya's game where 5th set was in progress. The stadium was completely full and being Spanish Moya had huge support from Latin American tennis fans. Using typical desi techniques we managed to get the seats in 2nd row in that heavily crowded stadium. Moya won the 5 set thriller breaking Kohlschreiber's service in second last game. We could capture his snaps standing few feet away from him.


Meanwhile third seeded Jelena Jankovik was playing against 19th Seeded Bammer on Louis Armstrong. Match was going on very tough. Again we managed to get the seats in 2nd row. This 3 set match also turned out to be thriller with Jankovik managed the victory. It was awesome to see match from so close and we could relate all the things that we generally see on tv like match time clock, speed gun, ball boys' work, cameras, net touch detector, umpires etc. Shrish clicked almost 100 snaps during this game. Later on he also managed to take Jelena's autograph on the ticket. I was also standing very close to her while she was giving autographs but I was so excited with the feeling that I am just 1.5 away feet from rank 3 player and I couldn’t think what to do and I just kept on clicking the photos. An old Mexican lady standing next to me was trying very hard to get the autograph but she was very short so was not able to reach up to Jelena. I grabbed the cap from her hand and went ahead. Earlier she did not understand what I was doing with her cap because there were many other signatures on that cap. Meanwhile Jelena started moving away from us and I shouted 5/6 times requesting her to give the autographs. Finally she turned back and signed on it. :) The lady was soooo happy that she asked me to wear the cap and took the photograph. :D That entire scene was so hilarious that Kaku, Gargi, Gautam, Chandana and Shrish couldn't stop laughing for 10/15 mins. with Shrish and Gautam imitating my shouts!!!!

We called off the day with that match and were talking continuously about the matches that we saw in entire return journey.
Third day started little early as we wanted to me meet my ex-roomie Ameya and his wife Ketaki who were also visiting New York. We had a nice get to gather at Time Square and later on we went to Brooklyn Bridge as we wanted to click the pics of the same during day time. Once again I concluded that this bridge is far better than Golden gate bridge in CA !
Me and Shrish arrived flushing meadows earlier as we had to sort out some problem related to Shrish's shopping, with rest of the folks roaming in Manhattan. After getting that problem resolved we generally entered in one of the court and to our great surprise it was Mahesh Bhupathi and Sania Mirza's mixed doubles game !! We were not at all expecting that we will get to see them. Sania's game was very pathetic and I felt that the folks from Southmoor serve better than her. But yes, her photogenic face gave us good amount of entertainment in terms on clicking the photos. :)
Bhupathi looked very nervous as they lost the game in straight sets.
But it was nice to cheer Indian players out side the country and we shouted a lot. Later on we saw few doubles matches on side courts and then went for the James Blake's game against Tommy Hass. Again entire 23000 people on Ashe stadium were supporting Blake but he lost the 5 set thriller with last set tie breaker. I think one must be mentally very strong to play such game where you have to fight against 1 tennis player and his 23000 supporters.
We finished our remaining shopping and went back to Arthur Ashe to see the last evening session during our visit to the Open. First game between Anna Chakvetadze and Tamira Paszek turned out to be very boring with winner being decided based on least number of unforced errors. I almost slept during this game !! We went out and had some ice cream and we want to gear up for the upcoming game which was between top seeded Roger Federer against Lopez !! We had decided to watch Federer and Henin's games right from their entry to the court. As this was evening session, Federer was in complete black attire rather than his typical blue t-shirt.

This game was a complete power game with rallies not lasting more than 5/6 strokes. This reminded me the Wimbledon matched between Sampras and Ivanisevic. (I wish I could have got chance to watch any of their match!) The game was nice with Federer struggling against Lopez's strong service in first 2 sets. In third set he attacked on Lopez's poor back hand and literally crashed him. It was good come back by Lopez in fourth set but it was too late then. Federer accepted his struggle during first 2 sets in on-court interview. He is so powerful that the signed balls that he threw in audience after the match reached the up to upper promenade. The end of our visit was also with the bang!!
It was one on the great trips that I had in US with lot of excitement, thrill, enjoyment and many nice memories. Now Wimbledon is our next target as we want to see some of the players which we missed in this tournament like Andy Rodick, Naddal, Leander Pase and importantly Maria Sharapova ! Let’s see when we are going to hit the next target. :)

गोष्ट "professional" च्या सासूची...!

P.S. खाली लिहिलेली विनोदी घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून जर कोणा व्यक्ती किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो फक्त योगायोग समजावा.. आणि ह्यात विनोदच नाही असे मत पडल्यास ते आपले वैयक्तिक मत समजावे.. !!

रविवार कसा छान चालला होता...ऑफिस मधला माझा एक खास मित्र आणि त्याची बायको कॅलिफोर्नियाहून माझ्याकडे आले होते.. ते दोघं, मी आणि आमचा अजून एक मित्र बाकीच्या गॅंग ला कलटी देऊन भरपूर भट्कून आलो होतो.. आमच्या इथे चालू झालेल्या नविन देसी रेस्टॉरंट मधे मॅंगो लस्सी आणि मुगाच्या डाळीच्या शिर्यावर आडवा हात मारून झाला होता आणि ते रात्री निघून जवळ्च एका नातेवाईकांकडे drive करून जाणार असल्याने दुपारी घरीच गप्पांचा अड्डा टाकून, संध्याकाळी डाऊनटाऊन मधे चक्कर टाकून यायचा प्लॅन होता... सगळे एकाच कंपनीत काम करत असल्याने गप्पांचा विषय साधारण ऑफिस शी रिलेटेड च होते.. त्यातही बॉसेस ना शिव्या घालणे, कोणाचा बॉस जास्त माठ हे prove करणं असे "जिव्हाळ्याचे" विषय अगदी चविने चघळणं चालू होतं.. त्यात माझा मित्र विवेक mimicry expert असल्याने तमाम दुनियेची acting बघून आमची हसून पुरेवाट झाली होती...
असाच कोणतातरी किस्सा विवेक रंगवून सांगत असताना माझा मोबाईल त्याच्या मंजूळ आवाजात किणकिणला.. आत्ता कोण इतक्या दुपारी दुपारी असा विचार करत मी display बघितला.. "Ajit Joshi Calling...." अशी अक्षरं दाखवत तो मोबाईल जणू दात विचकावून छदमी पणे हसत असल्याचा मला भास झाला... माझ्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं इतक दाट झालं की "चेहेरा जरा सरळ कर नाहितर त्या आठ्यांचा गुंता होईल आणि तो सोडवता पण नाही येणार." अशी खास कोकणस्थी सुचना कम पिजे विवेक च्या बायकोने म्हणजे मनिषा ने केली..!!
तर हा अजित जोशी म्हणजे आमचा एक कॉमन बॉस... स्वत: असतो texas मधे... अगदी "typical boss" category मधला..म्हणजे कोणाला ही पकडून कामाला लावणारा..जे texas मधे आहेत त्यांना तर लावणारचं पण बाकीच्यांना फोन आणि इमेल वर छळणारं...त्याची कोणावार वक्रद्रुष्टी झाली म्हणजे संपलच... अगदी आडनावाला शोभतिल अश्या शैलित शालजोडित ले available असलेल्या सगळ्या माध्यमांमधून म्हणजे emails, phone, messenger आणि शिवाय प्रत्यक्ष तोंडावर आणि ते पण चारचौघात मिळतात.. म्हणजे तुम्हाला "व्यर्थ आपले जिवन" असं सारखं वाटत राहिलं पाहिजे असा त्यामगचा उद्देश... आणि कोणावर कधी कृपाद्रुष्टी होणं ही तर "not applicable" गोष्ट.. आठवडाभर आमच्या माहितीतल्याच एकाला पिळून झालेलं असून देखिल आत रविवारी दुपारी ह्याला माझी "सुपारी" कोणी आणि का दिली असा विचार करतच मी फोन उचलला..
मी ही माझ्या मूळ गावाची दुपारी कोणी फोन केल्यावर त्याला उत्तर द्यायची पध्दत वापरून म्हणजे आवाजात दुपारची झोप मोडल्यावर येणारा त्रासिकपणा शक्य तितका आणून "हॅलो" असं म्हंटलं.. "पराग, अजित बोलतोय.."
"कळलं ते.. आमच्या कडचे मोबाईल caller ID दाखवतात.. आणि तू काय मला पहिल्यांदा नाही पिळतेस..त्यामूळे तुझा नंबर आहे माझ्या कडे.." असं मनातल्या मनात म्हणून प्रत्यक्ष मात्र "ya Ajit Tell me" असं professional उत्तर professional आवाजात दिलं... आता मी जेव्हा ह्याच्याशी मराठीत बोलायला जातो तेव्हा हा मला हिंदित उत्तर देतो मग दोन मराठी माणासांनी एकमेकांशी हिंदित काय बोलायचं असा माझा मराठी बाणा जागा होऊन मी हिंदी पेक्षा english बरी निदान professional .. असा विचार करून त्याला english मधे उत्तर देतो..
पण आज तर हा स्वत:हून मराठीत बोलतोय.. आश्चर्यच आहे..
"पराग जरा काम होतं.."
"आता बिन कामाचा तू मला फोन करायला तू माझा कोण? काका की मामा? लोकं उगाच redundant गोष्टी बोलतात.." हे ही पुन्हा मनातच.. आणि तोंडावर "हां बोल.." !!
"रेखा ची आई येत्ये आज अमेरीकेला आणि त्यांचं फ्लाईट वाया शिकागो आहे.."
आता ही कोण रेखा आणि तिची आई अमेरिकेला येण्याशी तुझा माझा काय संबंध.. "अं.. बरं बरं.." काय बोलावं हे न कळून मी देलेली प्रतिक्रिया..
"म्हणजे माझी सासू रे.. "
....... ह्याची सासू येत्ये???? बरं झालं चांगला सासुरवास केला पाहिजे... बर्याच जाणांचे "दुवांए" मिळतिल त्यांना.. माझा डोळ्यासमोर लगेच हातात जळतं लाकूड घेतलेली ललिता पवार आणि तिच्यासमोर भांडी घासत असलेला हा असं चित्र उभं राहिलं...
"त्यांना त्या एअरपोर्ट वर टर्मिनल बदलायचं आहे.. आणि त्यांना wheel chair मिळाली नाही असा india हुन फोन आला होता... रेखा ला जरा काळजी वाटत्ये जरा तर तू जाऊ शकशिल का जरा please त्यांना दुसर्या टर्मिनल वर सोडायचं आहे फक्त.." घ्या म्हणजे रेखा ला काळजी म्हणून हा फोन..
एकतर कहितरी काम सांगून त्याच्या तोंडून please शब्द ऐकून माझ्या मनात आनंदाची कारंजी बिरंजी उडायला लागली... आणि जावई कसाही असला तरी खुन्नस त्या सासू वर का काढा असा अगदी सभ्य आणि सुसंस्क्रुत घरातल्या मुलासारखा विचार करून मी म्हंटलं "हो जाईन.. matter of 15 mins... shouldn't be a problem.. कधी येणारे फ्लाईट?"
"आत्ता ४ ला.. एअर इंडिया AI 137"
४ ला विमान येणार म्हणजे आम्हाला अर्ध्यातासात निघा... बाहेरच्या ३६ डि च्या चांदण्यात आणि एव्ह्डं खाल्लेलं असताना एअर पोर्ट आणि ते ही ह्याच्या सासूला शोधायला.. अरेरेरे..
"ठिके.. निघतोच आम्ही साधारण अर्ध्यातासात..."
मी फोन ठेऊन बाकिच्या तिघांना हे सांगितल्यावर ते माझ्यावर तुटूनच पडले... "काय गरज होतॊ हो म्हणायची??? उगाच काहिही कामं delegate करायची का? चांगला chance होता बदला घ्यायचा.... bla bla bla..."
शेवटी कसंबसं सगळ्यांना पटवून आम्ही निघालो...
गाडीत बसता बसता लक्षात आलं की आमच्या कडे त्यांचा फ्लाईट नंबर सोडून बाकी काहिच माहिती नाही.. "अरे कमितकमी नाव तरी विचारायचसं..त्या काय पाटी घेऊन उभ्या रहाणार आहेत.. की मी अजितची सासू म्हणून.." मनिषा नी पुन्हा एक कोक्णस्थी dialigue टाकला.. शेवटी मी अजित ला फोन लावला.. आता आपली सासू आज अमेरीकेला येणारे आणि आपला मोबाईल नंबर तिच्याकडे आहे म्हंटल्यावर तो फोन आपल्यापासून कमाल ५ फूटांच्या परिघात ठेवावा एव्हडं तरी त्यांच्या लक्षात येत असावा असं आम्हाला वाटलं होतं.. पण नाही.. शेवटी पंघरा मिनिटं वाजवल्यानंतर तो फोन एकदाचा उचलला..
"तुम्ही try होतात का.. तो फोन आत राहिला आणि आम्ही बाहेर च्या खोलित होतो.. ही ही ही.. "
"नाव काय त्यांचं?" मी घाईघाईत विचारलं..
"मी जोशी.. आणि माझी बायको कुलकर्णी त्यामुळे तिची आई पण कुलकर्णी.. ही ही ही.. वसुमती कुलकर्णी.. "
मी पण उगाच ही ही ही..
"आम्ही ओळ्खणारं कसं त्यांना?"
"साधार्ण ६५ वर्षांच्या आहेत.. चालायला जरा त्रास होतो..."
मागून विवेक ची comment "उनकी त्वच्या से उनके उमर का पता ही नही चला तो??" आणि लगेच मनिष्याची ही comment "आता काय air port वर साठ सत्तरी च्या प्रत्येक देसी बाई ला चालून दाखवायला सांगणार का? त्रास होतोय का नाही ते बघायला?" एकूण ह्या सगळ्या प्रकाराला मनिषा फारच वैतागली होती...
विवेक नको तिथे नको ते dialouges मारण्यात एक्दम expert.. त्यामूळे गाडी चालवताना मी मनिषाला माझ्या शेजारी speaker फोन धरून बसवलं होतं... नाहीतर ह्याच्या comments अजित ला ऐकू जायच्या.. ह्यातली एक जरी comment पलिकडे पोचली असती तरी आमची काही खैर नव्हती..
"दिसतात कश्या साधारण??"
"अगदी रेखा सारख्या दिसतात.. पण साधारण २५ वर्षांनी मोठ्या.. ही ही ही..."
आता आम्ही रेखा ला कुठे बघितलेलं होतं त्यावरून तिच्या आईला ओळखणार... पण इकडे रेखाचं नाव ऐकताच विवेकचे डोळे चमकले..." वा !!! रेखा सारख्या.. २५ वर्षांनी मोठी रेखा.. बाकी काही बदललं तरी ओठांचा चंबू मात्र तसाच राहील.."
लगेच मनिषा ची reaction "अरे मठठा.. तो... bollywood रेखा नाही.. तो त्याच्या बायको बद्दल बोलतोय.."
आज जाणु शिकागो मधल्या समस्त गाड्या बाहेर आल्या होत्या आणि प्रचंड ट्रॅफीक झाला होता...
"साडी किंवा केसांचा चा रंग वगैर माहित आहे का? " मी trafic jam मधे गाडी "हाकत" जो काय सुचेल तो प्रश्ण विचारला..
"अगंSSSS आईंच्या साडी चा रंग माहित आहे का ??" हे मागचं बोलणं.. "कहितरीच..!!! आता भारतातून आई ने निघताना कोणती साडी नेसली हे मला इथे बसून कळणारं... पण हां सकाळी वाहिनी म्हणत होती खरं की तिला मागच्या दिवाळीत मी घेतलेली साडी नेसलिये म्हणून.. कोणता होता हो रंग त्य साडीचा?? बहूतेक निळा होता..."
"आता ते मला कसं माहित असणार?"
"अहो असं काय करता आपणच नव्हतो का गेलो लक्ष्मी रोड ला आणायला...मागच्या सुट्टित..."
"हां हां...ती होय ती लाल होती... " " नाही हो... लाल तुमच्या आई ला घेतली होती.."
"अरे पराग... ही म्हणत्ये निळी साडी.. पण मला वाटतय लाल.. तर बघा साधारण तशाच रंगाची.."
एकडे मी.. "निळी किंवा लाल..??? :। " आणि मागून विवेक.. "अगदी chemistry च्या लॅब मधे लिटमस टेस्ट केल्यासारखं वाटटतयं.. " आणि मागुन त्याच्या पाठित धपाटा मारल्याचा आवाज...
ह्या सगळ्या गडबडीत आम्ही एकदाचे एअर पोर्ट वर पोचलो... तिथे जाऊन बघतो तर ह्या वर्णनाशी जुळ्णारी एकही व्यक्ती तिथे दिसेना... दरम्यान आमच्या इतका वेळ शांत बसलेल्या चौथ्या मित्राने म्हणजे निल ने एक genuin doubt विचारला... "जर त्या भेटल्या तर त्यांना हाक काय मारणारं?? अहो अजित च्या सासू ??? "
मग आज्जी, माई, काकू, मावशी, अहो वसुमती असे अनेक पर्याय शोधून शेवटी typical मध्यम वर्गिय "काकू" final झालं.. ह्या सगळ्या गोंधळात आमच्यातल्या दोघांनी दुसर्या टर्मिनल ला जाऊन त्या तिथे आहेत का हे बघावं असं ठरलं आणि मनिषा आणि निल तिकडे गेले..
मी आणि विवेक नी परत अजित ला फोन केला.. "त्या आम्हाला भेटल्या नाही अजून.. त्या नक्की बसल्या ना विमानात?"
"म्हणजे काय? एव्हडा लांबचा प्रवास उभा राहून करणार का? बसल्या असतिलच की.. ही ही ही..." अरे आवरा ह्याला कोणितरी...इथे आम्ही त्याच्या सासूला शोधतोय आणि ह्याला PJ कसले सुचतायत...पण आम्ही सगळं मनातच बोलणार... !!! आता माझ्याही सहनशक्तिचा अंत होत आला होता.. पूढे काही बोलणार तितक्यात मनिषा चा फोन आला की त्या तिकडे भेटल्या.. मग आम्ही ही तिकडे गेलो.. बघितलं तर त्याच्या साडीचा रंग हिरवा होता...!!!! आणि त्यांनी मोठा काळा woolen चा overcoat घातला होता... ! इतका वेळ झालेल्या सगळ्या गोंधळामूळे आवाजात येणारा नैसर्गिक तुसडेपणा तसाच ठेऊन मनिषा एकदम बरसली.. "अहो काकू बाहेर ४० डिगरी आहे.. आणि तुम्ही woolen कोट कसला घातलाय????" "त्याचं काय झालं ना... खाऊने माझं सामान इतक भरलं की हा कोट ठेवायला जागाच उरली नाही... मग हा कोट घालूनच आले.. नाहीतरी अमेरीकेत थंडी असतेच म्हणतात.. आणि विमानात चांगलीच थंडी होती हो.. त्यामूळे फायदाच झाला कोट चा..."
आम्हाला ही ही ही करायची आता इतकी सवय झाली होती त्यामूळे आम्ही ह्यावर पण ही ही ही .. "आमच्या जावयांनी बराच खाऊ मागावला हो तिकडून... इथे भारतातून कोणी नातेवाईक आले की सगळ्यांना द्यावा लागतो ना म्हणे खाऊ दर वेळी? सांगत होते ते मला"
"अहो साधी लिमलेट ची गोळी जरी दिली ना त्यांनी आम्हाला तरी खूप झालं.. भारतातून आणलेली मिठाई कसले देतायत.." विवेक नी नको तिथे तो dialogue मारलाच..पण सुदैवानं तो काकूंपासून लांब असल्याने त्यांना ऐकू गेलं नाही..
"सगळा खाऊ नेमका check in bag मधे गेला.. नाहीतर दिला असता तुम्हाला...पण माझ्या पर्स मधे श्रिखंडाच्या गोळ्या आहेत.. त्या देते हव्या असतिल तर..."
मनिषा चवताळून काही बोलाणार त्याआधी आम्ही सारवासारवी केली.. " असू दे असू दे.. आम्ही आत्ताच जेवून आलो.. आम्ही तुम्हाला त्या टर्मिनल वर शोधत होतो.. पण तुम्ही आधिच इथे आला होतात.."
"मी आपलं विचारत विचारत आले.. उगाच तुम्हाला त्रास.. आमच्या जावयांचं असंच आहे.. उगाच tension घ्यायचं आणि लोकांना पळवायचं..."
त्यांच्या ह्या एका वाक्याने आम्हाला अत्यानंद झाला.. एव्हडा वेळ आलेल वैताग कुठल्या कुठे पळून गेला आणि "हो हो आम्हाला ही अगदी असंच वाटतं.." असं म्हणून आम्ही त्यांचाशी गप्पा मारू लागलो... :)
शेवटी त्यांना पुढच्या विमानात बसवून दिलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.....

एक सुंदर week end...

हल्ली इथे उन्हाळा चालू असल्याने प्रत्येक week end किंवा long week end नंतर आराम मिळायच्या ऐवजी दमायलाच जास्त होतं... ट्रिप ला गेल्यावर मिळालेला पूSSSर्ण वेळ (आणि घातलेले सगळे पैसे..) utilize करायचा अशी एक देसी mantality असते आणि शिवाय आरामच करायचा तर इथे कशाला आलो घरीच बसलो असतो असा एक "शहाणा" विचार पण असतो..
आणि विक एंड ला stl मधेच असलं तर अनंत हस्ते कमला वराने (वेळ) देता किती "करशील" दोन कराने.. अशी काहिशी अवस्था होते... म्हणजे मला पुस्तक वाचायची असतात आणि "मायबोली", "मराठी ब्लॉग विश्व", "देसी पंडीत" ह्या ठिकाणी ही फेरफटका मारायचा असतो... मला स्वत:ला ब्लॉग लिहायचा असतो आणि बाकिच्यांचे ब्लॉग वाचायचे पण असतात... मला बाहेर जेवायला पण जायचं असतं आणि घरी पण काहितरी लई भारी recepies try करायच्या असतात.. मला YMCA जायचं असतं, टेनिस खेळायचं असतं आणि swimming पण करायचं असतं... उगाच घराबहेरच्या लॉन वर बसून टिवल्याबावल्या करायच्या असतात, ऑफिस, मॅनेजर्स ह्या बद्दल crib मारायच असतं, त्याच वेळी ग्रुप मधल्या मुलींच चाललेलं गॉसिपिंग ऐकायच असतं आणि शिवाय orkut वर कोणाची status बदलली आहेत, कोणची locations change झाली आहेत हे पण बघायचं असतं.. कधी grocery shpoping ला जायचं असतं तर कधी मॉल मधे जायचं असतं.. तर कधी कोणितरी शोधून काढलेल्या एखाद्या नविन ठिकाणी फिरायला जायचं असतं..आणि हे सगळं करून आठवड्याची साठलेली झोप पूर्ण करायची असते.. एकूण काय तर निदान विकएंड तरी (का फक्त विकएंड च) ३६ तासांचे असावेत असं फार वाटतं.. इछा असेल तर इथे करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की "आम्हाला US मधे अगदी बोर होतं" असं रडगाणं गाणार्यांचा पूर्वी मला राग यायचा आता किव येते...
ह्या विकएंड ची सुरूवात खरंतर एकाच्या farewell पार्टी ने होणार होती... पण somehow मला आणि माझ्या rommie ला जायला जमलच नाही.. बाकीची जनता जाऊन आल्यावर आमच्याच घरी तंबू पडला... कितीतरी दिवसांनी rather वर्षांनी sound of music बघितला... एव्हड्या दिवसांनी बघितलेला आणि एव्ह्डा जूना असूनही तो पिक्चर किती ताजा आणि टवटवित आहे.. सुरुवातिला मारिया वर्णन करते त्याप्रमाणे निळे आकाश, हिरवी गार गवतची बेटं, डोंगर, पक्षी हे सगळं किती आनंददायी वाटतं.. खरचं मारीया प्रमाणे लहान गोष्टींमधे सौंदर्य़ शोधून आयुष्याचा आनंद उपभोगण सगळ्यांनाच जमलं तर? "Do re mi" आणि "so long.. farewell" म्हणत सगळ्यांना good night करणारी ती मूलं, "I am 16.. going on 17" म्हणत आपल्या मित्राबरोबर बेधूंद नाचणारी लिसेल, गाण्याचा जादूनी बदलून गेलेला captain, मारिया ची काळजी करणार्या आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणार्या नन्स आणि captain बरोबर Austrain folk dance वर नाचतानाची ती लाजरी आणि लाल झालेली मारीया.. सगळं इतक छान आणि optimistic आहे की दुसर्या दिवशी उठल्यावर मला "आयुष्य किती सुंदर असतं" वगैरे सारखी वाक्य सुचायला लागली.. :)
नंतर घरी आणि भारतातल्या, अमेरीकेतल्या, ऑफिस मधल्या अश्या बर्याच मित्रमैत्रिणींबरोबर फोन, याहू, ओर्कूट, gtalk अश्या all possible माध्यमांद्वारे गप्पा मारून झाल्या आणि मग YMCA त जायचं ठरलं.. शनिवारी दुपारी २ वाजता YMCA त जाणारे आमच्या सारखे उत्साही (किंवा येडे) फारच थोडे लोकं असल्याने अगदी "होल वावर इझ अवर" अशी अवस्था असते... :D नंतर जवळ जवळ २ तास टेनिस खेळणं झालं.. कौशिक बरोबर टेनिस खेळताना बरं असतं तो माझ्या डोक्याला शॉट देत नाही.. नाहितर खेळायचं timepass म्हणून आणि नंतर डोकं भडकलेलं.. तशी शॉट बसायला कारणं काही कमी नसतात.. In fact तो एका स्वतंत्र पोस्ट चा विषय होऊ शकेल.. :)
रात्री मिता नी शोधून काढलेल्या एका अफगाणी रेस्टॉरंट मधे गेलो.. ह्या रेस्टॉरंट च एक चांगलं होतं ते म्हणजे Pure veggies ना देखिल भरपून options available होते.. नाहितर होतं काय की आम्ही चिकन हाणत असताना आणि तंगड्या तोडत असताना ते बिचारे पाला पाचोळा चघळत बसतात.. तिथलं चिकन इतकं tasty आणि soft होतं की अक्षरश: विरघळत होतं तोंडात..
आल्यावर "Life in a metro" नावचा अतिशय हास्यास्पद पिक्चर पाहिला...Page 3 जितका वास्त्ववादी वाटतो त्यापूढे हा अगदिच सुमार आहे... हा पिक्चर पाहून भारतातल्या metro cities मधे काय फक्त भयंकर पिसाट आणि despo लोकं रहातात की काय असं वाटत.. !!!! केके मेनन आणि शिल्पा शेट्टी मधे प्रॉब्लेम काये तेच कळत नाही raather तो कुठे स्पष्ट पणे दाखवलाच नाहिये.. कोंकणा सेन चा तो पंटर सुरूवातिला इतका आचरटपणा करतो आणि नंतर कदाचित त्याच्या आचरटपणा ची आपल्याला सवय होऊन जाते... असो.. आदल्या दिवशी पाहिलेल्या sound of music च्या पार्श्वभूमी वर हा म्हणजे अगदीच "आवरा" वाटला.. :)
तर एकूण चांगली झोप, चांगल खाणं, दोन पिक्चर, जिम,टेनिस, library तून आणलेली दोन पुस्तकं आणि आता हा निरर्थ्क पोस्ट .. विकएंड सत्कारणी लागला म्हणायचा.... :)

विस्कळित...

बरेच दिवस झाले ब्लॉग अपडेट करून... काहितरी लिहायचं होतं पण नक्की काय ते सुचत नव्हतं... काही पोस्ट थोडे लिहून नंतर उडवून टाकले.. तर काही लिहायला चालू केल्यावर मला स्वत:लाच कंटाळवाणे वाटले.. इतरांच्या ब्लॉग्ज वर नजर टाकल्यावर लक्षात आलं की बर्याच जणांची अशीच अवस्था आहे.. प्रत्येकाने आपापल्या style मधे असंच काहीसं व्यक्त केलं आहे.. मग ते अंधाराचे कवडसे सारखं hifi साहित्यिक पदधतिचं असो किंवा मग अबतक छप्पन सारखं काही हलकं फुलक असो... अगदी Tulip च्या style मधे विचारायचं झालं तर.. लिहायचं कशावर?
ontime आणि zero defect झालेल्या महत्वाच्या release वर की काही चूक नसताना आपल्या team वर शेकलेल्या एखाद्या फालतू issue वर?
गेले २ महिने चाललेल्या "to be or not to be" च्या घोळावर की ह्यावर्षी तरी US open ला जाता येणार ह्या आनंदावर.. ?
थंडी संपून उन्हाळा चालू झाल्याच्या आनंदावर की ह्या वर्षीचा उन्हाळाही आंब्याशिवाय गेला ह्या हूरहूरी वर..?
Project कसं smooth चाललयं ह्या बद्दलच्या समाधानावर की सगळी challenges संपून गेली की काय असं वाटून येणार्या वैतागाबद्दल... ?
रश्मी ने अचानक केलेल्या लई भारी मसाला डोश्यांबद्द्ल की मिता ने अगदी आगोदर पासून invitation देऊन खाऊ घातलेल्या tasty पावभाजी बद्दल.. ?

आणि माझ्या limited आणि अगदी छोट्या अश्या विश्वात रोज घडणार तरी काय?
एखादं escalation एखादं appreciation... एखादी movie.. एखादी पार्टी...कधी सगळ्यांनी एकत्र बसून केलेला जबरी timepass तर कधी नको असलेल्या लोकांनी उगिच टपकून डोक्याला दिलेला शॉट..कधी एखाद्या senior नी दाखवलेला समंजसपणा तर कधी त्याच senior नी केलेला माठपणा आणि आपण senior आहोत हे दाखवून देण्यासाठी केलेला अट्टाहास.. कधी घरी फोन करुन झालेल्या मस्त गप्पा..निरज निशांत नी फोन वर केलेला दंगा तर कधी आईने उगाच सांगितलेले कोणत्यातरी नातेवाईकांचे आचरट किस्से...
कधी दुसर्यादिवशी लवकर उठायचय हे माहित असूनही अजिबात न येणारी झोप.. तर कधी शुक्रवारी रात्री देखिल अजिबात उघडे न रहाणारे डोळे...
एकूण काय तर विचारंचा गुंता आणि सगळच विस्कळित..
अगदी काहीच नाही असं नाही..काही typical blog लिहिण्यासारख्या घटना घडल्या होत्या.. मला ब्लॉग लिहायला लागून एक वर्ष झालं कदाचित त्यावर एखादा छान छोटासा पोस्ट लिहिता आला असता किंवा मग मला st louis मधे येऊन २ वर्ष झाली त्याबद्द्ल ही काही लिहिता आलं असतं... किंवा मग मधेच अचानक मारलेल्या शिकागो वारी बद्द्ल आणि summer च्या उन्हात चकाकणार्या शिकागो downtown बद्द्ल नाहिच तर मग मला मधेच आलेल्या "anti socialism" च्या attack बद्द्ल... (ज्यावरून मी lunch table वर लोकांना बर्यापैकी bore केलं..:) नाहितर मग मी पहिल्यांदाच केलेल्या chocolate dipped strawberies आणि butter chicken बद्दल..
किंवा मग उत्साहाचे भांडार घेऊन दाखल झालेल्या उन्हाळ्या बद्दल आणि आम्ही केलेल्या अनेक पॉटलक पार्टिज बद्दल...
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या GREAT फ्लोरीडा ट्रिप बद्द्ल..
एकून काय वैयक्तिक किंवा आत्ममग्न, मी आणि माझं जग ह्यात अडकणारे किंवा सामजिक भान नसलेले जरी असले तरी बरेच विषय आहेत की लिहायला... फक्त हा विस्कळितपणा जाऊन विचार आणि key board कधी "वाहायला" लागलो ते बघायचंय... :)

बळच आपलं..

Disclaimer: अतिशय टुकार आणि इतर काही काम नसताना लिहिलेला पोस्ट... हे न वाचून किंवा न वाचून आयुष्यात काही फरक पडणार नाही.. किंवा "value add" होणार नाही.. :D

काही काही वेळी डोकं उगाच नको तिथे चालतं.. काल संध्याकाळी देवळात जाताना बरोबर अजून कोणी नव्हतं... त्यामूळे गाडीत एकटाच गाणी ऐकत होतो... त्यावेळी उगाच शब्दांची अदला बदल करून आणि ट ला ट जुळवून तयार झालेलं हे "गाणं" ... :D

original गाण्याचे शब्द.. movie : तुमको ना भूल पायेंगे...

क्या हुवा तुझे... बेचैन दिल हो रहा...
क्यू वो भला... मुझको नही है पता...
ऐसा भी क्या हो गया रे... जाने मुझे क्या हुवा रे....
धडकने बढी.. धडकन तो रूक सी गयी..
सासोंका क्या.. सासे भी बस मे नही..
अरे रे रे ये क्या हुवा रे.. वो तो नही हो गया रे..

कितना मुश्किल छुपाना.. उससे मुश्किल बताना...
दिल की बातो को लेकिन अपनो से ना छुपाना..
के चाहू मै लेकिन.. कुछ कहा भी ना जाये..
रोग तुम को लगा जो... उससे रब ही बचाये..
इसकी दवा.. इसकी दवा कुछ नही...
अब होगा क्या मुझको पता ही नही...
अरे रे रे ये क्या हुवा रे.. वो तो नही हो गया रे..

दिलकी बातो को दिलबर.. जो ना हमसे कहोगे..
देखना जिंदगी भर तुम तडपते रहोगे..
कौनसा मोड है ये.. कैसी ये बेखूदी है..
मै कहा हू मुझे तो.. कुछ खबर ही नही है..
कुछ तो खबर.. लो तुम जरा अपने दिल की..
दिल तो मेरा.. अब पास मेरे नही..
अरे रे रे ये क्या हुवा रे..
अरे रे रे ये क्या हुवा रे..
अरे रे रे ये क्या हुवा रे..

आणि आता मी बनवलेलं.. IT version..
situation : production release नंतर भरभरून defect आलेले असताना onsite team आणि offshore PM ह्यांच्या मधला "संवाद" .. female voice is of offshore PM.. where as male is onsite..

क्या हुवा इसे... error ही ये दे रहा..
क्यू वो भला... मुझको नही है पता...
ऐसा भी क्या हो गया रे... जाने इसे क्या हुवा रे....
response time बढा.. respose तो रुक ही गया..
Performance का क्या.. वो तो degrade ही हुवा..
ऐसा भी क्या हो गया रे... जाने इसे क्या हुवा रे....

कितना मुश्किल छुपाना.. उससे मुश्किल बताना...
Bug की बातो को लेकिन client से ना छुपाना..
केहेना चाहू मै लेकिन.. कुछ कहा भी ना जाये..
code जो तुमने दिया वो.. सिर्फ god ही चलाये..
इसका क्या है fix? इसका तो fix कुछ नही...
अब होगा कया.. वो तो पता ही नही...
अरे रे bug आ गया रे... जाने इसे क्या हुआ रे..

code के defects ओ tester .. PM से ना कहोगे..
देखना पुरे सालभर.. तुम भुगतते रहोगे..
कौनसा code है ये.. कौनसी ये module है..
मै PM हू मुझे तो.. कुछ खबर ही नही है..
कुछ तो खबर...लो तुम जरा अपने team की..
team तो मेरी... अब साथ मेरे नही...
अरे रे bug aa गया रे... जाने इसे क्या हुआ रे..
अरे रे bug aa गया रे... जाने इसे क्या हुआ रे..
अरे रे bug aa गया रे... जाने इसे क्या हुआ रे..

original गाणं खूप सुंदर आहे.. अलका याद्निक आणि सोनू निगम नी अगदी जान ओतलिये.. वरचं वाचून पकला असाल तर ऐकाच मूळ गाणं...

Get this widget | Share | Track details

To be or not to be ?

भारतात परत जाण्याबद्द्ल जेव्हा जेव्हा चर्चा चालू होतात तेव्हा दर वेळी भयंकर द्विधा मनस्थिती होते... माझ्या दोन मनांचं जणू डिबेट च चालू होतं.. हे दुसर मन वास्तविक फार शांत आणि passive आहे.. फक्त निर्णय घ्यायच्या वेळीच मुसंडी मारून वर येतं... मग तो निर्णय अगदी भारतात परत जाण्याइतका महत्त्वाचा असो की Burger King मधे खायचं का Tacobell मधे इतका trivial असो..
एक मन म्हणतं.. "कशाला जायचय परत ? इथे सगळं settled आहे.. घर चांगलं आहे.. मित्र मैत्रिणी आहेत.... रहा की गप्प पणे.. " पण मग दुसरं मन म्हणतं.. "भारतात काय गोष्टी settled नाहियेत ? तिथे तर ह्या पेक्षा मोठं घर आहे.. बाईक आहे.. गाडी आहे.. इथले नाही पण बाकीचे मित्र मैत्रिणी आहेतच की.."
मग पहिलं मन म्हणतं... "काम पण सुरळीत चाललय... चांगला role आहे.. जबाबदार्या आहेत... आजूबाजूचे लोक खूष आहेत.." दुसरं मन म्हणतं... "अरे जबाबदार्यांचं काय.. घ्यायची तयारी असली की त्या येतातच आपोआप...आणि करायची इछा असलेल्याला काम द्यायला लोकं तयारच असतात.."
पहिलं मन तरीही कामाचा विचार करतच राहातं.. "ह्या प्रोजेक्ट मधे सुरुवातीपासून असल्याने सगळंच माहिती आहे.... अगदी टिम पासून applications पर्यंत.." दुसरं मन म्हणतं " त्याने काय फरक पडतोय... आपल्या comfort झोन मधून कधितरी बाहेर पडायलाच पाहिजे... नाहितर challenges घ्यायची सवय हळूहळू बंद होते... मेंदू गंजेल तुझा अशाने..."
पहिलं मन तरी त्याचा हेका सोडत नाही... '"इथल्या टिम बरोबर चांगला रॅपो जमलाय... इथला बॉस तर मिटींग मधे म्हणाला पण की "as everything is well settled and there are no issues, we conveniently forget about your project" ... आणि team lead पण बोंबाबोंब करेल.." दुसरं मन हसून म्हणतं.. "ह्या अश्या स्तुतीने गुददुल्या होणं सहाजिक आहे... पण शेवटी ते मॅनेजर आहेत... प्रोजेक्ट टिम मॅनेज करणं त्यांच काम आहे... चालत्या गाड्याला खिळ घालणं कोणाला आवडेल... तुझा एक Junior team member दुसर्या टिम मधे गेला तेव्हा तू नव्हती आदळ आपट केलीस?? पण त्याच्याशिवाय आज सगळं चालू आहेच ना? आणि इथली टिम काल पर्यंत दिपक ला requirements आणि issues पाठवत होती.. आज तुला पाठवत्ये.. उद्या आणखी कोणाला... whatz the big deal?"
पहिलं मन अचानक track बदलून personal गोष्टींकडे वळतं.. '"पण मला इथली life style आवडते... स्वत:चं काम वेळेवर करा आणि बाकीच्या वेळी enjoy करा... '" दुसरं मन म्हणतं '"हो?? मग दिवाळी/गणपतीत दिवस दिवस eskal आणि maharashtratimes वरच्या बातम्या वाचून आपली हौस का भगवतोस? ते सगळं miss नाही करतं.."
"अरे त्या वेळेला सुट्टी घेऊन जाऊन यायचं भारतात इव्हडं काय त्यात?"
दुसर्या मना कडे उत्तर तयारच असतं.. '"येणारी दिवाळी ही भारताबाहेरची चौथी दिवाळी असेल असं तू परवाच कोणाला तरी सांगत होतास... !!!!!"
पहिलं मन विचार करून म्हणतं.. "पण इथलं YMCA, week end ची potlucks, late night hang outs..हे सगळं भारतात कसं मिळणार ?"
दुसरं मन लगेच म्हणतं.. "YMCA तून परत आल्यावर स्वत:च्या स्वैपाक स्वत: करायला किती जिवावर येतं त्याचं काय? potluck झाल्यावर साफसफाई करण्यासाठी कामवाल्या बाई असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटतं त्याचं काय? आणि late night hangouts बद्द्ल म्हणायचं तर भारतात असताना किती week ends ना रात्री लवकर घरी आला होतास? आणि घरी होणारे लाड, निरज निशांत बरोबर खेळणं, घरातली बाग एव्हडच काय पण पूण्याचं ऑफिस देखिल तू इथे miss करतोसच ना.. आणि एकदा settle झाल्यावर हे सगळं हळूहळू कमी होतच..."
"ते खरं आहे.. पण तिथल्या त्या मराठी मालिका, तेच ते जातिचं राजकारण, ऑफिस ला पोचायला लागणारा तास भर वेळ, काही काही अति irritating आणि तरीही सहन करावे लागणारे नातेवाईक, 'लोग क्या कहेंगे' चं presurre हे सगळं इथे नाहिये ना...."
ह्यावर मात्र दुसर्या मनाकडे काही उत्तर नसतं... ते confuse झाल्यचं बघून पहिलं मन आपले बालिश इमले बांधू लागतं...
"जर दोन्ही कडच्या चांगल्या गोष्टी घेऊन तिसरं वेगळंच जग निर्माण झालं तर.. म्हणजे मी सकाळी उठीन तेव्हा माझा southmoor मधल्या खोलीत असेन... म्हणजे खिडकी बाहेर दिसणारं lush green lawn, सुंदर झाडं.. माझं table, त्यावरची lampshade... आणि त्याच्या बाजूच्या अनेक perfumes च्या बाटल्या... मग मी जेव्हा आवरून बाहेर येईन तेव्हा आमच्या पूण्याच्या किचन टेबल वर असेन.. आई मला चहा आणि breakfast देईल.. आणि डब्बा सुद्धा....चहा पिताना मी बाबांकडून सकाळ काढून घेऊन त्यामधल्या पूणेरी बातम्या वाचेन आणि त्यांना मी निघेपर्यंत TOI वाचायला लावेन.. आज्जी ची पूजेची तयारी चालू असेल.. वहिनी ऑफिसच्या तयारीत खालीवर पळापळ करत असेल आणि दादा तिला त्रास देत असेल... नुकतेच उठलेले निरज निशांत तिथे बसून दूध पित असतील... निघताना मी निशांत ची काहितरी खोडी काढेन आणि मग तो मोठ्याने भोकाड पसरेल... :) घरातून बाहेर पडून मी माझी Camrey काढेन आणि I-55 वर drive करून १५ मिनिटात downtown मधे पोचेन... ऑफिस मधे माझा पूण्याचा ग्रुप असेल.. आणि lunch ला कॅंटिनमधे आम्ही खूप टवाळक्या करू... ऑफिस मधे मी आणि बाकीची लोकंही कामाच्या वेळी dedicatedly कामच करतिल आणि सगळे वेळेवर घरी जातिल... घरी येईन परत येईन तेव्हा सगळे नुकतेच परतलेले असतिल.. TV वर कोणतही cartoon किंवा मराठी मालिका चालू नसेल आणि आम्ही चहा पिताना एकत्र बसून गप्पा मारू... तेव्हा आम्ही फक्त आमच्याच घरातले सगळे जण असू.. कोणिही unwanted नातेवाईक हजर नसतिल किंवा त्यांचे फोन ही आलेले नसतिल... तितक्यात कौशिक आणि चंदनाचा फोन येईल मग आम्ही soouthmoor मधे थोडावेळ टेनिस किंवा बॅडमिंटन खेळू आणि नंतर YMCA त जाऊ... घरी येऊन मी shower घेईन तो पर्यंत गरम जेवण तयार असेल.. जेवणानंतर गौतम रश्मी किंवा विनोद चा फोन येईन आणि मग आम्ही stake in shake किंवा Denyes मधे जाऊन shake किंवा ice cream खाऊ... ते करताना ऑफिस मधल्या गॉसिप discuss करून खूSSप ह्सू आणि दंगा करू...
घरी येईपर्यंत आई, वहिनी आणि निशांत सोडून सगळे झोपलेले असतिल आणि बोबलकांदा निशांत मला "काका तू 'भोप्पा' नाही का अजून??" असं विचारेल.. :D मग आई तिचं लिखाणं करत बसेल आणि मी तिथेच बसून laptop वर timepass करेन...
तोपर्यंत दुसरं मन भानावर येऊन म्हणतं.. "साहेब कल्पनांच्या भरार्या मारणं बंद करा आणि manager आणि senior project manager बरोबरच्या मिटींग च्या तयारीला लागा... जे होणार नाही त्याचा विचार करत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे उद्या करायचं आहे त्याची तयारी करा.."
पहिलं मन सारे विचार झटकून कामाला लागतं आणि दुसरं मन आता काही काम न उरल्याने परत passive mode मधे निघून जातं.. "To be or not to be ? चा प्रश्ण शेवटी अनुत्तरितच रहातो... !

कहानी "घर-घर" की...

अखेर मागच्या week end ला आमचं shifting (एकदाचं) पार पडलं... घरात असलेल्या प्रचंड सामनासह परत shifting करायचं नाही असं ठरवूनही परत एकदा ते करावच लागलं... stl मधलं माझं हे तिसरं आणि एकूणातलं सहावं घर...
डोंबिवली ला असताना आम्ही अगदी सुरुवातिला पतंगे बिल्डिंग नावच्या एका चाळित रहात असू... मला आता फारच अंधूक आठवतं त्या घराबद्दलं... तिन (किंवा अडिच म्हणायला हवं खरतर) खोल्या असलेलं आणि मोठी balcony असलेलं ते घर बर्यापैकी जूनाट होतं.. टिपीकल चाळ असलेल्या त्या building मधे आई बाबा सुमारे १४ वर्ष रहात होते.. मोठी corridor वजा balcony, एका ओळीत असलेली ५/६ घरं आणि अगदी शेवटी असलेले २ common संडास... खालच्या मजल्यावर मालक आणि वर आम्ही ३/४ भाडेकरू... त्या घरातली मला ठळक पणे आठवणारी गोष्ट म्हणजे जांभळाच झाडं... रात्री गच्चीत झोपून सकाळी उठून जांभळं तोडून मग खाली यायचं असा काहीसा उन्हाळातला कार्यक्रम असायचा.. एकूण त्या वेळेला गल्ली मधे सगळे वाडे होते.. छान कौलारू घरं, मागे पुढे अंगण, मागे विहीर आणि प्रत्येकाचा घराभोवती मस्त झाडं...
पुढे आमच्याच गल्लीतला एक वाडा पाडून तिथे बिल्डींग बांधायला सुरुवात झाल्यावर आम्ही तिथे नविन आणि ownership च घर घेतलं... दुसर्या मजल्यावरचं, ५ खोल्यांचं, पुढच्या बाजूचं आणि भरपूर हवा उजेड असलेलं हे घर अतिशय छान होतं... मोठा हॉल, प्रशस्त किचन, दोन बेडरुम आणि एक अभ्यासाची खोली (जिथे बसून मी कधिच अभ्यास केला नाही :) आणि पुढच्या बाजूला गॅलरी अश्या ह्या घरात गेल्यावर पतंगे बिल्डींग मधल्या नाकपुडी एव्हड्या आणि common संडास असलेल्या घरात एव्हड्या सामानासह आपण कसं रहात होतो हे आम्हालाच कळायचं नाही... आमच्या मजल्यावर आम्ही, दातार आणि अमोदकर असे तिघं जण खूप वर्ष एकत्र होतो.. बाकीच्या दोन घरातले लोकं बदलत असायचे... अति गळ्यात गळे नाहित आणि कचाकचा भांडणही नाहीत त्यामूळे मजल्यावर नेहमिच "शांतता" असायची... आणि आज आम्ही सगळे जण वेगळी कडे रहायला गेल्यावरही सगळ्यांचा contact असतो... ह्या घरातल्या फरश्या बिल्डरच्या "artistic view" मूळे मघेच डार्क तर मधेच पांढर्या होत्या.... मी लहानपणी फक्त पांढर्या किंवा फक्त काळ्या फरशांवरच चालायचा असा नियम असल्यासारखा बर्याचदा उड्या मारत चालायचो... :) अभ्यासाची खोली ही फक्त पुस्तकं ठेवायलाच बाकी अभ्यास मी जवळ जवळ प्रत्येक जागी बसून केला आणि ठिकठिकाणी माझी पुस्तकं, वह्या, पेन काही ना काही सापडायचच .. !!! रात्री बर्याचदा आई तिचं लिखाण आणि मी माझा अभ्यास करत बसायचो आणि रात्री कॉफी करून प्यायचो... त्यावेळी घराचं decoration, रंगकाम, furniture ह्या तुलनेने low priority गोष्टी असल्याने ते सगळं बरेच वर्ष चाललं होतं.... ह्या घराशी इतक्या आठवणी जोडलेल्या आहेत की पूण्याला shift झाल्यावर ही ते घर विकायचं ही concept च पचनी पडत नव्हती... मी आणि आज्जी ने बाकी सगळ्यांशी fight मारून त्या घराच विकणं सुमारे ६ वर्ष लांबवलं होतं...!! आणि विकल्यानंतर आम्ही आमचं उरलेलं सामान घ्यायला गेलेलो असतान त्या लोकांनी लावलेली घराची लावलेली वाट बघून मला इतक वाईट वाटलेलं आणि राग ही आला होता.. की त्या लोकांना तिथून हकलून देऊन पूर्ण साफ सफाई करावी असं वाटत होतं...
दरम्यान जरा स्थिर झाल्यावर आणि आमची शिक्षणं "मार्गी" लागल्यावर बाबा आणि आज्जीनी त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न असलेलं "पूण्यातलं स्वत:च घर" बांधायचं ठरवलं... आज्जीला तर पूण्यातल्या घराची इतकी हौस होती की तिनी सुमारे ३० वर्षा पूर्वी पूण्यात एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता... बिल्डर, आर्किटेक्ट आणि आम्ही असे तिघेही अगदी एकारांत कोब्रा असून ही त्या घराचं बांधकाम ठरलेल्या schedule पेक्षा सुमारे २.५ वर्ष जास्त चाललं... !!!! आम्ही जेव्हा मे महिन्यात पुण्यात ल्या तयार झालेल्या घरात पहिल्यांदा रहायला गेलो तेव्हा जिकडे तिकडे सिमेंटच सिमेंट अशी अवस्था होती.. सुरुवातिला आम्ही दर मे महिना आणि दिवाळीत तिथे रहायला जात असू आणि नंतर माझी १० वी झाल्यावर कायमचे पूणॆकर झालो... ह्या घरातली बाकीची कामं डोंबिवली पेक्षा relatively लवकर आवारली.... पुढे दादाचं लग्न झाल्यावर आणि निरज झाल्यावर ह्या घरावर अजून एक मजला वाढ्वावा असा विचार झाला आणि माझ्या ऐन शेवटच्या वर्षात वरच्या खोल्यांच काम चालू झालं... पुन्हा जूनी "कोकणस्थ" टिम एकत्र आल्याने ४ महिन्यांच काम १ वर्ष चाललं.. :D एकदा तर त्या बांधकामाचा आवाज मला अभ्यास करत असताना इतका असह्य झाला की मी त्या कामगारांना हकलूनच दिलं... एक पान सुमारे ४ दा वाचून ही मला त्यातलं एक अक्षरही कळतं नव्हतं... ते काम पूर्ण झाल्यावर मला आयूष्यात पहिल्यांदाच स्वतंत्र खोली मिळाली होती.. :) साधारण इतर खोल्यांमधे न बसलेली कपाटं, बेड आणि computer टेबल असं सामान माझ्या खोलीत होतं... अगदी लहान पणा पासून ते आत्तापर्यंत आज्जीच्या खोलीत झोपायची सवय असल्याने माझ्या खोलीत मला सुरुवातिला झोपच यायची नाही.. ! घर शोधणं आणि ते लावणं ह्यातली खरी "मजा" st louis ला आल्यावर होती... इथे सगळं स्वत: करायचं होतं जे आत्ता पर्य़ंत कधिच करायची वेळ आली नव्हती.. :) तसा southmoor चा परिसर बघितल्याबरोबर आवडून जाईल असा होता...आत गेल्यागेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी... २ मजल्यांची उतरल्या छपरांची मधे मधे विटांचं डिझाईन असलेली टुमदार घरं, मोठी लॉन्स, त्या भोवतिचे फुलांचे ताटवे, टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल...एकूण सगळं कसं सुंदर होतं.... मुख्य म्हणजे जिना चढून वर गेल्यावर मोठं coridor आणि त्या भोवती दोन्ही बाजूला घरं अशी हॉटेल सारखी रचना नव्हती... सुरुवातिला घरात माझ्या आणि roomie च्या बॅगा सोडून काही सामान नव्हतं... तेव्हा deals शोधून किंवा गराज सेल मधे जाऊन घरातलं सामान आणायला खूप मजा यायची... पूण्याला घरातली इकडची काडी तिकडे न करणारा मी स्वैपाकापासून सफाई पर्यंत सगळं करायला लागलो होतो.. :) आमचं घर आणि especially किचन southmoor मधलं सगळ्य़ात साफ आहे असं certificate soouthmoor मधल्या housewife gang नी दिलं होतं... :D आणि माझ्या साफसाफाई ची "किर्ती" जगभर पसरवायची कामगिरी माझ्या roomies नी व्यवस्थित केली होती.... :। पुढे माझ्या roomie चा परत जायचा प्लॅन ठरायला लागल्यावर आम्ही 1 BHK घर शोधायच ठरवलं... त्यावेली आम्ही आमच्या peroperty manager ला लई पिळलं होतं... हे घर पुढच्या बाजूला नाही, हे मेन रोड पासून खूप आत आहे, 1 BHK townhouse चं डिझाईन चांगलं नाहिये, २ BHK townhouse महाग आहे, ह्या घराच furniture जुनं आहे, ह्या घरात उजेड कमी आहे, इतर काही नाही तर ह्या घराजवळ काही irritating लोकं रहातात इ सगळी कारणं देऊन झाली.... शेवटी तिने आम्हाला सांगितलं की माझ्याकडे ही घरं आहेत.. कोणतं हवय ते तुम्ही ठरवून सांगा.... :) त्यावेळचं shifting फार तापदायक होतं.. भर थंडीत आणि week day ला संध्याकाळी... :(
ते 1 BHK लहान पडायला लागल्यावर आणि अजून एका मित्राला accomodate करण्यासाठी पुन्हा एकदा घर बदलणे कार्यक्रम झाला... ह्यावेळी मात्र पाहिल्याच प्रयत्नात romodelled, पुढच्या बाजूचं, भरपूर हवा उजॆड असलेलं, ground floor वरचं असं घर मिळालं... दोघांच्याही घरात प्रचंड सामन असल्याने कौशिक, विनोद, निशांत सारख्या तगड्या जवानांपासून अवंती, चंदना, मिता ज्यांनी छोटे मोठे खोके हलवायला मदत केली अश्या सगळ्य़ांनी च खारीचा का होईना पण वाटा उचलला... :)
आधी आम्ही गराज सेल मधे जाऊन सामान उचललं पण आता आम्हालाच गराज सेल लावायची वेळ आली आहे... !! सध्या घरात असलेल्या सामानातल्या काही मुख्य गोष्टी म्हणजे २ microwave, सुमारे ७ वेगवेगळ्या प्रकारची टेबल्स including 2 dining tables, २ iron boards, 3 irons, सर्वप्रकारच्या साफसफाईच्या साबणांचे १०/१२ डबे, सुमारे १५० हॅंगर, infinite चमचे, १०-१२ मसाल्याची पाकिटे, ४ मोठे conrflakes चे डबे, 3 राईस कूकर आणि वेगवेगळ्या आकाराचे असंख्य खोके जे अजूनही घरभर पडले आहेत.... !!!!
८ दिवस झाले तरी अजून आवरा आवरी संपतच नाहिये... आणि tacobell आणि burger king वर दिवस काढणं चालू आहे... ह्या shifting नंतर आता stl मधे परत shifting करायचं नाही असा निश्चय मी परत एकदा केला आहे... hopefully तो पतर मोडावा लागणार नाही... :)

सारं रोजचच तरीही......

दिवस अगदी नेहमीसारखाच उगवला... नेहमी प्रमाणे झोपायला उशिर झालेला.. सकाळी गजर आगदी वेळेवर वाजला... नेहेमी प्रमाणे माझा roomie शहाण्यामूलासारखा उठून आधी अंघोळीला गेला...त्यानंतर मी पण रडत खडत उठून आवरलं... झाल्यावर सहज बाहेर बघितलं तर रिमझिम पाऊस पडत होता.. १/२ दिवसांपासून थंडी तशी कमी झालीच होती... पण आज तर दार उघडल्यावर नेहमी प्रमाणे झोंबरा वारा पण नाही आला... अश्या छान हवेत ऑफिस ला जायची इच्छा नसतानाही (रोजच्या सारखं) बाहेर पडलो... रोजच्या सारखाच car pool partner नी खाली यायला १० मिनिटं उशिर केला.. पण आज हवा छान होती त्यामूळे ते विशेष जाणवलं पण नाही... आणि वसंताच्या आगमनाची चिन्हे ठिकठिकाणी दिसत होती... खराटे झालेल्या झाडांवर छोट्या पांढर्या फूलांचे घोस च्या घोस आले होते... मागच्या वर्षी may be थंडी कमी असल्याने किंवा इतर काही कारणाने एव्ह्डा सुंदर spring पडलाच नव्हता.. सगळी कडे टुलिप्स पण फुलली होती...

ऑफिस मधे गेल्यावर पाहिलं तर expected असलेले सगळे emails एकदाही gentle reminder न टाकता आलेले होते... माझ्या बाकीच्या team members नी जी कामं करणं expected होतं ती त्यांनी विशेष गफले न करता अगदी वेळेवर आणि व्यवस्थितपणे संपवली होती.... माझी सगळी applications अगदी नीट चालू होती... ! अगदी नाहिच असं नाही पण typical Monday morning ला जी आग लागलेली असते तेव्हडी लागलेली नव्हती... म्हणजे आटोक्यात होती... Team lead माझ्यावर पेटलेला नव्हता... आणि सकाळी सकाळी त्यानी अगदी सुहास्य वदानाने माझ्याशी गप्पा वगैरे मारल्या... मी पण वाहत्या गंगेत हात धूवून घ्यावे त्याप्रमाणे कसली कसली pending approvals त्याच्याकडून घेऊन टाकली.... १०:३० पर्यंत माझी सगळी routine कामं संपली होती... coffee machine पाशी गेल्यावर तिथे कोणितरी नुकतिच ताजी कॉफी बनवून ठेवली होती.. इतकच काय साखर, दूध ह्यांचे डबे पण भरलेले होते... मला रोजच्या सारखं त्या Chuck काकांकडे जाऊन, किल्ली घेऊन ते सगळे डबे भरा मग स्वत:साठी कॉफी बनवा मग ती किल्ली परत नेऊन द्या आणि हो त्या Chuck काकांच्या "grand kids" चे (आधी खूपदा ऐकलेले) किस्से (परत एकदा) ऐका हे सगळे उपद्व्याप परत करावे लागले नाही... कॉफी पिताना सहज पेपर उघडला (अर्थातच online).. भारत world cup मधून आधिच बाहेर पडलेला असल्याने आणखीएका "नामुष्कीजनक", "निराशावादी", "खेददायाक" पराभवाची बातमी नव्हती.. पवारां पासून चॅपेल पर्यंत, सचिन पासून युवराज पर्यंत सगळेच मौन व्रतात गेल्यामुळॆ काही सनसनाटी खबर पण नव्हती... कोणत्याही राजकारणी पुत्रांनी नविन मुक्ताफळं उधळली नव्हती आणि सुदैवाने दंगली, स्फोट काही न होता सगळी कडे शांतत होती... (touch wood..!)
लंच पर्यंत सगळं शांततेत गेल्यावर canteen मधे देखिल नेहमी सारखी लाईन नव्हती.. मी नक्की काय बोलतोय आणि मागतोय हे canteen मधल्या फिरंगी बाईला चक्क पहिल्या प्रयत्नात कळ्ळ्यामूळे तिची बधिर expressions पाहायची वेळ ही आली नाही... Lunch table वर पण सतत crib मारायचा वसा घेतलेल्या लोकांनी पगार, company policies, higher management, अमेरीकेतिल महागाई, पेट्रोल चे भाव, canteen मधे मिळणार्या अन्नाचा दर्जा ह्यातल्या कोणत्याही गोष्टी वर crib न मारल्याने वैताग देखिल आला नाही... परत डेस्क वर आल्यावर देखिल सगळं सुरळीत चालू होतं... आज चक्क मला झोप अजिबात येत नव्हती... सगळी कामं वेळेवर संपवून आम्ही कितीतरी दिवसांनी उजेडात घरी जायला निघालो होतो... Day light saving चालू झाल्याने आता दिवस मोठा होता.... घरी गेल्यावर चहा करावा का असा अगदी विचार करत असतानच रश्मी चा चहा प्यायला ये असा फोन आला... बाहेर छान sunny आणि warm दिवस पडला होता... चहा झाल्यावर कॅमेरा घेऊन बाहेर पडायची तिव्र इच्छा झाली आणि आजूबाजूच्या फुललेल्या झाडांचे अनेक फोटो काढले... ते होई पर्य़ंत जनता खाली उतरेलेलीच होती.. हल्ली southmoor चं sport complex झालय.. एकावेळी टेनिस, गल्ली बॅडमिंटन, फूटबॉल, बास्केटबॉल आणि वॉलीबॉल एव्हडे खेळ खेळले जातात... म्हणजे लहानपणी शाळेतून आल्यावर खेळायला जायचं तसं सगळे ऑफिस मधून आले की खेळायला जातात.. :) मस्त खेळून झाल्यावर घरी येऊन बघितलं तर माझा roomie त्याचा conference call आटोपून न झोपता जेवण बनवत होता... आज तो चक्क Bed आणि Bridge ह्याच्या "beyond" गेला होत.. :D घरात भाजी चा मस्त वास सुटला होता... जेवण झाल्यावर बारीक सारीक कामं आटपून ११:३० च्या सुमारास दुकान बंद..!!!
तस बघायला गेलं तर दिवस भरात special असं काहिच घडलं नव्हतं... सार अगदी रोजचच.. तरीही वेगळं आणि छान... वसंताची नुसती चाहूल येणार्या happening summer ची झलक देऊन गेली होती.. !!!

विजेता..

काल library मधून बाहेर पडता पडता एक पुस्तक दिसलं.. छोटसच होतं ६०/६५ पानी.. मी ते घेऊन counter वर गेलो तर तिथली आज्जी म्हणाली "अरे.. हे chindren section मधलं आहे.. तुला नक्की हवय का हे.." म्ह्टलं ठिके chindren तर children पण दे मला... मला ते लगेच तिथेच बसून वाचावसं वाटत होतं.. तर ते पुस्तक होतं.. The Great Athlete : Pete Sampras. १९८८ ते २००३ अश्या तब्बल १५ वर्षांच्या कारकिर्दित सुमारे १२ वर्ष तरी ह्याने Men's tenis वर सत्ता गाजवली...



वॉशिंग्टन मधे जन्मलेल्या आणि नंतर पालकांबरोबर कॅलिफ़ोर्नियाला गेलेल्या पिट ने वयाच्या ७ व्या वर्षी रॅकेट धरली... डॉ. फिशर ह्यांच्या मार्गदर्शना खाली टेनिस खेळायला सुरुवात केलेल्या पिट ने त्यांच्याकडून long term उपयोगी पडतिल अश्या काही गोष्टी शिकल्या.. त्याच्या वयोगटात तो जिंकत असताना डॉ. फिशर ह्यांनी त्याला दोन हातांनी मारायचा बॅक हँड मारण्यास बंदी केली आणि single handed backhand घोटून घ्यायला सुरुवात केली... त्याचा सगळ्यात हुकमी असलेला हा फटका मारणं बंद केल्याचा सहाजिकच त्याच्या खेळावर परीणाम झाला आणि तो सामन्यांमागून सामने हरू लागला... ह्या प्रकारात त्याचा संपूर्ण एक season वाया गेला आणि junior ranking सुद्धा जोरदार ढासळलं... पण तरिही डॉ. फिशर त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि single handed backhand चा सराव करून च घेत होते.. पुढे हेच त्याचे सगळयात महत्त्वाचे अस्र ठरले आणि ह्याचा जोरावर त्याने समोरच्याला नामोहराम केले.. खरच तो बॅकहॅंड पासेस ज्या सहजतेने मारत असे ते पाहून "बॅकहॅंड मारणं इतकं सोप्प असत?" असं कितीतरी वेळा वाटून जात असे.. ह्या फटक्याबद्द्ल पिट म्हणतो.. "I accepted that it was a shot I was going to hit forever. The older and stronger I got, the better the shot became." डॉ. फिशर त्याच्या कडून सर्व्हिस चा सराव करून घेताना देखिल त्याने बॉल वर फेकल्यावर त्याला कोणत्या प्रकारची सर्व्ह करायची आहे हे ओरडून सांगत.. ह्यामूळे सर्व्हिस कोणत्याही प्रकारची असो, त्याच्या सुरुवातिच्या हालचालीवरून येणारी सर्व्ह कोणत्या प्रकारची असेल ह्याचा समोरच्याला अजिबात अंदाज लागत नसे....ह्याबरोबरच ते त्याला त्याचापेक्षा मोठ्या वयोगटात खेळायला लावत.. ह्यामुळे त्याला सुरुवातिला काही सामन्यांमधे हार पत्करावी लागली पण नंतर त्याचा नक्कीच फायदा झाला...
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायिक टेनिसपटू व्ह्यायचं ठरवलं... पहिल्या वर्षात विषेश चमक न दाखवू शकलेला पिट पुढच्या मोसमापासून मात्र चमकदार कामगिरी करू लागला.. पहाता पहाता पहिल्या १०० खेळाडूंमधे तो जाऊन पोचला... १९८९ च्या अमेरीकेन ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत त्याची गाठ गतविजेत्या मॅट्स विलेंडर बरोबर होती... त्याने विलेंडर ला पराभवाचा धक्का देऊन दुसरी फेरी गाठली.. त्याच्या कारकिर्दितली ही सर्वोत्त्म कामगिरी होती... ह्या बद्द्ल तो म्हणतो.. "I just couldn't get over it.. I remember driving back to the hotel around midnight, and I just couldn't believe I was still in the tournament when everyone expected me to loose."
पुढच्या वर्षीच्या अमेरीकन ओपन स्पर्धेत देखिल त्याच्याकडून एखाद दुसरा अनपेक्षित विजय सोडल्यास फारशी अपेक्षा कोणी ठेवली नव्हती... पण पहिल्या काही फेर्यांमधे इव्हान लेंडल, जॉन मेकॅन्रो अश्या दिग्गज्यांना धक्के देत त्याने थेट अंतिम फेरीत धडक मारली... शांत, थंड डोक्याचा, पांढरे कपडे घालून खेळणारा, कोर्ट वर अजिबात अवाक्षरही न काढणारा सॅंम्प्रस विरुद्ध रंगिबेरंगी कपड्यात वावरणारा, लांब केस, कानात डूल, जोरदार अशी style आणि ओरडा आरडा करणारा आगासी अशी ही लढत म्हणजे विरोधाभासाचा उत्तम नमूना होती... आगासी चा ३ सेट मधे धुव्वा उडवून सॅंम्प्रस वयाच्या १९ व्या वर्षी सर्वात तरून अमेरीकन विजेता ठरला.. ह्या सामन्यानंतर आगासी ची प्रतिक्रीया देखिल खूप काही सांगून जाते.. "I came here looking forward to putting on a good show, but surely the better man won. When you can hit a serve with 120 miles of speed on the line, there is not much you can do about it." त्या वर्षी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ३ अमेरीकेन होते.. आणि अध्यक्ष बूश ह्यांनी कोणा एकाचं फोन करून अभिनंदन करायचं असं ठरवलं होतं... सॅंम्प्रस जिंकून सुद्धा बूश ह्यांनी आगासी ला फोन केला होता... हयाबाबत त्याला छेडलं असता "No no.. my phone was off the hook.." असं उत्तर देऊन वाद संपवून टाकला होता... डॉ. फिशर ह्यांनी पिट ला शिकवलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट वर कोणत्याही भावना व्यक्त न करणं... ह्यामुळे समोरच्याला आपल्या मानसिकतेचा अंदाज येत नाही आणि तो गाफ़िल रहातो असं डॉ. फिशर सांगत... पिट कोर्ट्वर इतका शांत किंबहूना भावानाशून्य वावरत असे की पत्रकार त्याच्याबद्द्ल "He has ice water in his veins" असं लिहित असतं...
पुढच्या वर्षी दुखापतींमुळे किंवा वाढलेल्या अपेक्षांमुळे त्याची कामगिरी ढासळली... विंबल्ड्न आणि फ्रेंच स्पर्धेत लवकर पराभव झाल्यावर अमेरीकन ओपन मधेही त्याचा जिम कुरीयर कडून पराभव झाला... मुलाखती देण्यात तसेच शब्द्संपत्ती च्या बाबतित कमकूवत असणार्या पिट ने ह्या पराभवानंतर दिलेली प्रतिक्रिया त्याच्या चांगलीच विरोधात गेली.. " I' ve found out what Michael Chang meants when he said being the youngest champion of slam is like carrying a back pack full bricks around for the next year. That load is now dropped from my shoulders and now I am feeling relieved." त्याच्या "feeling relieved" बद्द्ल मिडिया ने तसेच इतर खेळाडूंनी टिकेची झोड उठवली... आणि पुढे त्याचा खेळ खालावतच राहिला... सॅंम्प्रस देखिल one slam wonder ठरणार अशी टिका समिक्षकांनी केली...
पुढे टिम गुलिक्सन च्या रुपाने त्याला नविन कोच मिळाला आणि त्याचा खेळ परत उंचावू लागला.. १९९३ च्या विंबल्डन मधे तो आणि आगासी फायनल मधे आले... प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा showman आगासी ला होता आणि सॅंम्प्रस ची मिडिया आणि प्रेक्षक देखिल "Bore Pete" म्हणून जोरदार खिल्ली उडवत... पण जाराही विचलित न होता त्याने ५ सेट च्या झुंजित आगासी ला हरवले आणि दुसरे ग्रॅंड स्लॅम जिंकले... आपल्या आनंदाचे प्रथमच प्रदर्शन करीत पिट ने आपले २ टि शर्ट आणि रॅकेट प्रेक्षकांमधे फेकले आणि पुढेही ही परंपरा कायम ठेवली... ब्रिटिश मिडिया ने पिट चे "कौतूक" BORED ON THE FOURHT JULY अश्या headline ने केले..!! कदाचित त्यांना त्यावेळी अंदाज नसावा की हाच BORE PETE पुढे ८ वर्ष ह्या हिरवळीवर राज्य करणार आहे...
पाठोपाठ अमेरिकन ओपन देखिल जिंकून त्याने टिकाकारांची तोंडं बंद केली... नंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही एकूण ७ विंबल्ड्न सह १४ ग्रॅंड्स्लॅम जिंकून त्याने विक्रम केला... एरवी कोर्टवर बर्फासारखा थंड राहाणारा पिट आपला कोच आणि जवळचा मित्र टिम ह्याच्या असाध्य आजारपणाची बातमी ऐकून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत भर कोर्ट वर ढसाढसा रडला होता... पुढे ही स्पर्धा त्याने जिंकली पण ती त्याच्यासाठी सगळयात अवघड स्पर्धा होती...
ह्या काळात त्याचा खेळ बघणं किंवा त्याच्या आणि आगासी च्या जोरदार लढती बघणं खरच मेजवानी असे... सॅंम्प्रस चा कट्टर फॅन असल्याने (आणि आगासी विशेष आवडन नसल्याने) मी त्यांच्या लढतिंमधे कायम सॅंम्प्रस च्या बाजून असे आणि बहूतेक वेळा तो जिंकल्याने मित्राकडून पैजेचा वडापाव देखिल उकळत असे.. :)
पुढे २००१ मधे रॉजर फेडररच्या झंवातात विंबल्डनने देखिल साथ सोडल्यावर सॅंम्प्रस च्या मनात निवॄत्तिचे विचार यायला लागले... ज्या अमेरीकन ओपन ने त्याला पहिले आणि शेवटचे देखिल ग्रॅंड्स्लॅम विजेतेपद दिले, बॅड्पॅच मधून बाहेर पडायला मदत केली त्याच flashing medows वर त्याने एका विषेश कार्यक्रमात साश्रू नयनांनी टेनिस जगताचा निरोप घेतला.... एक विजेता निवॄत्त झाला आणि टेनिस मधले एका पर्व समाप्त झाले............!
काल अचानक हे पुस्तक वाचून सॅंम्प्रस च्या मॅचेस च्या अनेक आठवणी जाग्या झाल्या... आणि एक चांगलं पुस्तक वाचल्याचं समाधान पण मिळालं... अधून मधून अशी positive पुस्तकं वाचत राहावित विनाकारण येणारं frustration दूर करायला बरी पडतात... :)

San Fransisco rocks..

परत एक प्रवास.. अजून एक प्रवास वर्णन... :)
शेवटी आमची किंवा माझी म्हणू पाहिजे तर much much awaited san fransisco (SF) ट्रिप अखेर final झाली.. म्हणजे ट्रिप सगळ्यांची होती.. पण much much awaited निदान माझ्यासाठी होती.. मागे एकदा इथली काही मंडळी तिथे गेली असताना माझं इथे रहायचं नक्की ठरत नव्हतं त्यामूळे cancel झालं होतं तर डिसेंबर मधे मोठठा प्लॅन बनवून bad whether मूळे flight cancel होऊन त्याचा पोपट झाला होता..!!! आता ह्यावेळी तरी काय होतय असं अशी जरा काळजीच वाटत होती.. पण नेहमीप्रमाणे चर्चांची गुर्हाळं होऊन bookings आणि plan फ़ायनल झाला... आपल्याकडे कशी हल्ली समविचारी पक्षांची आघाडी होते तसे आमच्या इथे ही हल्ली समविचारी लोकांचे छोटे छोटे ग्रूप तयार झालेत.. co-ordinate करायला ही बरं पडतं आणि उगाच कोणाचे राग, लोभ, कंटाळे, priorities etc etc संभाळत बसावे लागत नाहीत.. असो त्याबद्द्ल कधितरी detail मधे नंतर... तर आमची जी सधारण ११ जणांची समविचारी आघाडी आहे त्यापैकी ७ जणांनी जायच नक्की केलं आणि बाकीच्यांचाही बाहेरून पाठिंबा होताच म्हणजे आम्हाला air port वर सोडायला न्यायला येणे, लागतिल तेव्हा नेट वरून drections शोधून देणे, जे एका प्रोजेक्ट मधे आहेत त्यांनी back up म्हणून काम करणे etc etc... आमच्यातल्या चौघांना आधी LA ला पण जायचं होतं त्यामूळे ते एक दिवस आधिच रवाना झाले आणि मी, निशांत आणि मिता एक दिवस उशिरा निघून त्यांना SF ला भेटणार होतो.. आमच्या ट्रिप ची सुरुवात अगदी Just in time झाली.. आम्ही सुमारे तास भर लवकर air port वर पोचून देखिल तिथे security मधे भली मोठी लाईन... !! आधी WTC चा आणि नंतर त्या लंडन मधला liquids वापरून करायच्या स्फ़ोटांच्या प्लॅन चा इथे एकूण इतका धसका घेतलाय की security check ह्याला लागणारा वेळ दिवसेंदिवस वाढतच चाल्लाय.. पण काय करणार तो आवश्यक देखिल आहे.... शेवटी flight ची last and final announcement होत असताना आम्ही कसेबसे गेट वर पोचलो... आदल्या दिवशीच्या जागरणाने flight take off व्हायच्या आधी मला झोप लागली पण..! नंतर बराच turblulance पण होता म्हणे... आणि निशांत नी मला उठवायचा प्रयत्न केला होता आणि मी उठलो नाही.. त्यांनी माझ्या झोपेचे किस्से नंतर बर्याचदा लोकांना रंगवून सांगितले.. !! फिनिक्स ला माझा मित्र अश्विन मला air port वर भेटायला येणार होता.. दिड तासाचाच break होता.. आणि सकाळ्च्या अनुभवाने शहाणपण न येऊन मी त्याच्याशी गप्पा मारत बसून अर्धातास आधी security च्या लाईन मधे आलो.. ते आटोपून मला जोरदार धावत गेट पर्यंत पोचावं लागलं.. सकाळी छान व्यायाम झाला आणि जॅकेट, स्वेटर ह्यामूळे जिम मधे येतो तसा घाम पण आला.. !! परत एकदा just in time.. :) सॅन होजे airport ला उतरल्यावर बाहेर आल्याआल्याच एकदम छान वाटलं... हिवाळा असूनही सगळीकडे हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मुख्य म्हणजे उबदार हवा आणि लख्ख सूर्यप्रकाश... !! ह्या वर्षी आमच्या इथे इतका वाईट हिवाळा होता.. :( बर्फ़ ज्या ज्या प्रकारांनी पडू शकतो म्हणजे snow fall, ice rain, flurries, slit etc etc त्या सगळ्याप्रकारांनी पडून झाला.. temp 0 deg celcius झालं की आम्हाला ते गरम वाटायचं.. वारा पाऊस होतेच आणि उरलं सुरलं tornedo पण परवा होऊन गेलं... ह्या सगळ्यामूळे १०/१२ deg celcius आणि ऊन म्हणजे तर अगदी परवणीच... मला आमच्या सॅन रॅमोन च्या ऑफ़िस मधे काही clients ना भेटायला जायचं होतं.. त्यामूळे निशांत मिता ला हॉटेल मधे सोडून मी लगेच तिकडे गेलॊ.. जाताना चा drive जबरी होता... दोन्ही बाजूला डोंगर, हिरवळ, त्यात चरणार्या गाई, मेंढ्या आणि मधे मधे दिसणारी कौलारू घरं... एकदम चित्रातल्या सारखं.. switzerland किंवा typical युरोप मधली जशी वर्णनं असतात त्या सारखं... आमचं ऑफ़िस देखिल एकदम पॉश निघालं.. तिथे लेक साईड canteen आहे.. एव्हड्या scenic आणि सुंदर ऑफ़िस मधे बसून लोकं काम कशी काय करतात कोण जाणे.. मी तिथे either फोटो काढत बसलो असतो किंवा खिडकीतून बाहेर बघत बसलो असतो...

एकूण SF किंवा bay area चा पहिलं दर्शन फ़ारच सुंदर होतं... नंतर आम्हाला संध्याकाळी mystery spot ला जायचं होतं... निशांत आणि मिता ला घेऊन आम्ही लगेच तिकडे निघालो.. तो रस्ता ही खूपच मस्त होता... आणि शेवटचे काही मैल तर घाट आणि घनदाट जंगलातून होता.. दिवस भरातल्या just in time परंपरेनुसार तिथेही शेवटची tour चालू व्ह्यायच्या ५ मिनीटं आधी आम्ही तिथे पोचलो... आधि बराच वेळ तो प्रकार optical illusion आहे असं मला वाटत होतं.. पण काही काही experiments नंतर कळत नाही exact भानगड काय आहे किंवा खरच mystery आहे.. पण एकूण अनूभव चांगला होता.. 45 Deg मधे वाकून उभं रहालेले फोटो काढताना किंवा खालून वर roll होणारा ball पहाताना खूप मजा आली.. :) रात्री आमची LA हून येणारी gang पण एकदम वेळेवर आली... त्यामूळे आम्ही लगेच SF downtown कडे निघालो... तिथे जायच्या आधी SF ला मिळणार्या देसी जेवणाबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकलं होतं.. काय वाट्टेल ते करा पण शालिमार मधे जाऊन याच असं सांगितलं होतं.. आम्ही १० $ पार्कींग मधे घालवून ते शालिमार शोधलं पण तिथे जोरदार पोपट झाला.. ते एखाद्या धाब्यासारखं होतं.. आणि food पण not so good type होतं.. !!! एकूण SF downtown एकदम मस्त आहे... एकतर एकतर डोंगर उतारावार असल्याने सगळे रस्ते एकदम steap आहेत.. सगळी कडे छान हिरवळ आहे.. आणि मधे मधे cable cars आणि tram आहेत... new york, chicago पेक्षा खूप वेगळं वाटतं तिथे.. हल्ली मला chicago downtown म्हणजे घरच्या सारखं, आपलं असं वाटायला लागलय.. :) तशी ही माझी california ची तिसरी ट्रिप.. एकदा LA ला तर दुसर्यांदा San Diego ला... LA हा पूर्णपणे अपेक्षाभंग होता.. LA बघून मला वाटलेलं की लोकं एव्ह्डं california california करत का नाचतात?? नुसताच hype आहे.. आणि आपल्याकडे ज्या "कोकणचं कॅलिफ़ोर्निया" वगैरे घोषणा होत असतात त्यापेक्षा कॅलिफ़ोर्नियाचच कोकण बनवा कारण तेच कितीतरी जास्त सुंदर आहे.. San Diego छान आहे.. पण त्याच सौंदर्य आणखिन वेगळं आहे... म्हणजे ऐकून मनात जी कॅलिफ़ोर्निया बद्दल ची image होती त्याच्याशी जूळणारं नाहीच.. पण SF exceeded all the expectations.. Bay area चं एव्हडं कौतूक का केलं जातं ते बघायचं असेल तर SF ला गेल्या वर कळतं.. ! Europian look, छान हवामान, सगळं कसं आखिव रेखिव आणि मूख्य म्हणजे निपजलेलं नैसर्गिक सौंदर्य ह्या सगळ्यामूळे SF चटकन आवडून जातं...

दुसर्या दिवशी सकाळी alcatraz चा तुरूंग पहायचा प्लॅन होता... हा typical american marketing चा उत्तम नमूना आहे... तसं बघायला गेलं तर अमेरीकेतल्या ऐतिहासिक गोष्टी म्हणजे फार फार तर ३००/४०० वर्ष जून्या... त्यात ही बर्याच ठिकाणी इतिहास ओढून ताणून आणल्यासारखा वाटतो... alcatraz चं तुरूंग पाहिल्याजाणार्या आमच्या पैकी एकानेही अंदमानातील स्वातंत्र्य़वीर सावरकरांच तुरूंग पाहिलेलं नाही !!! एक ठिकाण म्हणून पाहायला ते ठिक आहे पण ऐतिहासिक वगैरे वाटत नाही.. पण एकून ते सगळं पाहिल्यावर खूप उदास व्हायला होतं... त्या तुरूंगातल्या काही cells उघड्या आहेत... audio tour च्या दरम्यान त्याच्या आत घेऊन जातात... त्या ४ X ४ च्या जागेत नुसतं २ सेकंद उभं राहिलं तरी स्वातंत्र्याचं महत्त्व काय हे कळतं... आणि नुकतात योगेश च्या shwashank redemtion वरचा blog वाचलेला असल्याने जरा जास्तच strong feelings जाणवली... त्या बेटावरून SF downtown, bay, bay bridge आणि golden gate bridge खूप छान दिसतात... नंतर fisherman's warf वर थोडावेळ timepass केला... तिथून पण छान फोटो काढता येतात... overall ती एकदम happening जागा आहे... एकदम शिकागो च्या nevy pier साराखी... तिथे sea food पण एकदम सही मिळतं... !

नंतर muir woods नावाच्या जवळच्या एका जंगलात गेलो.. तिथे जाणारा रस्ता घाटातून जाणार होता... आणि त्यावेळेला अवंती drive करत असल्याने तिला सगळ्यांनी खूप पिळलं पण.. :) SF dowtown पासून १५ मैल च्या अंतरावर एव्हडं दाट जंगल असेल ह्यावर विश्वास बसत नाही... एथली builder lobby विशेष सक्रीय दिसत नाही... ;) हे खूप उंचच उंच वाढणार्या झाडांचं rain forest आहे.. तिथे मधे मधे चालण्यासाठी trails केले आहेत.. एकून २/३ तास जंगलात भटकण्यासाठी मस्त जागा आहे.. जरा आत शिरलं की तिथे camping वगैरे करण्यासाठी पण जागा आहे..

SF downtown मधलं chinatown हे US मधलं सगळ्यात मोठं chinatown आहे असं म्हणतात.. त्यांचा new year day नुकताच येऊन गेल्यामूळे तिथे दिवे, कंदिल वगैरे लावलेले होते.. तिथली दुकानं पण एकदम मस्त होती.. सगळीकडे एकदम enthu वातवरण होतं... आमच्या ग्रूप मधल्या मुलींनी एका दुकानात किमोनो घालून फोटो काढून घेतले... आणि त्या sales girl च लक्ष गेल्यावर "आम्हाला हा किमोनो मोठा होतोय तुम्ही तो alter करून देणार का हो? " असं उगिच अगदी शहाण्यामूलींसारखी तोंडं करून विचारून typical देसी गिरी केली.. :D मधे आम्ही १/२ वेळा रस्ता चुकून एकदम गोल्डन गेट ब्रिज वरच पोचलो.. हे पण SF मधलं एक attraction आहे... may be आम्ही रस्ता हरवून तिथे पोचलो असल्याने म्हणा किंवा परत येताना toll भरावा लागणार ह्या भितीने म्हणा.. ;) आम्हाला तो विषेश आवडलाच नाही.. एकतर तो खूप भारी आहे असं निदान वाटलं तरी नाही आणि दुसरं म्हणजे लंडन ब्रिज किंवा new york च्या brooklyn bridge वर जसं सहीSSS किंवा romantic वाटतं तसं काही तिथे वाटलं नाही...

त्या रात्री जेवलेलं इतर देसी restaurants मधलं जेवण एकदम मस्त होतं... एकतर खूप Indian जनता असल्याने एकदम homely वाटत होतं...
दुसर्या दिवशी सकाळी जो US मधला most scenic drive म्हंटला जातो अश्या highway 1 वर जायचं होतं... तिथे १७ मैल्स चा एक टप्पा tourist point म्हणून develop केला आहे...गाडी पार्क करायला आणि फोटो काढायला जागा, तसच बसायला बाक आणि जिथे शक्य आहे तिथे समुद्रकिनारा असं एकूण स्वरूप आहे.. एकूण खूप सुरेख जागा आहे... आम्ही गेलो तेव्हा नेमकं पावसाळी वातावरण होतं आणि त्यामूळे खूप चांगले फोटो काढता आले नाही.. किंवा फ़ार पाण्यात पण शिरता आलं नाही... पॅसिफ़िक चं पाणी ही खूप थंड होतं त्यामूळे आम्ही फक्त "पाय लागू.." करून आलो... :) हवेतही खूप गारवा होता.. actually हा असा scene जरा नविन होता.. म्हणजे समोर समुद्र, खारा वारा, उन पावसाचा खेळ आणि थंडी.. आपल्या इथे कोकणातल्या कोणत्याही समुद्रकिनार्यावार मी तरी थंडी अनुभवली नाहिये.. !! १७ मैल drive संपवून लगेच air port वर येऊन flight पकडायचं होतं.. येताना गाडी मधे गाणी, PJ ह्यांना उत आला होता... माझ्या ट्रिप related फंड्यांप्रमाणे चांगली कंपनी असली तर १/२ गोष्टी कमी बघून झाल्या तरी काही फरक पडत नाही.. पण ह्या ट्रिप मधे ग्रूप चांगला होताच आणि बघून ही खूप झालं.. त्यामूळे "good one" category त मोडणारी ट्रिप झाली...
Overall SFO rocks !!!!!! :)

"आमच्या वेळी असं नव्हतं"

परवा घरी फोन केला तर माझ्या २.५ वर्षांच्या पुतण्याने उचलला आणि अगदी व्यवस्थित गप्पा मारल्या... फोन कसा धरावा, सुरुवातीला hello म्हणावं, नंतर "मी निशू बोत्तो" असं आपलं नाव सांगावं हे सगळ अगदी न शिकवता त्याला कळतं.. लहानपणा पासून फोन, computer, गाडी, TV, CD player हे सगळ घरात असल्याने ते वापरणं वगैरे शिकवाव लागतच नाही... पण मग असही वाटतं की फोन, computer, TV हे सगळं नविन घेताना जेव्हडी मजा आली जे अनुभवलं ते त्यांना कधिच मिळणार नाही... मला आठवतं आमच्या घरी जेव्हा पूर्वी blank and white टिव्ही होता...त्याला एका बाजूला ८/१० काळी गोल बटणं होती... मधेच थंडी वाजायला लागल्या सारखं टिव्ही वरचं चित्र थरथरायला लागायचं.. मग त्या ८/१० बटणांमधलं एक कोणततरी फ़िरवायल्यावर ते थांबायचं.. नाहीच तर मग त्याला बाजूने एक झापड मारायची... झापड मारणे का एकदम रामबाण उपाय होता... मी तो पूढे computers, कॉलेज मधले circuit boards, CRO, microwave oven, printers ह्या सगळ्यांना वापरला... :) पण त्या टिव्ही ला सारखं सारखं मारलं तर तो मोडून जाईल ह्या भितीने जास्त बडवता पण येत नसे... नंतर आम्ही Sony चा रंगित टिव्ही घेतला.. तो एकदम चांगला होता पण त्याला Remote control नव्हता... तरीही तो घरी आला तेव्हा आमचा घरी अगदी दिवाळी झाली होती... :) त्यावेळी रंगित टिव्ही वर दुरदर्शन पहायला फ़ारच मजा यायची... पुढे घरात पहिल्यांदा फोन आला तेव्हा फोन वाजला की कोणी उचलायचा ह्यावरून अगदी भांडणं व्ह्यायची... माझा भाऊ तेव्हा शिकायला पूण्याला असायचा त्यामूळे तो घरी आलेला असला की मग फोन तो उचलणार अशी मला ताकिद मिळायची.. तेव्हा Bill वर control रहावा म्हणून फोन च्या शेजारी एक डायरी ठेवलेली असायची आणि त्यात आम्ही नंबर लिहून ठेवायचो.. :) मी पण अगदी शहाण्या मुला सारखे माझ्या सगळ्य़ा मित्रांचे नंबर त्यात लिहायचो आणि मग bill आल्यावर मला ओरडा बसायचा.. :) पुढे पुढे त्या डायरी चं एक पान दिवसातले calls लिहायला अपुरं पडायला लागल्यावर मग ती "प्रथा" बंद झाली... सुरवातिचं अप्रूप संपल्यानंतर, आपल्याला एखादा महात्त्वाचा फोन येणार असेल आणि आपण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम त्यावेळी करत नसू आणि बाकीच्यांनी अगदी नाहीच उचलला तरच मग स्वत: उठून फोन उचलायचा अशी पध्दत घरात चालू झाली... ! मी शाळेत असताना कोणाच्या घरी वगैरे computer नसायचे.... पण आमच्या Building मधे एकांनी computer घेतला होता... आम्हाला "लहान" मुलांना त्या computer च्या खोलीत पण जायला मिळ्त नसे... ती ताई अगदी दारं, खिडक्या बंद करून आत computer वर काम करत असे.. तिचा भाऊ मात्र कधितरी आम्हाला computer लावून दाखवत असे... तेव्हा मला तिचा खूप राग यायचा... आणि आज ऑफ़िस मधे, घरी अगदी अत्याधूनिक desk tops, laptops वापरल्यानंतर ते आठवलं की हसू येतं.. मधे एकदा तर इथे माझे आणि roomies चे मिळून ६ laptop घरात होते... :) पुण्याला आमच्या घरी computer आला तेव्हा तर मला "computer वर लई भारी काय काय करता येतं" एव्हडच ऐकून माहित होतं पण काय ते काही कळायचं नाही.. :D.. मग मी रोज सकाळी computer लावून paint brush वर चित्रं काढून ती save करत असे.... नंतर internet म्हणजे काय हे जरा जरा कळल्यावर VSNL चं student account घेण्यासाठी मी आणि माझा मित्र PMT च्या बस की दिघी ला गेलो होतो... Internet चे सुरुवातिचे दिवस एकदम enjoy केलेले... मी सगळ्या जनतेला खूप forwards पाठवायचो, लोक ते वाचून मला reply करतिल अशी अपेक्षा पण ठेवायचो, मी inbox उघडला आणि मला नविन इमेल आलेला असेल की मला खूsssप आनंद व्ह्यायचा.. :) मी आणि मित्र तर college ला किती वाजता जायचं हे email वरून ठरवायचो आणि email केल्यानंतर "मी तूला email केलाय तो बघ" असं फोन वर पण सांगायचो.. :)... माझ्या uk च्या बहिणी ने पाठवलेले फोटो मी download करून घरी दाखवले तेव्हा computer शोधच मी लावला आहे असा आनंद आई, बाबा आणि आज्जीला झाला होता...! आज्जी आम्हाला तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगताना नेहमी म्हणते "आमच्या लहानपणी असं नव्हतं.. विज वगैरे काही नव्हती सगळं कंदिलाच्या उजेडात करावं लागायचं..." कदाचित आम्हीही पूढे निरज, निशांत ला सांगू.. "आमच्या वेळी असं नव्हतं... फोन आणि computer घरात आधिपासूनच नसायचे, ते घ्यावे लागायचे.. फोन वाजला की उठून उचलावा लागायचा आणि emails पण स्वत:हून type करावे लागायचे.... !!! " :D

A shining star asks me...!

बघता बघता २००६ संपले आणि नविन वर्ष चालू पण झाले... मागच्या वर्षीची New Year party आत्ता १५ दिवसांपूर्वी झाली की काय असं वाटतय... ह्या वर्षातले फ़क्त १५ दिवस मी भारतात घालवले... ते ही प्रचंड उन्हाळा चालू असताना भर एप्रिल मधे... त्यामूळे आमरस खाणे आणि झोपणे ह्या शिवाय बाकीचं काही केलं नाही.. :) २००६ तसं खूप छान गेलं... खूप फ़िरणं झालं.. मजा केली.. अमेरीका अमेरीका म्हणतात ती काय हे अगदी मनसोक्त बघता आलं... Professional life मधे ही एक दोन अपवाद वगळता सारं कसं छान झालं... नविन कामाचे अनूभव मिळाले.. इतर ही काही "अनूभव" मिळाले... घरापासून दूर राहिल्यामुळे स्वत:ची कामं स्वत: करायची जरा सवय झाली.. आणि एकूणच जरा responsibility ची जाणिव झाली.. :) मी स्वत: washing machine लावून कपडे धूतो ह्यावर माझ्या आईचा आणि स्वत:ची कपबशी स्वत: विसळतो ह्यावर माझ्या आज्जी चा अजूनही विश्वास बसत नाही.. :D नविन वर्षाच्या आरंभी मला कोणी सांगितलं की माग तूला काय हवय ते... ५ इच्छा पूर्ण केल्या जातिल तर काय मागेन मी..?? तश्या बर्याच गोष्टी आहेत.. ५ म्हणजे फ़ारच कमी आहेत.. पण हरकत नाही ५ तर ५... प्रयत्न करायला काय हरकत आहे... शांतता.. सगळ्यात महत्त्वाची आणि हल्ली फ़ारच दूर्मिळ झालेली गोष्ट आहे ही.. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारचे आवाज नुसते कानावर आदळत असतात... कधीकधी तर नळातून ठिबकणार्या पाण्याचा आवाज ही खूप irritate होतो... आणि शांतता म्हणजे नुसतीच अश्याप्रकारची नाही तर एकूणच सगळीच.. दंगे, भांडणं, युध्द ह्या सगळ्यांशिवाय जी मिळते तशी शांतता... असो... मी अचानक विश्वशांती वर वगैरे फ़ंडे मारायला लागायचो.. :) मागे मला एका forwarded email मधे एक कविता आली होती.... "कधिकधि जवळ कुणिही नसावसं वाटतं.. आपलच आपण अगदी एकट असावस वाटतं.." (ती मी office मधे माझ्या white borad वर लिहून ठेवली होती... मला सारखा येऊन त्रास देणार्यांसाठी... ;) कधिकधि खरच अगदी शांत बसावसं वाटत कोणाशिही न बोलता... तर मला हवी असलेली ही पहिली गोष्ट...
झोप... आणि तिही वेळेवर.. Weeday la कामं, रोज रात्रीचे calls आणि week end ला timepass... ह्या मधे खोबरं होतं ते झोपेचं.. १:३०/२ ला झोपून ७ ला उठणे हे तर रोजचच झालय.. आणि मग week end ला ती राहिलेली झोप भरून काढण्यासाठी १२/१ ला उठायच... शिवाय कधी heater जास्त झाला कधी कमी झाला ह्यामूळे मधे मधे येणारी जाग.. तर overall वेळेवर आणि भरपूर झोपेची गरज आहे...
मागे एकदा teacher's day ला आम्ही एका सरांना दिलेल्या greeting card वर मेसेज होता... "A Shining star asks me, what do you want ? a bag with 10000 dollars or a good teacher.. I asked for a bag because I already have the best teacher" चांगले शिक्षक किंवा आता नोकरी करताना mentor मिळणं फ़ार गरजेचं असतं... कळतय पण वळत नाही असं बरेचदा होतं... अश्यावेळी ह्या व्यक्ती असल्या की बरं पडतं... मग ते कोणिही असो... senior, junior, manager, मित्र, मैत्रिण, आई बाबा अगदी कोणिही पण त्यांचं असणं जरूरी आहे... आत्त पर्यंत तरी असं कोणी ना कोणी मला भेटलं आहे... नविन वर्षातही भेटत राहो...
मित्र परीवार... जो की मला already खूप आहे... बरेच groups आहेत... एकत्र जमले की धमाल येते...कधी बोलणं झालं की छान वाटतं.. पण इथे आल्यानंतर "मित्र" म्हणवणार्यांकडून काही फ़ार weired अनूभव आले.. म्हणजे expense sharing साठी मैत्री हा फ़ंडा मला पटतच नाही... अश्या relation ला मैत्री म्हणावी का असा प्रश्ण पडतो....हल्ली आम्ही ह्याला professional मैत्री असे नविन नाव दिलय... :) तर असे अनूभव नविन वर्षात येऊ नयेत अशी खूप इच्छा आहे.. शाळा कॉलेज मधे असताना जशी निखळ मैत्री असते तशीच असावी असं फ़ार वाटतं... कौतूक....आपल कौतूक व्हावं असं कोणाला वाटत नाही... ? मग ते ऑफ़ीस च्या कामात असो, blog वर आलेल्या comments मधे असो किंवा मी केलेल्या चहा किंवा भाजी ला roomie नी चांगलं म्हणणं असो... ह्या छोटय़ा छोटया गोष्टींमधून पण motivation मिळतं आणि routine मधला कंटाळा निघून जातो....असं खूप कौतूक वाट्याला यावं अशी इच्छा आहे...
खरतर मी हा post १ तारखेला लिहायला घेतला आणि शेवटी आज पुर्ण केला.. मधे पल्लवी चा हा post वाचण्यात आला.. ती फ़ारच चांगली आहे त्यात लिहीलेल्या सगळ्या गोष्टी इतरांना gift देत्ये... मी मात्र ह्या स्वत:साठी मागतोय.. :) Anyways नविन वर्षात ज्याला ज्याला जे जे हवं ते मिळो हीच इच्छा आहे.. !!